प्राचीन भारतीय समाज-संस्कृति संवर्धन : एतिहासिक रूपरेखा | PRACHEEN BHARTIYA SAMAJ SANSKRITI SAMVARDHAN : AITIHASIK ROOPREKHA

Book Image : प्राचीन भारतीय समाज-संस्कृति संवर्धन  : एतिहासिक रूपरेखा  - PRACHEEN BHARTIYA SAMAJ SANSKRITI SAMVARDHAN : AITIHASIK ROOPREKHA

More Information About Authors :

दामोदर धर्मानंद कोसांबी - Damodar Dharmananda Kosambi

No Information available about दामोदर धर्मानंद कोसांबी - Damodar Dharmananda Kosambi

Add Infomation AboutDamodar Dharmananda Kosambi

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मध्ये व प्रदेशात तो ब्राह्मण असेच असे नाही. केस कापणारा नाभिक, मैळेल्या जनावरांचे कातडे काढणारा ढोर, चामड्याच्या पखाली व वहाण! बनवणारा चांभार, सरकार व गांव ह्यांची विविध सरकारी-बिनसरकारी कामे करणारा महार, अशा बिविध गरजा पुरवणाऱ्या व्यावसायिक समूहगटांच्या जाती बनल्या. मध्ययुगातील युरोपमध्ये वेगवेगळ्या कारा- गिरांच्या श्रणी होत्या त्याचेच एक पण नि:संशय रीत्या वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप म्हणजे “जाती. मध्ययुगीन भारतीय समाजातील अर्थव्यवस्थेतील सर्वात जटील प्रश्न होता अशा विविध कसबी-निमकसबी कारागिरांकडून गावा[करिता उत्पादन व सेवा मिळविण्याचा. जाती व्यवस्थेमुळे गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांपासून आणि एकमेकांपासूनसुद्धा विभ्क्तपणे नांदणारे, तरीसुद्धा एकत्र राहणारे हे विविध समूह म्हणले जाती. एका बाजुने शेतकरी ही विविध कामे करू शकत नव्हता तर कारागीर खत:च्या जातीबाहेर विवाहसंबंध जोडू शकत नव्हते. त्याचबरोबर सर्वसाधारणपणे छोटे खेडे विविध तऱ्हेच्या कसुबी कारागिरांचे एखाददुसरेच कुटुंब पोसू शकत होते. सुत1र किंवा लोहार ह्यांनी स्वतंत्र वसाहती करून मुख्यतः विक्रीसाठी उत्पादन करणे मध्ययुगात अशक्य झाले. प्राचीन भारतीय इतिहासाच्या विशिष्ट कालखंडात मात्र अशा वसाहती होऊन गेल्या आहेत. त्या का व कशा मोडल्या व गावगाडा कसा निर्माण झाला ह्यांचा विचार नंतर ह्या पुस्तकात करू. ह्या कसबी कामगारांचे उत्पादन विकत घेणे किंवा त्या त्यावेळी कामाचा मोबदला देणे, हे मागणी अनियमित असल्यामुळे शक्य नव्हते, त्याची सेवा चाळू ठेवण्याकरिता बळतेदारीची पद्धत उदयास आली. गावातील धान्योत्पादनाचा ठराविक हिरसा ह्या सेवेकरिता ठरवण्यात आला व त्यांना सामाजिक चौकटीत शाश्वती देण्यात आली. गतिझ्ून्य गावगाड्याच्या अ्थेस्चनेचे रहस्य हे बछतेदार पद्धतीत आहे. अजूनही ह्या पद्धतीचे अवशेष अनेक खेड्यापाड्यात आढळून येतात. कसबी कामाचा मोबदला पैशात देण्याची पद्धत आता अधिकाचिक रुढ होत आहे, वस्तूंच्या रूपात (खास करून धान्यात) मोबदला देण्याची पद्धत नष्ट होत आहे. आता वाहतूक व्यवस्था सुधारल्यामुळे नाभिक- सुद्धा गावोगावी फिरू लागला आहे. लोहार हा अधिक व्यापक भागाकरिता काम करू शकतो व आपला माल बाजारात विकू शकतो. अनेक ठिकाणी पत्र्याच्या वा लोखडाच्या भांडथांनी मातीच्या भांड्यांची जागा घेतली आहे व ह्या भांड्यांकरिता पैशाच्या ख्पात मोबदला मागितला जातो. युरोप व इतर देशांत कसबी कामांची उत्क्रांती पुढे शास्त्र व तंत्रज्ञानात झाली. भारतीय समाजव्यवस्थेत मात्र अशी कस्रबा[ची कामे करणाऱ्या जातीचा समाजावर असलेल्या पर।वलंबित्बा- मुळे नीच स्थान प्राप्त झाले. बरिष्ठ खमजल्या जाणाऱ्या वर्भ-बर्णांना कःखब किंवा अंगमेहनत ह्याबद्दल त्यामळे वाटणारा तिरस्कार ह्या कारणानेखुद्धा पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतांत ह्या वसबांची परिणती शास्त्र-विज्ञानतंत्र ह्यांच्या वृद्धीत झाली नाही. २० | प्राचीन भारतीय समाजञ-संस्कृती संवर्धन भारतातील जंगलात अजूनह्दी कातकरी [महारा] भिल [मध्यप्रदेश] ओरेऑन [बिहार अशा अनेक आदिवासी जमाती आहेत. ह्या जमाती आता कुठे अन्न गोळा करून जगण्याच्या (फूड गॅदरिंग स्टेज ऑफ सोसायटी) पद्धतीतून बाहेर पडत आहेत. जंगले नष्ट होण्यामुळे, रोगराई व उपासमार ह्यामुळे आणि नागर संस्कृतीच्या आक्रमणामुळे अनेक जमाती नष्टद्दी झाल्या आहेत, तर काही नागर संस्कृती असणाऱ्या समाजात सामावल्या गेल्या आहेत. कघी कधी हे आदिवासी जवळपासच्या गावांमध्ये शेतीच्या कामाकरिता जातात. तेथे त्यांना अत्यंत तुटपुंज्या मोबदल्यावर राबवले जाते. बहुतेक वेळा हा मोबदला घान्याच्या स्वरूपात दिलि जातो. काही आदिवासी लहानसहान पद्यूपक्ष्यांची शिकार करून जगतात. कंदमुळे, साप, उंदीर व माकडे मारून खाणारे आदिवासीसुद्धा आहेत. जादू- टोणा व मंत्रतंत्र ह्यांचेही प्रस्थ अनेक आदिवासी जमातींत आहे. एखाद्या क्रियाकर्मांकरिता किंबा इच्छा साध्य होण्याकरिता मानवी बळी दिल्याच्या आरोपावरून आदिवासींची धरपकड केल्याची बातमी वर्तमानपत्रांतून अजूनही वाचावयास मिळते. काही ठिकाणी आदिवासींची दगडघोंड्यांच्या स्वरूपातळी देवते व शेतकऱ्यांची ग्रामदेवते ह्यांत साधर्म्य आढळून येते. दोन्ही समाज एकमेकांच्या देवतांची आराधना करताना आढळून येतात, अनेक वेळा ग्रामदेवतांच्या उत्सवाच्या वेळी ठिकठिकाणचे लोक कुलाचार करण्याकरिता एकत्र येतात. त्याचे कारण त्यांचे मूळ देवत किंवा कूळ एक असते. अनेक ग्राम: देवतांच्या नावावरून त्यांचे मूळ आदिवासी स्वरूय काय असावे, हेही कळू शकते. कची कधी एखाद्या जातीचे व आदिवासी जमातीचे नावसुद्धा एकच असते, पण त्यांच्यात बेटी व्यवहार होत नाही, कारण ग्रामवासी झालेले मूळ आदिवासी हे सामाजिक दृष्टया वरच्या स्तरात गेलेले असतात, त्यांच्या खाण्यापिण्याच्या रहाण्याच्या पद्धतीत फरक पडलेला असतो. ग्रामवा[सींना आदिवासींच्या मानाने अधिक नियमितपणे अन्न मिळते. तरी हे दोन्ही गट एकाच मूळ समूहातून उद्भवलेले आहेत, असे दाखवणारे काही पुरावे शिछक राहतात. एकाच मातृदेवतेची किंवा कुळदैवतेची समान पद्धतीने पूजा--हा असा एक पुरावा होय. ग्रामवासी ज्या समाजात मिसळतात त्या समाजातील इतर देवदेवताची- सुद्ध पूजा करतात. अगदी प्राथमिक अवस्थेतील देवांच्या मानाने असे देव एक पावरी बरचढसुद्धा असू शकतात. कुठे शेतकरी क्षेत्रपाल समजल्या जाणाऱ्या नागाची किंवा त्याच्या प्रतिमेची पूजा करतात. तर मूळ पूर्वजांची पूजा युग्ममूर्तीची पूजा करून केली जाते. वंशपरंपरेने कसल्या जाणाऱ्या जमिनीच्या एखाद्या कोपऱ्यात हे वंशज कुळाचे मूळ पुरष व स्त्री ह्याची युग्मे देवदेवतांच्या स्वरूप।त कल्पून त्याची पूजा करतात. म्हसोबा हा देव महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा देव. पण 'प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्याचे स्वरूप आपल्या कल्पनेप्रमाणे वेगळे ठेवले आहे. पेरणी नांगरणी, कापणी इत्यादी हंगामाला होतकरी अनेक लहानसहान देवतांची पूजा करतात. वेताळ हा अर्वा राक्षस आहे. अक्राळविक्राळ आहे. तरीही देव मानला गेला आहे. अधिक वरच्या स्तरावर ब्राह्मणांना मान्य असे शिव, विष्णु त्याचे राम, क्षष्ण इत्यादी अवतार हे द्वेब व त्यांच्या बायका देवता. मानल्या गेल्या आहेत. ग्रामवासी त्यांचीही पूजा ऐतिहासिक परिस्थितीचा मागोवा | २१




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now