अभय बंग | ABHAY BANG
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
30
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
अनिल अवचट - ANIL AWACHAT
No Information available about अनिल अवचट - ANIL AWACHAT
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)द्या; पण फुलफ्लेज पेपर म्हणशील तर एवढेंच. त्यातले दोन आमचेच आहेत.
आपचे मायनर पेपर आणीखीही लॅन्सेटमध्ये आले, पण ते सोडा.
तुमच्या या संशोधनाचं इथल्या वैद्यकीय जगात कसं काय स्वागत
झाल ?
“अरे, नागपूर मेडिकलच्या लोकांना माहितीसुद्धा नसेल. राणी म्हणाली,
माझी एक (डॉक्टर) वर्गमैत्रीण बर्याच वर्षांनी भेटली होती. ती म्हणाली, तू
कुठं कोपऱ्यात जाऊन बसली आहेस ? अजून डोक्यातलं खूळ गेलेलं दिसत
नाही तुमचं ! सरळ नागपूरला प्रॅक्टिस सुरू कर. धो धो चालेल ! मोठ्ठ हॉस्पिटल
बांध.'' आमचे इथले डीन, आमचे सर. चांगले गृहस्थ आहेत. ते मला
बँकॉकला भेटले. डब्ल्यू. एच. ओ.' नं थर्ड वर्ल्ड कॉन्फरन्स बोलावली होती.
सगळे इंटरनॅशनल लेन्हलच्या तज्ज्ञांचे पेपर्स. माझा पेपर झाल्यावर ते मला
शोधत आले आणि म्हणाले, ''मला कल्पनाच नव्हती तुम्ही असा काही रिसंर्च
करताय.
ही दोघं आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचले असली तरी त्यांचं इथल्या
संस्कृतीशी नातं घट्ट आहे. वागण्यात पूर्वीचाच साधेपणा टिकून राहिलेला आहे
आंतरराष्ट्रीय पातळीवर सेमिनार्स, कॉन्फरन्सेस करीत फिरणाऱ्यांची एक जमात
असते. या दोघांचे तसं झालं नाही. महत्त्वाच्या पशिषिदांना, मीटिंगला ते जातात
पण तिथ त्यांना परिषदेतला प्रमुख निबंध वाचायला बोलावलेल असतं. मनानंही
ते या संस्कृतीतले असल्याने आरोग्याच्या प्रश्नाचा अगदी साधेपणानं पण नेमका
विचार करू शकतात. त्यांचे उपायही या मातीतले असतात.
'सिकल सेल अँनिमिया त्यांना या भागात सापडला. पुण्यातल्या
डॉ. सुदाम काट्याच्या सहकार्यानं व्यापक पाहणीही केली. त्यात 'सिकल
सेलचे वाहक खूप सापडले. या वाहकानी आपसांत लग्न करायचं टाळलं तर
काही वर्षानी नॉर्मल माणसांचं प्रमाण वाढत जाईल आणि सिकल सेल वाहकांचं
प्रमाण कमी होत कदाचित पूर्णपणे ते नाहीसंही होईल. उलट वाहकांनी आपसांत
लग्न केली तर प्रत्यक्ष सिकल सेल रोग झालेलं मूळ जम्मू शकेल.
अभयचं एक मी भाषण ऐकलं. तो म्हणाला, '' आपल्या गोंड लोकात
काही दैव असतात. एक देव, दोन देव, तीन देव, चार देव. एक देवाचं लग्न दोन
देवांशी होतं. तीन देवाशी, चार देवांशी होतं; पण एक देववाल्याचं लग्न एक
देववाल्याशी लागतं का ? (नाही) लाबलं तर काय होतं ? (*देवाचा कोप
होती.) मग आता एक नवीन देव आलाय. त्याचं नाव 'सिकल देव. आता
सिकल देववाल्याचं सिकछ देववाल्याशीच लग्न लागलं तर काय होतं, तर
सिकल देव कोपतो. कोपला की काय करतो, तर त्याच्या मुलांना त्रास होतो,''
असं सागून त्यानं सिकल सेलच्या स्लाईड्स दाखविल्या.
त्यानी आता गडचिरोलीजवळ चातगाव थेथे नवीन रुग्णालय बांधायचं
ठरवल तेव्हा आदिवासींना विचारलं. “आपल्या या दवाखान्याचं नाव काय
ठेवायचं ?*'
लोक म्हणाले, 'आमच्या गोंडाची देवी दंतेश्वरी आहे. (चंद्रपूरपासून
भंडारा, गोंदिया ते बस्तरपर्यंत गोंडाची लोकसंख्या पसरलेली आहे.) तिचंच
नाव द्या- मा दंतेश्वरी दवाखाना.
अभय मला म्हणाला, ' हे नाव अस्थॅटिकली मला रुचलं नाही, पण
ही दवाखाना त्यांचा आहे असं त्यांना वाटायला पाहिजे, म्हणून ते मी मान्य
केलं.
अभयचा शातपणा, विचारीपणा हे वैशिष्ट्य. तसं राणीचं सांगायचं झालं
तर तिचा झपाटा. ती सहसा शांतपणे वाचत बसलेली किंवा पडलेली दिसणार
नाही. दवाखान्यातून भरभर येणार, टोपलीतून भाज्या काढून चिरू लागणार.
तिकडे गॅसवर काही फोडणीला टाकणार. तिला म्हणायला गेलं की मला यातलं
काही काम सांग, तर म्हणायची, हे फार काम नाही. तू इथं बसून गप्पा मार
पहिल्या वेळी मी गेलो तर कामाला वर्ध्याहून येताना आणलेली एक मुलगी तरी
होती; पण पुढच्या वेळी तीही नव्हती. तेव्हा बाहेरचं प्रचंड काम सांभाळून
ती स्वयपाकच काय, पण धुणंभांडीही करायची. बोलता बोलता मुलांच्या
कपड्याच्या घड्या कर, आवराआवर कर, असं सारखं चाललेलं असे
जेवतानासुद्धा स्वतः नीट जेवायच्याऐवजी अनिल, तू हे थोडं घेणार का?', ते
थोड घेतोस का ?', 'तू गप्पांच्या नादात आज फारसा जेवला नाहीस. शेवटी
भात तरी घे, ' असं सारखं चालू ! तिची बोलण्याची शैली काळजी घेणाऱ्या
आईसारखी आहे
तिच्या ओ. पी. डी. त जाऊन बसणं हा एक अनुभवच असे. खेडूत
बायकांची गर्दी तिच्या खोलीबाहेर असे. तिच्यासमोर बाई येई तेव्हा ती बाई
मोहरूनच गेलेली असे. राणी “काय नाव, कुठं असता, किती मुलं. कधी
पिशवी धुतली होती का ?** (मला धुणं' या शब्दाची फार गंमत वाटे), असे
नाना तऱ्हचे प्रश्न विचारत समोर ठेवलेल्या, कॉम्प्युटरला सोईच्या केलेल्या
केसपेपर फॉर्ममधल्या चौकोनाचौकोनात टिकमार्क्स करीत असे. मग त्यात
तिच्या लक्षात त्यातला एखादा कळीचा तपशील आला, की त्यावर ती उत्खनन
सुरू करीत असे
User Reviews
No Reviews | Add Yours...