पार्सलमधून बोम्ब ? | PARCELMADHOON BOMB

Book Image : पार्सलमधून बोम्ब ? - PARCELMADHOON BOMB

More Information About Authors :

द्रोणवीर कोहली - Dronveer Kohli

No Information available about द्रोणवीर कोहली - Dronveer Kohli

Add Infomation AboutDronveer Kohli

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
डाकबाबूंनी ओळखले, बलराम कशाला आलाय. आपल्या भावाच्या मनीऑर्डरबद्दल विचारायला आला असणार. बलरामचा मोठा भाऊ शहरात नोकरी करायचा. काही दिवसांपूर्वी गावी आला होता आणि बलरामला सांगून गेला होता की चांगले गुण मिळवून पास झालास तर वीस रुपयांची मनीऑर्डर पाठवीन. पण दोन तीन महिने झाले. अजून मनीऑर्डर आली नव्हती. बिंचारा बलराम दर एक दोन दिवसांनी चौकशी करायला यायचा आणि डाकबाबू त्याची समजूत घालून त्याला परत पाठवायचे. पण आत्ता मात्र बलराम दिसताच त्यांचा पारा चढला. खरेतर डाकबाबू कधीच एवढे रागवायचे नाहीत _ पण आत्ता मात्र तो दगड आणि ती चिठ्ठी यामुळे ते आधीच वैतागले होते. ते एकदम चिडून ओरंडले, “आलास का परत? अरे बाबा, तुला किती वेळा सांगितलं की मनीऑर्डर आली की केशव तुझ्या घरी आणून देईल. इथं काय कोणी खाणार आहे का तुझी मनीऑर्डर? रोज थोबाड घेऊन येतोस. चल निघ - क्राही नाही आली मनीऑर्डर बिनिऑर्डर.” बलराम बिचारा एकदम घाबरला. तिथल्या तिथे खुंटला. त्याचे पाऊल पुढे पडेना की मागे. त्याला समजेच ना की आज काय झालंय डाकबाबूंना ते. एरवी ते कधीच असं बोलायचे नाहीत. रागवायचे नाहीत. “जा बाबा, जा,” डाकबाब्‌ पुन्हा ओरडले. मग मात्र बलराम माघारा वळला. त्याचे डोळे डबडबले होते डाकबाबूंना पश्चाताप झाला. त्यांना वाटले, “उगीच रागावलो बिचाऱ्याला! त्याचा यात काय दोष? मनीऑर्डरबद्दलच तर विचारायला आला होता बिचारा! किती दिवसांपासून वाट बघतोय. रोजच्यासारखं आजही समजूत घालन परत पाठवलं असतं तर त्याला एवढं वाईट वाटलं नसतं. बोलावून समजावतोच त्याला असा विचार करून ते उठले. भराभरा दरवाजापर्यंत आले. बलराम अजून लांब गेला नव्हता. डाकबाबूंनी हाक मारली, “ए 5 इकडे ये.”” बलराम एकदम 14




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now