तागोरांच्या गोष्टी | TAGORECHI GOSHTI

Book Image : तागोरांच्या गोष्टी  - TAGORECHI GOSHTI

More Information About Authors :

पद्मिनी बिनीवाले - PADMINI BINIWALE

No Information available about पद्मिनी बिनीवाले - PADMINI BINIWALE

Add Infomation AboutPADMINI BINIWALE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

रवीन्द्रनाथ टैगोर - Ravindranath Tagore

No Information available about रवीन्द्रनाथ टैगोर - Ravindranath Tagore

Add Infomation AboutRAVINDRANATH TAGORE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२. पुनरागमन राईचरण नोकर म्हणून बाबूंच्या घरी आला तेव्हा अवघा बारा वर्षांचा होता. यशोधर जिल्ह्यात त्याचं घर होतं. लांब केसांचा, मोठ्यामोठ्या डोळ्यांचा, सावळ्या रंगाचा, सडसडीत राईचरण जातीनं आपल्या धन्यासारखाच कायस्थ होता. बाबूंच्या एक वर्षाच्या मुलाला- अनुकूलला- सांभाळायचं, त्याची देखभाल करायची हेच राईचरणचं मुख्य काम होतं. अनुकूलला राईचरणनंच लहानाचं मोठं केलं. अनुकूल शाळेत जाऊ लागला, मग कॉलेजात गेला, पुढे शिकून-सवरून न्यायाधीश झाला, तोपर्यंत एकटा राईचरणच त्याची सर्व देखभाल करत असे. पुढे अनुकूलबाबूंचं लग्न झालं. राईचरणची नवी मालकीण घरी आली. अनुकूलबाबूंवर राईचरणचा जेवढा अधिकार होता, त्यापेक्षा जास्त अधिकार अनुकूलच्या पत्नीला प्राप्त झाला होता. आता अनुकूलबाबूंची सर्व कामं तिनं स्वतःकडे _ घेतली होती. राईचरणला आता चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. परंतु थोड्याच दिवसांत अनुकूलबाबूंच्या पत्नीनं, नव्या मालकिणीनं, एका गोड मुलाला जन्म दिला आणि राईचरणला परत त्याच्या आवडीचं काम मिळालं. नवकुमारला सांभाळायचं काम राईचरणकडे आलं आणि त्याच्याकडून काढून घेतलेल्या हक्कांची भरपाई झाली. १६ / टागोरांच्या गोष्टी राईचरण नवकुमारला तऱ्हेतऱ्हेनं जोजवत असे. त्याचे दोन्ही हात धरून त्याला वर उडवत असे. त्याच्या तोंडाजवळ तोंड नेऊन त्याच्यापुढे मान डोलावत असे. त्याच्यासारखा सूर धरून असंबद्ध बडबड करताना तर राईचरणला खूप आनंद वाटे. नवकुमारही राईचरणला पाहून आनंदित होत असे. आता नवकुमार रांगत रांगत घराचा उंबरा ओलांडायला लागला होता. अशा वेळेस कोणी धरायला आलं की नवकुमार 'खी5 खी5' करून हसे आणि एखाद्या सुरक्षित जागी लपून बसे. त्याचं हे चातुर्य पाहून राईचरणला खूप आश्‍चर्य वाटे. राईचरण नवकुमारच्या आईला अतिशय विश्वासानं, अभिमानानं एखादं गुपित सांगावं तसं सांगे, 'तुमचं पोर मोठेपणी जज्ज होणार आणि पाच हजार रुपये पगार मिळवणार!' नवकुमारच्या वयाच्या दुसऱ्या कुणा मुलाच्या शहाणपणाबद्दल राईचरणला कोणी काही सांगू लागलं, तर त्याचा त्याच्यावर तिळमात्र विश्‍वास बसत नसे. पण भविष्यकाळात जज्ज होणाऱ्या नवकुमारबाबत मात्र त्याच्या दृष्टीनं काहीही अशक्य नसे. हळूहळू नवकुमार पावलं टकू लागला, डुलत डुलत चालू लागला. राईचरणच्या दृष्टीनं ती एक आश्‍चर्याचीच गोष्ट झाली. नवकुमार जेव्हा आईला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now