सागरशाळा | SAGAR SHALA

Book Image : सागरशाळा  - SAGAR SHALA

More Information About Authors :

देवेन्द्र कान्दोलकर - DEVENDRA KANDOLKAR

No Information available about देवेन्द्र कान्दोलकर - DEVENDRA KANDOLKAR

Add Infomation AboutDEVENDRA KANDOLKAR

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
एके ठिकाणी काही माणसं जाळ्याची दुरुस्ती करत होती. माझं “हाळी' देण्याचं काम संपल्यावर मी त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो. कोण, कुठला अशी माझ्यासंबंधी त्यांची चौकशी करून झाली. मला पाहताच, “हा कुठला बडा मासा आलाय आमच्या समुद्रकिनाऱ्यावर!' असंच जणू जाणून घेण्यासाठी आसपासची मुलं गोळा झाली. त्यांच्याकडे पाहत मी त्या वयस्कर लोकांना विचारल, “ही मुलं शाळेत नाही का जात?” जाळं बिणता-विणताच 'नाही' या अर्थानं एकानं मान हलवली. “का?! “इथं कुठली आली शाळा! आम्हाला इथं प्यायला पाणी नाही मिळत. रस्ता नाही, लाईट नाही. जिथं आम्हाला राहायची धड सोय नाही, पिण्याच्या पाण्याची कुणी व्यवस्था करत नाही, तिथं शाळा कोण बांधणार?” “किती बर्ष राहता इथं?'' *'आमच्या आजोबा -पणजोबापासून.'' “तुमच्यामध्ये किती जण शिकलेले आहेत?” ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले. एक जण उजव्या हाताची बोटं हलबत म्हणाला, “इतके लोकसुद्धा सही करणारे सापडणं मुष्कील. मला बसलेला हा आश्‍चर्याचा धक्का भूकंपाहूनही जबरदस्त होता. एवढ्या मोठ्या संख्येनं असलेली ही मुलं शिक्षणापासून वंचित राहिलेली पहिल्यांदा पाहत होतो. अम्ब्युलन्सचा हॉर्न कानांवर आला. बहुधा डॉक्टरांचे पेशंट तपासून झाले असावेत. मच्छीमारांचा निरोप घेऊन मी लगबगीनं अम्ब्युलन्सच्या दिशेनं आलो. डॉक्टर माझीच वाट पाहत थांबले होते. कांजीनं अम्ब्युलन्स सुरू केली. वाळूवरून गरगरत चाक पुढं-पुढं जात होती; पण मागच्या सीटवर बसलेल्या माझं लक्ष मात्र त्या मुलांच्याच मागे-मागे धावत होतं. या मुलांसाठी काहीतरी करणं आवश्यक होतं. काहीतरी म्हणजे नक्की काय? शिक्षणाची सोय, शक्‍य होईल का ते? कोण करेल? कधी? कशी? प्रश्‍न, प्रश्‍न आणि प्रश्‍नचिन्हंच! दुसऱ्या आठवड्यात मी पुन्हा अम्ब्युलन्समधून बावडीबंदरला गेलो. यावेळी २८ । सागरशाळा सहज, रिकामा आहे म्हणून नाही, तर खास वेळ काढून, ठरवून. दोन दिवसांपूर्वी शेजारच्या एसटीडी बूथवर लांबट दाढी, पांढराशुभ्र कुर्ता- पायजमा व डोक्यावर गोल टोपी घातलेले एक इसम भेटले होते, तेच आज बावडीबंदरला दिसले. त्यांना मदतीला घेऊन बावडीबंदरच्या हरएक झोपडीत जाऊन तीन ते चौदा वर्ष॑ वयोगटातील मुलांची यादी बनवली आणि संध्याकाळी परत आल्यावर सेंटरचे कोऑर्डिनिटर धेंद्रजींच्या हाती दिली. “ह्या मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी तजवीज करायला हबी.”' “'ग्रस्ताव चांगला आहे. पण त्यासाठी पैसे कुठून आणायचे ?'' कोऑ्डिनेटर- समोरही प्रश्‍न होताच. भूकंपानंतर कच्छमध्ये अनेक संस्था आल्या. फंडिंग एजन्सीही आल्या. गहू, तांदूळ, डाळी, औषधं, कपडे, ब्लँकेट अशी हंगामी स्वरूपाची मदत मिळाली. अनेक ठिकाणी धरं उभी राहिली. शाळांसाठी टुमदार इमारती बांधून दिल्या. परंतु शिक्षणापासून पिढ्यान्‌पिढ्या शेकडो कोस दूर असणाऱ्या ह्या निरक्षर मच्छीमारांकडे कुणीचं लक्ष दिलं नव्हतं. भारतीय संविधानाचं पंचेचाळिसावं कलम सांगतं - “सहा ते चौदा वर्ष॑ वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षणाची सुबिधा उपलब्ध करून देण्यात येईल.' तर मग ही मुलं शिक्षणापासून वंचित का? का माही सरकारनं ह्या एवढ्या संख्येनं मुलं असलेल्या भागात शाळा सुरू केली? १८ ऑक्टोबर २००१. मुद्रा तालुका शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांना बाबंडीर्बदर इथं प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी विनंती केली. जिल्हाधिकार्‍यांना अर्जाच्या प्रती पाठवल्या. त्याच दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री नरेद्र मोदी जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कच्छमध्ये आले होते. त्यांनाही धेंद्रजींनी निवेदन दिलं. परंतु ही सारी निवेदनं कुठल्या फायलीखाली गडप झाली काही कळलंच नाही. कच्छमध्ये काम करणारी एक मोठी संस्था भूजमध्ये आहे. त्यांच्याकडून काहीतरी मदत मिळेल या आशेनं धमंद्रजी ब भी त्या संस्थाप्रमुखांना भेटलो. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर पुन्हा एकदोनदा भेटून आलो; पण पदरात काहीच पडलं नाही. इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहानं वाचकांकडून पैसे गोळा करून राष्ट्र सेवा दलाकडे दिले होते. सेवा दलानं तो निधी “युसुफ मेहर॒अली सेंटर'कड़े सुपूर्द केला होता. त्या पैशांतून कुवाईपद्दर इथं पारधी समाजातील लोकांसाठी घरं उभारायचं काम सुरू होतं. त्याची पाहणी करण्यासाठी सेवा दलाच्या विश्‍वस्त सुधाताई वर्दे पहिली सागरशाळा । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now