प्रिय मुख्याध्यापक | LETTER TO A PRINCIPAL

LETTER TO A PRINCIPAL by पुस्तक समूह - Pustak Samuhप्रदीप गोटुस्कर - PRADEEP GOTUSKAR]शंकर मुसाफिर -SHANKAR MUSAFIR

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

प्रदीप गोटुस्कर - PRADEEP GOTUSKAR]

No Information available about प्रदीप गोटुस्कर - PRADEEP GOTUSKAR]

Add Infomation AboutPRADEEP GOTUSKAR]

शंकर मुसाफिर -SHANKAR MUSAFIR

No Information available about शंकर मुसाफिर -SHANKAR MUSAFIR

Add Infomation AboutSHANKAR MUSAFIR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बहुतांशी शिक्षक सांगाड्याचा उपयोग शिकण्यासाठी कधी करतच नाहीत, कारण पुस्तकात तसं काही सांगितलेलं नसतं. शिक्षक पाच मिनिटंही मुलांना त्या सांगाड्यासमोर उभं करत नसतील. आश्चर्य म्हणजे, पाचवीनंतरच्या कुठल्याही पाठ्यपुस्तकात माणसाचा सांगाडा प्रयोगशाळेत आवश्यक आहे असं सांगितलेलं नाही. तरीसुद्धा सर्व प्रयोगशाळांमध्ये तो सापडतोच याचं कारण काय, हा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? कुणीतरी एकदा मला याचं कारण सांगितल, की माणसाच्या शरीरात २०६ हाड असतात आणि मांडीचं हाड शरीरातलं सर्वात मोठं हाड असतं हे शिकवायला प्रयोगशाळेत सांगाडा ठेवलेला असतो. इतकी छोटी गोष्ट सांगायला इतका खर्च? आणि यात प्रयोग कुठला? प्रयोगशाळा ह्या केवळ प्रदर्शन न बनता त्या प्रयोग करण्यासाठी वापरल्या पाहिजेत. समुद्रात सापडणारा स्टार फिश किंवा साप आणि विंचू हेसुद्धा तुम्हाला अनेक प्रयोगशाळांमध्ये ठेवलेले सापडतील. अभ्यासक्रमात तर या गोष्टीचा उल्लेखही नसतो. ते प्रयोगशाळेत प्रदर्शित करण्यामागे दोन उद्देश असतात, १. प्रयोगशाळा दह्या खरोखर प्रयोगशाळेसारख्या दिसायला नकोत का? उद्देश हा असतो, की तिथले नमुने वैज्ञानिक असे दिसावेत. २. प्रयोगशाळेसाठी दिलेला पैसा आणखी कुठं वापरणार? टेस्टट्यूबसाठी एवढे पैसे थोडेच लागतात? प्रयोग करताना टेस्टट्यूब फुटली तर मुलांना द्यायला टेस्टट्यूब नसतात. टेस्टट्यूबसाठीचा पैसा कदाचित स्टारफिश विकत घेण्यासाठी वापरलेला असतो. प्रात्यक्षिकं आणि प्रयोग हे पाचवीपासून घ्यावेत हे कोणत्या शिक्षणतज्ज्ञानं ठरवल, त्याला मला भेटायचं आहे. अगदी बालवाडीपासून मुलांना प्रयोग करण्याची संधी मिळाली पाहिजे. मी तर म्हणतो, की लहान वयाच्या मुलांमध्येच सर्वात जास्त प्रयोगशीलता दिसते. या माझ्या मताशी मारिया मॉन्टेसरी नक्की सहमत झाल्या असत्या. उ आपण जर विचार केला, तर पहिली ते पाचवीमधल्या मुलांना आवडतील आणि समजतील असे अनेक प्रयोग डोळ्यांसमोर येतील. मुलांना जर पहिलीपासूनच प्रयोग करण्याची संधी दिली, तर त्यांना कॉलेजच्या मोठ्या प्रयोगशाळेत पाय ठेवताना काय वाटेल? ती मुलं मग आय.आय.टी. आणि ए.आय.आय.एम.एस. यांसारख्या संस्थांमधील प्रयोगशाळा वापरून अनेक नवे शोध लावतील! २८ । प्रिय मुख्याध्यापक याचा विचार करताना मलाही एक “शोध' लागला, की आपल्या अभ्यासक्रमात समाजशास्त्राचे काहीच प्रयोग दिलेले माहीत. विज्ञानात, आणि आता तर गणितातही, अनेक प्रयोग दिलेले असतात; पण अशा प्रकारची प्रात्यक्षिकं समाजशास्त्रात करता येत नाहीत काय? र समाजशास्त्रात काय लोकांवर प्रयोग करणार? असा प्रश्‍न कदाचित शिक्षणतज्ज्ञ मला विचारतील. पण कल्पकतेनं विचार केला तर समाजशास्त्रातही, माणसाची प्रतिष्ठा राखून, अनेक प्रयोग करता येण्यासारखे आहेत. समाजशास्त्राची प्रयोगशाळा ही कल्पना आज जरी नवीन वाटली, तरी या प्रयोगशाळेत पृथ्वीचा गोल आणि इतर अनेक साधनं ठेवता येतील. दरवर्षी मुलांना हिमनद्या, नद्यांपासून बनणारी तळी किंवा दऱ्या कशा दिसतात हे पाहण्याची उत्सुकता असते. पण मुलांना जर अशा गोष्टी पाहायच्या असतील, तर महागड्या पुस्तकांमधली रंगीत चित्रं हाच एक पर्याय असतो. भूगोळातल्या अनेक नैसर्गिक रचना - उदाहरणार्थ, खाडी, उंच कडे किंवा खोल दऱ्या यांच्या प्रतिकृती वापरून आपण मुलांना त्या विश्‍वात सहज नेऊ शकतो. उन्हाळाच्या सुट्टीत एकदा आम्ही आमच्या आजी-आजोबांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या बागेतला पाण्याचा पाईप तेव्हा फुटला होता. मी आणि माझ्या भावानं ते पाणी अडवून एक ओढा तयार केला आणि बांध बांधून पाणी उतारावरच्या फुलांच्या वाफ्यापर्यंत नेलं. खऱ्या नदीप्रमाणेच इथंही आम्हाला प्रवाह कसा वाहतो आणि गाळ कसा साचतो हे पाहायला मिळालं. भूगोलाची आमची प्रयोगशाळा ती हीच! उ पण भूगोलच का, नागरिकशास्त्राचंसुद्धा पहा. नागरिकशास्त्राच्या प्रत्येक पाठ्यपुस्तकात भारताच्या घटनेबद्दल सांगितलं जातं. पण मुलांना जर भारताची घटना पाहायची असेल, तर त्यांना ती कदाचित शाळेच्या वाचनालयात मिळावी. नागरिकशास्त्राशी संबंध असलेल्या गोष्टी- जसे विविध राजकीय पक्षांचे फलक, मतदान यंत्र, मतदारयादीत नाव नोंदवण्याचा फॉर्म किंवा पाणी आणि बीज जोडणीसाठी लागणारा फॉर्म, अशा अनेक गोष्टी शिक्षक वर्गात ठेवू शकतात. विचार कराल तर अशा शेकडी गोष्टी तुम्हालाही सुचतील. या गोष्टी वापरून साधारण शिक्षकालाही मुलांकडून विविध कार्यक्रम करून घेता येतील. उ इतिहासाबद्दल तर सांगायलाच नको! जुन्या हस्तलिखितांचे नमुने, महत्त्वाच्या प्रयोग । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now