आनंदवन | ANANDVAN

Book Image : आनंदवन  -  ANANDVAN

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

फारूक काझी - FARUKH KAAJHI

No Information available about फारूक काझी - FARUKH KAAJHI

Add Infomation AboutFARUKH KAAJHI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आपण जर शैक्षणिक साहित्याची योजना केली, तर या खिडकीतून घुसून त्यांची नासधूस कुणीही करू शकलं असतं. सगळा उघडाच मामला! त्यातच वर्गाला लागलेली 'बेशिस्ती'ची सवय! कानाचे पडदे फाटतात की, काय एवढा गोंधळ मुलं करत होती. माझ्यासमोर एकच समस्या नव्हती, उलट समस्यांचं जाळंच होतं. मुलं शांत होत नाहीत तोवर मी शिकवू शकत नाही आणि अशा बकाल वर्गात बसून मुलांनी शिक्षण घ्यावं तरी कसं? भिंतींना ना रंग ना सजावट, वाळवंटात बाग फुलवायची होती जणू. आजवर कल्पिलेल्या आदर्शवादी विचारांची वाफ झाली होती. आपण आजवर ज्या मनोराज्यात वावरत होतो, तेवढं वास्तव सहजसोपं नाही, याची जाणीव होऊ लागली होती. वर्गात बसून शेती कशी करावी, हे शिकण्यात आणि प्रत्यक्ष शेतात कष्टण्यात जेवढं महत्‌ अंतर आहे. तितकंच अंतर माझ्या स्वप्नांत आणि वास्तवात होतं. प्रशिक्षण काळात केवळ पुस्तकं, पाठ टाचणं यांनाच जास्त महत्त्व दिलं जातं; परंतु प्रत्यक्ष शाळेवर गेल्यावर कोणकोणत्या समस्या भेडसावतात, त्यावर उपाय काय? याविषयी फारसं मार्गदर्शन होत नाही. हा त्या त्या शिक्षकाच्या कौशल्याचा भाग असतो, असं एकच उत्तर नेहमी दिलं जातं. वर्गव्यवस्थापन, उपक्रमशीलता याविषयी फारसं काही शिकायला, पाहायला, करायला मिळत नाही. त्यामुळे नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकाची अवस्था काहीही न येणाऱ्या मुलाला कुणीतरी नुसते प्रश्‍न विचारून भंडावून सोडावं अगदी तशीच होते. माझीही अवस्था त्याहून वेगळी नव्हती. 8 नव्याने काही उभारायचं नव्हतं; पण आहे त्यात डोंगरएवढ्या सुधारणा करायच्या होत्या. पहिला दिवस कसाबसा सरला; मात्र हे सर्व नित्याचंच झालं होतं. मुलांच्या गोंधळामुळे व्हायचा तो परिणाम झालाच. माझा स्वभाव जास्त चिडखोर झाला. मुलांना शिक्षा करणं, हा रोजचाच भाग होऊन गेला. मुलांशी प्रेमाने वागायला हवं, हे मलाही पटत होतं; मात्र रागावणं, शिक्षा करणं याशिवाय दुसरा मार्गच सापडत नव्हता. मुलांना धाकात ठेवण्यासाठी. १६ । आनंदवन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now