मेरी क्यूरी | MARIE CURIE

Book Image : मेरी क्यूरी  - MARIE CURIE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

माधवी इनामदार - MADHAVI INAMDAR

No Information available about माधवी इनामदार - MADHAVI INAMDAR

Add Infomation AboutMADHAVI INAMDAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
स्वभाव मायाळू होता. लग्न केले तर आपले संशोधन अर्धे राहील असे आधी त्यांना वाटत असे. परंतु मेरीला भेटल्यावर त्यांचे विचार बदलले. मेरीची शालिनता, धैर्य यावर ते मोहित झाले. मेरीचे विचार मात्र वेगळे होते. तिला वाटे, शिक्षण घेऊन पोलंडला जावे. आपल्या देशाची, जनतेची सेवा करावी. यामुळे ती लग्नाचा विचारही करत नव्हती. पिए्रनी मेरीला पटवले की, संशोधन करूनही मानवाची सेवा करता येते. आपल्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी तिचे मन वळवले. ८/मेरी क्युरी १८.९५ मध्ये त्यांचा विवाह झाला. विवाह त्यांनी. अगदी साधेपणानं केला. लग्नाचा पोशाख, दागिने, धार्मिकविधी या गोष्टींना त्यांनी फाटा दिला. अगदी मोजकी, जवळची माणसं लग्नाला हजर होती. दोन छोट्या खोल्यात मेरीनं आपला संसार थाटला. घरातील कामे ती स्वत:च करी. पण संशोधनाला वेळ देणेही फार आवश्यक ह्योते. त्यासाठी कमी वेळेत करण्याचे पदार्थही तिने शोधले. कंटाळा आला तरं ती दोघंही सायकलवरून फिरायला जात. दोघांचे संशोधन चालूच होते. जगभर विज्ञानाची दौड चालू होती. नवनवे शोध लागत होते. काही वस्तू स्वयंप्रकाशी असतात असा शोध लागला होता. युरेनियम नावाच्या धातूतून काही किरण बाहेर पडतात. हे किरण येतात कुढून? मेरीचे कुतूहल जागे झाले. तिने हाच विषय संशोधनासाठी निवडला. एका अडगळीच्या खोलीत प्रयोगाला सुरूवात झाली. अगदी मोजकी साधनं, प्रतिकूल हवामान, असूनही तिनं संशोधनाला सुरूवात केली. तिच्या अथक परिश्रमांना यश येत आहे हे दिसू लागले. पण तिला मदतीची गरज होती. तिच्या नवऱ्याने आपलं संशोधन बाजूला ठेवलं. ते तिला मदत करू लागले. दोघंही रात्रंदिवस धडपडत होते. त्यात ते यशस्वी झाले. एकाऐवजी दोन मेरी कयुंरी/९्‌




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now