महाराष्ट्राचे शिल्पकार - एस० एम० जोशी | MAHARASHTRACHE SHILPKAR - S. M. JOSHI

Book Image : महाराष्ट्राचे शिल्पकार - एस० एम० जोशी  - MAHARASHTRACHE SHILPKAR - S. M. JOSHI

More Information About Authors :

ग़० प्र० प्रधान - G. P. PRADHAN

No Information available about ग़० प्र० प्रधान - G. P. PRADHAN

Add Infomation AboutG. P. PRADHAN

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२४ एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते हा पुरोगामी विचार असून या विचाराच्या आधारे होणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीत समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी सहभागी झालेच पाहिजे. रॉय यांच्या 'ब्लू बुक'ची एक प्रत येरवडा तुरूंगात एस्‌. एम्‌. यांना मिळाली, त्यांनी ती अभ्यासिली आणि त्यांना त्यातील भूमिका पुरेपुर पटली. एस्‌. एम्‌. यांच्याप्रमाणेच त्यांच्याबरीबर तुरूंगात असलेले यशवंतराव चव्हाण, द्वा. भ. कर्णिक, ह. रा. महाजनी आदींनाही रॉय यांचे विचार पटले. एस्‌. एम., यशवंतराव, आचार्य भागवत आदींना येरवडा तुरूंगातून विसापूर तुरूंगात पाठविण्यात आले. शिक्षेची मुदत संपल्यावर नोव्हेंबर १९३३ मध्ये एस्‌. एम्‌. सुटून आले. एस्‌. एम्‌. येरवडा तुरूंगात होते त्या वेळी त्यांचे सहकारी ना. ग. गोरे नाशिकच्या तुरुंगात होते. १९३०च्या तुरुंगवासानंतर गोरे यांनीही मार्क्सच्या ग्रंथाचे वाचन सुरू केले होते आणि समाजवादी विचारसरणीबद्दल त्यांनाही आकर्षण वाटू लागले होते. नाशिकच्या तुरुंगात त्यांच्या समवेतच जयप्रकाश नारायण, युसुफ मेहेरअल्ली, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता आदी मंडळी होती. जयप्रकाश नारायण हे अमेरिकेत शिकण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथेच मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला. अच्युतराव पटवर्धन हे बनारस हिंदू युनिव्हसिटींच्या कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना धिऑसफीबद्दल आकर्षण वाटे. परंतु स्वातंत्र्य चळवळीत पडल्यावर त्यांनाही मार्क्सचे विचार पटू लागले. या सर्व मित्रांनी तुरुंगात असे ठरविले की सुटून बाहेर गेल्यावर काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करावयाची. तुरुंगातून सुटल्यावर बिहार मध्ये पाटणा येथे पहिली समाजवादी परिषद भरली. एस्‌. एम्‌., गोरे, मेहेरअल्ली, अच्युतराव, मिनू मसानी, अशोक मेहता आदी मित्र त्या परिषदेला गेले होते. काशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे स्फूर्तिस्थान असणारे इतिहासाचे गाढे अभ्यासक, आचार्य नरेन्द्र देव, जयप्रकाश नारायण, डॉ. लोहिया आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी या परिषदेत पुढाकार घेतला. मार्क्सच्या तत्वज्ञानाने प्रभावित झालेल्या या सर्वांना स्वातंत्र्य चळवळीत समाजवादी आशय आलाच पाहिजे असे उत्कटतेने वाटत होते. गांधीजींच्या केवळ रचनात्मक कामामुळे या देशात पुरेशी शक्ती निर्माण होणार नाही. ती निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कामागारांच्या संघर्षशील संघटना बांधल्या पाहिजेत, असा समाजवादी विचारांच्या या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र कोणत्याही . परिस्थितीत स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहापासून दूर जायचे नाही, कम्युनिस्टांनी केलेली चूक करायची नाही, याबद्दलही या सर्वाचे एकमत होते. २१ ऑक्टोबर १९३४ला मुंबईस काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली. स्वातंत्र्य संग्रामातील समर्पण २५ जयप्रकाश नागयण हे जनरल सेक्रेटरी आणि नानासाहेब गोरे हे जॉईंट सेक्रेटरी झाले. एस्‌. एम्‌. कार्यकारीणीचे सदस्य होते. एम. एन. रॉय हे तुरूंगात होते आणि त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी दुसऱ्या दिवशी चौपाटीवर सभा होती. काँग्रेस सोशलिस्ट पार्टीतर्फे एस्‌. एम्‌.ना सभेत बोलण्यासाठी पाठविण्यात आले. जेलमध्ये उर्दूचा अभ्यास उत्तम असल्यामुळे एस. एम यांनी हिंदीत भाषण केले. भाषणात ते म्हणाले, “जब फ्रेंच रेव्होल्युशन हुआ तब बॅस्टिल जेल तोडके लोगो ने अपने साधियोंको रिहाई किया था। जब हमारी जीत होगी तब कॉ. रॉय रिहा होंगे!” त्या भाषणाला खूप टाळ्या पडल्या. एस्‌. एम्‌. पुण्याला गेल्यावर आठ दिवसांनीच त्यांना अटक करण्यात आली. चौपाटीवरील भाषणाबद्दल त्यांना ४ डिसेंबरला दोन वर्षांची शिक्षा देण्यात आली. यापूर्वी १९३३ साली सुटका झाल्यानंतर एस्‌. एम्‌.ने सेकंड एल.एल.बी.ची परीक्षा दिली. जामिनावर मुक्त असताना त्यांनी वकिलीची सनद काढली परंतु वकिली सुरू करण्यापूर्वीच चौपाटीवरील भाषणाबद्दल शिक्षा झाली आणि एस्‌. एम्‌.ना जानेवारी १९३५मध्ये साबरमती तुरुंगात पाठविण्यात आले. एस्‌. एम्‌.ना 'क' वर्ग देण्यात आला होता. ही दोन वर्षे फार कष्टाची गेली. दोन कडक उन्हाळे त्यांनी तेथे काढले. या उन्हाळ्यामुळे त्यांचे वजन १०३ पौंडावर आले. असे हाल होत असतानाही एस्‌. एम्‌. गुजराती शिकले. भाषा आत्मसात झाल्यावर अनेक गुजराती कादंबऱ्या त्यांनी वाचल्या. मार्क्सचे 'कॅपिटल' मिळविले होते. तेही वाचले. एस्‌. एम्‌. यूथ लीगचे काम करीत असताना १९३२ साली तारा पेंडसे ही विद्यार्थीनी त्यांना भेटायला आली. तिने एस्‌. एम्‌.कडे समाजवादावरील पुस्तके मागितली. त्यातून दौघांची ओळख झाली आणि मैत्री जमली. एस्‌. एम्‌. साबरमतीच्या तुरूंगात होते त्यावेळी तारा पेंडसे पुण्याला कर्वे विद्यापीठात शिकत होती. तिची नियमाने एस्‌. एम्‌.ना पत्रे येत. दोघांची मने जुळली होती. साबरमती जेलमध्ये असह्य उन्हाळा होता. जेवायला मिळणारे अन्न निकृष्ट आणि बेचव होते. प्रकृती बिघडत होती. परंतु तारा पेंडसेच्या पत्रातून व्यक्त होणाऱ्या प्रेमामुळे हेही सुसह्य होत होते. १ ऑगस्ट १९३६ला एस्‌. एम्‌.ची साबरमती तुरुंगातून सुटका झाली. सुटकेच्या वेळी एस्‌. एम्‌.चे मित्र आणि काँग्रेस सोशलिस्ट पार्टीतील सहकारी प्रा. दातवाला एस्‌. एम्‌ू.ना घरी घेऊन गेले. त्या दिवशी लो. टिळकांची पुण्यतिथी होती. एका हॉलमध्ये सभा होती. एस्‌. एम्‌.ना बोलण्यास सांगण्यात




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now