नाट्यप्रसंग | Natyaprasang

Natyaprasang by

More Information About Author :

सतीश बाबारावजी पावड़े - Sateesh Babaraoji Pavde
Read More About Sateesh Babaraoji Pavde

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सद्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापिठात परफार्मिंग (फिल्म आणि थिएटर) विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. सतीश पावडे हे एक प्रसिध्द नाटककार, दिग्दर्शक, नाट्यसमीक्षक, नाट्यसंशोधक, अभिनेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून ते नाटक व चित्रपटाच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांचे भरीव असे योगदान राहिले आहे. वृत्तपत्रीय सेवेत असतांना नाट्यसमीक्षक, सांस्कृतिक वार्ताहर आणि साहित्य संपादक म्हणून त्यांनी पंधरा वर्षे काम पाहिले आहे. मराठी रंगभूमीच्या दिडशे वर्षाच्या इतिहासाचे माहितीपटाच्या रूपात जतन करण्यासाठी शासनाकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. वेड्यांची इंडस्ट्री या नाटकापासून त्यांच्या नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. मराठी रंगभुमीचा १५० वर्षाचा इतिहास मांडणारे मराठी नाट्यसंसार हे तीन अंकी नाटक लिहून १९९३ मध्ये रविंद्र नाट्यमंदिर मुंबई येथे ९० कलावंतांच्या सहभागाने विक्रम गोखले, विजय तेंडुलकर यांच्या उपस्थितीत सादर करण्याचा इतिहासही डॉ. सतीश पावडे यांच्या नावाने आहे. शंभराहून अधिक नाट्यकार्यशाळेचे आयोजन त्यांनी केले आहे. डॉ. सतीश पावडेंनी नाट्यविषयक सुमारे वीस पुस्तके लिहिली आहेत. नाट्यक्षेत्राच्या वैचारिक प्रक्रियेतील परिवर्तनाचा तटस्थ धांडोळा घेणारा हा त्यांचा नाट्यप्रपंच प्रकाशित झाला आहे. दहाहून अधिक माहितीपट, डॉक्युड्रामा, व्हिडीओ फिल्स त्यांच्या नावावर आहेत. दोन वेळा ते महाराष्ट्र सरकारच्या नाटक सेन्सार बोर्डाचे सदस्य होते. संगीत नाटक अकादमीच्या राष्ट्रीय शोधवृत्तीचे ते मानकरी आहेत. २०१७ पासून राज्य सरकारच्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सल्लागार तथा विदर्भ प्रांताकरीता नाट्यकला अध्यायाचे लेखक, संकलक, संपादक, विशेष तज्ञ आणि समन्वयक म्हणून ते सेवा देत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून अनेक संस्थानी आणि राज्य शासनाने त्यांना गौरवान्वित केले आहे. 'स्मिता पाटील स्मृती पुरस्कार', 'नाट्याचार्य सोन्याबापू पुरस्कार', 'पु.भा. भावे पुरस्कार', 'युनेस्को क्लब्स अवॉर्ड', 'मॅग्नम हॉनर पुरस्कार', 'श्रेयस नाट्यकला गौरव पुरस्कार', महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंडळाचा चारदा उत्कृष्ट नाट्यलेखक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार पुरस्कार, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचानालयाचा मामा वरेरकर नाट्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांच्या संदर्भात आणखी एका बाबीचा उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे सतीश पावडे हे नागपूर विद्यापीठाच्या ललित कलाशाखेची पहिली पीएच.डी. मिळविणारे (१९९७) विद्यार्थी आहेत. डॉ. सतीश पावडे सरांनी रसिकाची, नटाची, लेखकाची, समीक्षकाची, भाष्यकाराची आणि एक उत्तम-आदर्श माणसाची भूमिका अत्यंत समर्थपणे पेललेली आहे. आयुष्यभर नाटक जगणारा, अतिशय कल्पक बुद्धीचा, अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा हा कलावंत आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now