मुलं नापास का होतात ? | MULE NAPAAS KA HOTAT

MULE NAPAAS KA HOTAT  by जॉन होल्ट - JOHN HOLTपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

जॉन होल्ट - JOHN HOLT

No Information available about जॉन होल्ट - JOHN HOLT

Add Infomation AboutJOHN HOLT

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
निदाने एकत्र करण्याऐवजी आणि त्यांच्यात काय कमतरता आहेत याची यादी करण्याऐवजी त्यांना शाळा परवानगी देईल तितके विचारस्वातंत्र्य, बोलण्याचे आणि कृती करण्याचे स्वातंत्र्य देऊन ते काय करतात हे पाहायला हवे. आपल्याला जे हवे आहे तेच मुले करतात किंवा जे करायला नको आहे ते करीत नाहीत ना, एवढेच पाहण्यासाठी जर आपण मुलांकडे लक्ष दिले तर त्यांच्यासंबंधीच्या सर्वात महत्त्वाच्या व मनोरंजक गोष्टी जाणून घेण्याची संधी आपण गमावली असेल. अनेक वर्षांचा अनुभव असून देखील कित्येक वर्गशिक्षकांना मुलांच्या खऱ्या स्वरूपाबद्दल अतिशय कमी माहिती असण्याचे हे एक कारण आहे. मुलांना घरीच शिकविणारे पालक याचा चांगला उपयोग करून घेतात कारण त्यांना मुलांना स्वारस्य असणारे विषय, भावना व्यक्त करण्याचे त्यांचे मार्ग वगैरेंमधून खरोखर मुलांना समजून घेण्याची इच्छा असते आणि त्यांना त्यासाठी वेळही असतो. शाळेतील शिक्षकांनी जर त्यांच्या परंपरागत जबाबदारीचा- वरिष्ठ, पोलिस आणि न्यायाधीश- त्याग केला तरच ते विद्यार्थ्यांना समजून घेऊ शकतील आणि मुलांना ते कशी मदत करू शकतील हे त्यांच्या लक्षात येईल. मनाशी काही फार मोठी योजना तयार न करताच मी जेव्हा शाळेच्या वेळेतच त्यांना एकमेकांशी बोलण्यासाठी आणि एकमेकांसीबत काही करण्यासाठी अधिकाधिक वेळ देऊ लागलो, तेव्हाच मला त्यांचे अनुभव, त्यांच्या कल्पना, त्यांना स्वारस्य असणारे विषय यांची माहिती मिळू लागली. मग वर्ग त्यांच्यासाठी अधिक उपयुक्त करण्याचे मार्ग मला सुचू लागले. मी त्यांना काही शिकविण्यापूर्वी मला त्यांच्याकडून प्रथम शिकून घ्यावे लागले. तिच्या मैत्रिणींबरोबरचे तिचे बोलणे ऐकूनच मला जेव्हा समजले की तिला घोड्यांमध्ये स्वारस्य आहे. तेव्हा नॅशनल वेल्व्हेटची एक प्रत तिला देऊनच मी तिच्या वाचनाची समस्या' सोडवू शकलो. माझ्या अपेक्षेप्रमाणेच ते तिला फारच आवडले. ती गोष्ट आणि त्यातील व्यक्तिरेखा तिला इतक्या आवडल्या की त्यातूनच तिला तिची वाचनाची समस्या' सोडविण्याची इच्छा झाली आणि त्यासाठी बळही मिळाले. आपल्याला वाचता येणारच नाही ही भीती, आणि ते खरे ठरले तर किती लाजिरवाणे वाटेल हीच खरी समस्या होती. २७ जुलै १९५८ या वर्षीच्या अनुभवाने माझ्या लक्षात आले आहे की केवळ प्रत्येक तासाला दिला जाणारा अभ्यास आणि दररोजचे काम या दृष्टीनेच मुले शाळेकडे पाहतात. शिक्षक मात्र कधीच असा विचार करीत नाहीत. सद्सद्‌विवेकबुद्धीने काम करणाऱ्या ३0 । मुलं नापास का होतात? शिक्षकाला वाटते की तो आपल्या विद्यार्थ्यांना एका फार मोठ्या आल्हाददायक सफरीवर नेत आहे, आणि तिथे पोचल्यावर मिळणाऱ्या आनंदाने सर्व कष्टांचे चीज होईल. इतिहास शिकविणाऱ्या शिक्षकाला वाटते की इतिहास शिकणे हे किती उपयुक्त, स्वारस्यपूर्ण आणि रोमांचकारी आहे आणि त्याच्याकडील ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणे ही त्यांच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. फ्रेंचचा शिक्षक फ्रेंच साहित्याच्या वैभवाचा किंवा फ्रच बोली भाषेतील सौंदर्याचा आणि फ्रेंच खाद्यपदार्थांच्या आस्वादातील आनंदाचा विचार करतो आणि आपण हा ठेवा मुलांपर्यंत पोचवण्यास मदत करीत आहोत अशी त्याची भावना असते. सर्वच विषयांबाबत असे म्हणता येईल. शिक्षकांना आणि मुलांना स्वारस्य असणारे विषय मूलत: एकच आहेत असे शिक्षकांना वाटते, मलाही पूर्वी तसेच वाटत असे. मुलांना हा जो प्रवास करायचा होता आणि तो माझ्या मार्गदर्शनाशिवाय करणे त्यांना शक्य नव्हते, तो करण्यास मी त्यांना मदत करीत आहे अशी माझी समजूत होती. हा मार्ग खडतर आहे हे मला माहीत होते व समोरचे लक्ष्य माझ्याप्रमाणेच त्यांच्या नजरेसमोरही स्पष्ट आहे आणि ते गाठण्यासाठी ते देखील उत्सुक आहेत असे मी गृहीत धरीत होतो. आपण एखाद्या उत्कृष्ट ठिकाणच्या प्रवासाला निघालो आहोत अशी भावना मुलांच्या मनात निर्माण होणे मला महत्त्वाचे वाटे. परंतु या विषयासंबंधीचे माझे आतापर्यंतचे बोलणे म्हणजे निव्वळ तोंडाची वाफ दवडणे होते. कदाचित मलाच वाटत होते की मी जे शिकविण्याचा प्रयत्न करीत होतो ते शिकण्यासाठीच मुले उत्सुकतेने माझ्या वर्गात आली होती. पण त्यांचे कारण निराळेच होते. त्यांना शाळेत जाणे भाग होते म्हणूनच ते शाळेत आले होते आणि माझ्या वर्गात बसले होते. कारण तेही त्यांना भाग होते, नाहीतर याऐवजी ते दुसऱ्या कोणत्या तरी वर्गात बसले असते आणि तो कदाचित याहूनही वाईट असेल. शाळेतील मुले म्हणजे डॉक्टरकडे नेण्यात आलेल्या मुलांसारखीच असतात. डॉक्टरने, त्यांच्या औषधांचा त्यांना किती फायदा होणार आहे हे घसा कोरडा पडेपर्यंत कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या मनात एकच विचार असतो की यामुळे किती दुखेल किंवा या औषधाची चव किती वाईट असेल. त्यांना जर विचाराल, तर यातले काहीच त्यांना नको असते. माझ्यामागे निश्चयाने येत असलेले हे शूर प्रवासी मी ज्या अपेक्षित गावाला घेऊन निघालो होतो, ते साखळदंडाने बांधलेले, नाहीतर शिक्षा होईल म्हणून कुठे चाललो आहोत हे माहीत नसताना आणि पुढचा रस्ताही दिसत नसताना, खडबडीत रस्त्यावरून नाइलाजाने चालणारे कैदीच होते. मुलांची देखील शाळेबाबतची भावना अशीच असते. ते तुम्हाला तेथे जाणे भाग पाडतात. ते तेथे काहीतरी करायला लावतात. जर तुम्ही ते सांगतील ते केले नाही किंवा ते चांगले केले मुलाच्या युक्त्या । ३१




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now