मनाला भावेल ते शिकताना | LEARNING THE HEART'S WAY
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
424 KB
Total Pages :
107
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आहे. मी ते सोडणार नव्हते. आम्ही एकदा एका स्टुडिओला भेट दिली. निम्बस निर्मितीच्या
एका हिंदी कार्यक्रम मालिकेचं शूटींग सुरू होतं. रजनी मावशी निर्मात्याला ओळखत होती.
सेटवर दिवाणखाना, शयनगृह, पोलीस स्टेशन आणि तुरूंगही उभा केला होता. फिरता सेट
होता. भिती फिरवल्या की शयनगृहाचा काही मिनिटात तुरूंग व्हायचा. त्या दिवशीचं दृश्य
तुरूंगातलं होतं. दिग्दर्शक आणि त्याचे सहाय्यक दुसऱ्या खोलीत ३ संगणकांवर बसले होते.
प्रत्येकातून कलाकार वेगवेगळ्या कोनातून दिसत होता आणि त्यांनी माहिती दिली की,
शूटींग झाल्यावर त्यातला जो सर्वात चांगला कोन असेल ते दृश्य निवडले जातं. दृश्याचा
बारीक सारीक पैलूंचा विचार पडद्यावर पाहून केला जात होता. प्रत्येक रिटेकला कलाकार
चांगला अभिनय देण्याचा प्रयत्न करीत होता. काही वेळेस तो जास्त नाटकी, काही वेळेस
अभिनय तोकडा वाटे. एकदा तर तो संवादच विसरला आणि त्याबद्दल सॉरी म्हणून आणखी
एकदा दृश्य चित्रण करायची त्यानं विनंती केली.
पाकिजा चित्रपटातली गाडीतली दृश्यं आणि मुगले आजम चित्रपटाची काही दृश्यं याच
स्टुडीओत चित्रित झाली होती. खोटी गाडी आणि उभारलेले लुटुपुटूचे खेड्यांचे सेट तिथं
बॉलीवुडच्या भूतकाळातील चित्रपटांचे आणि कलाकारांचे मूक साक्षीदार जणू होते. फिल्मचं
शूटींग म्हणजे केवढा व्याप असतो आणि अगदी स्पॉटबॉयपासून मुख्य कलाकारांचा त्या त्या
योग्यवेळी योग्य ठिकाणी मोठ्टाच सहभाग असतो. इतके कष्ट घेऊन काही चित्रपट इतके सुमार
निघावेत हा किती विरोधाभास! आणि बॉक्स ऑफीसवर फिल्म आपटण्याचा केवढा धोका
असतो! आम्ही निर्मात्याचे आभार मानले आणि परत फिरलो.
मावशीनं मला एकदा हातात फोन घेऊन विचारलं, “आमीर खानला भेटायचं आहे
का? जणू लाईनवर पुढच्याच मिनिटाला आमीरखान भेटणार होता. काय बोलावे मला
काहीच सुचेना, मी इतकी गोंधळून गेले होते, अधीर झाले होते, बापरे बाप! काय करू?
कशी बोलू? दुदैव, तो परदेशी गेला आहे. फोनचा रिसिव्हर आपटून मावशी म्हणाली.
“खरचं दुर्दैव! * मी म्हटलं पण एकीकडे सुटकेचा श्वासही सोडला. त्यानंतर कितीतरी दिवस
माझ्या स्वप्नातील हिरोच्या भेटीची चित्रं मी मनाशी रंगवत होते, त्याच्याशी काय बोलायचे,
त्याची उजळणी करत होते.
एके सकाळी रजनी मावशीनं तिचा प्राचीन टाइपरायटर बाहेर काढला आणि मला
टाईपरायटर शिका हे पुस्तक दिलं आणि त्यावरून माझी मी रोज एक तास टाईपरायटींगचे
धडे गिरवू लागले. त्याला आवश्यक ते आधारभूत कौशल्य मावशीनं माझ्यात निर्माण केलं
होतं त्याचा मला फारच उपयोग झाला.
(>
User Reviews
No Reviews | Add Yours...