काका चवन | KAKA CHAVAN
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
687 KB
Total Pages :
13
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
अनिल अवचट - ANIL AWACHAT
No Information available about अनिल अवचट - ANIL AWACHAT
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)सर्वसाधारण कपड्यातच आपण गेल पाहिजे. (म्हणून कर्मचाऱ्यांमधे याविषयी
नाराजीही आहे. ) गावात जायचं, ग्रामसभा घ्यायची, गावातली मंडळं सामावून
घ्यायची. काकांना थोडफार कवितेचं अंग असल्याने त्यांनी घोषणा तयार केल्या
होत्या.
“सामाजिक वनीकरण
तयार करू सरपण,
“सामाजिक दनीकरणाची आली दिंडी
बखर पाभरीची तयार करू दांडी
यासारख्या घोषणा गावभर, गावच्या आसपासच्या दगडांवर रंगवायचे,
वृक्ष दिडी काढून वनीकरणाची पालखी काढायची. देवळांसमोर पवित्र झाड
लावायचे असा त्यांचा कामाचा झपाटा असे. धुळ्याचे त्यांचे मित्र वसंतराव
ठाकरे यांनी तर् 'वृक्षनारायणाची पूजा' नावाची सत्यबारायणाच्या पूजेसागखी
पोथी लिहिली, ती काकांनी त्याच्या विभागातर्फे प्रसिद्ध केली. तशी
वृक्षनारायणाची पोथी वाचून पूजा करीत. प्रसाद म्हणून सुबाभळीचे बी वाटत.
राजगुरूनगरला वनखात्याकडून थोडा जमिनीचा तुकडा मिळवून पत्र्याच्या
शेडमध्ये त्यांनी ट्रेनिंग सेंटर सुरू केलं. धोंड्यांचा मुलगा जयंत तिथं कांटूर
मार्करचं प्रात्यक्षिक घेऊन ट्रेनिंग देतो. असे त्यांच्या विभागातले सहाशे कर्मचारी
प्रशिक्षित झाले आहेत. त्यांनी ६००० लोकांना प्रशिक्षित केले आहे. थोडक्यात,
या अनिच्छेने आलेल्या, न्यूनगंडाने पछाडलेल्या लोकांना इतकं कामाला लावलं
की ते आता घोड्यासारखेच धावू लागले.
राजीव गांधींच्या काळात त्यांनी पडीक जमीन विकास महामंडळ काढलं.
त्याच्या अध्यक्षा कमला चौधरी आणि सचिब वरदराजन् हे नाशिकला काही
कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी अचानक मागणी केली की आम्हाला तुमचा
सामाजिक वनीकरणाचा कार्यक्रम बघायचाय. त्यांनी कामं झालेल्या गावांची
यादी मागवली. त्यातल्या एका गावावर बोट ठेवून म्हणाल्या, या गावी चला.
सगळ्या अधिकाऱ्याची घाबरगुडी उडाली. ते डोंगराळ भागातलं गाव. अँबॅसेडर
गाडी जाणं शक्य नव्हत. मग जीपने गेले, तिथल्या गार्डाकडची कुणाकुणाला
रोपं बाटली याची यादी घेऊन एका नावावर बोट ठेवून म्हणाल्या, या
माणसाकडे जायचंय. तो माणूस तर आणखीनच डोंगरात रहत होता. तिथं
पोहोचले. तो नव्हता, त्याची बायको होती. तिला ती रोपं मिळाली होती. ती
सर्व तिने लावली होती. दोनचार वगळता सर्व पं चांगली लागली होती. कमला
चौधरींनी स्वतः ती शे-दीडशे रोपं मोजून पाहिली.
त्या दिल्लीत गेल्यावर, काकांना इंदिरा प्रियदर्शनी अवॉर्ड जाहीर झालं. पण
त्यानं काकांच्या काही वरिष्ठांमधे, सहकाऱ्यांमधे मत्सराचं इतकं काहूर उठलं की
काका मला म्हणाले, ''अशी अवॉर्ड बगैरे काही द्यायची असली, तर ती
वरिष्ठांना द्यावीत. खालच्यांना अशा अंवॉर्डचा त्रासच जास्त होतो. ''
प्रवासात कधी मालुताईही बरोबर असायच्या. त्या धुळे शहरात ग्हणांऱ्या.
वडील मॅजिस्ट्रेट, काका शिक्षणमहर्षी डॉ. दादासाहेब धोगरे अशी पार्श्वभूमी
असलेल्या. पण शहरी जीवन सोडून काकांच्या प्रत्येक बदलीच्या ठिकाणी
मुलांसह जाऊन संसार थाटायच्या. बुलढाण्याहून आलापछ्लीला बदली झाली
तेव्हा असं ठरलं की माळुताईंनी दोन लहान मुलांना घेऊन धुळ्याला बिऱ्हाड
कराव. कारण आलापट्लीच्या जगलात तिथं शाळा नसणार, सोयी नसणार.
बुलढाण्याहूनन ट्रक भरेपर्यंत मालुताईंची घालमेल चालली. शेवटी ट्रक
भरल्यावर त्यांनी तो धुळ्याऐवजी आलापल्लीला फिरवायला लावला. तिथं
एकेका दिवसात घरात, अंगणात मिळून अकरा साप निघाले होते. वेगळंच
जीवन असायचं. मुल आदिवासी. त्यांची भाषा बोलायची. त्यांचे खेळ म्हणजे
छोट्या ट्रकमधे हमाल म्हणतात ते गाणं*म्हणत, लाकडं चढवणं आणि उतरवणं.
बदलीच्या प्रत्येक ठिकाणी शिक्षिकेची नोकरी त्या करायच्या.
काकांच्या प्रयोगांपुढे त्यांनी हात टेकलेले. 'आमचे साहेब' असा उल्लेख
न्मरूून काकांच्या अनेक फसलेल्या प्रयोगांच्या फजितीचे प्रसंग सांगत. गोबर
गॅसवर प्रयोग चालायचे. साहेबांना हे वेड म्हणून हाताखालचे साहेबलोक,
गार्डही भाग घ्यायचे. गोबर गॅस एखाद्या छोट्या पिंपात भरता येईल का ? म्हणजे
तो पोर्टेबल होईल. दौऱ्याबर जाताना जीपमध्ये ती टाकी टाकली की एकदम
सोयच होणार ना ! बंगल्याच्या बाहेर यांचे प्रयोग चाललेले. स्वयंपाकघराची
खिडकी तिथच होती. मी स्वयपाक करत होते. यांनी गॅस एका छोट्या पिंपात
तयार केला आणि ते पिंप फुगायलाच लागलं. इतकं की ते फुटेल की काय अशी
भीती वाटायला लागली. म्हणून यांनी त्याचं झाकण कसंबसं काढलं. तर मोठा
आवाज होऊन ती शेणाची स्लरी अशी वर उडालीय म्हणता की सगळ्या
बंगल्याची भित शेणाने भरली. खिडकीतून स्वयंपाकघरात शेण. हे आमचे
साहेब, त्यांच्या हाताखालचे साहेब, गार्ड सगळे शेणाने भिजलेले. असं काही
पाहण्यासारखं दृश्य होतंय म्हणता... असं म्हणून त्या खूप हसत.
यावर काकाही हसले व म्हणाले, अहो एक प्रयोग यशस्वी होतो, तेव्हा
अनेक प्रयोग फसलेले असतात.''
मी म्हणालो, ''पण हे फसलेले प्रयोग लिहून ठेवा. निवृत्तीनंतर त्यात लक्ष
घालता येईल.
User Reviews
No Reviews | Add Yours...