श्री विष्णु सहस्त्रनाम चिन्तनिका | Shri Vishnu Sahastranam Chintanica

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Shri Vishnu Sahastranam Chintanica by कुंदर दिवाण -kundar diwann

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about कुंदर दिवाण -kundar diwann

Add Infomation Aboutkundar diwann

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
सत्योपासना हें भारतीय आर्य परंपरेच्या दीर्घ जीवित्वाचें नि महत्तेचें रहस्य होय. सनातन सत्याचा अखंड शोध हाच वैदिक ऋषींचा धर्म आगि त्यासाठीं कुठल्याहि ठरीव आचाराला वा विचाराला आपल्याला कायमचें बांधून न घेणें सत्याचें ग्रहण करायला बुद्धि सदैव खुली राखणें हाच त्यांचा संप्रदाय. बुद्ध फल अनाग्रह हैं त्या सत्योपासकांचेंच सूत्र होय आणि तेंच सनातनत्वाचें मर्म. . या सत्यग्राही नि अनाग्रही वृत्तीचाच परिणाम हा कीं या हिन्द धर्माचें संस्कृतीचें नि पंरंपरेचें अमुक एक लक्षण सांगणें अशक्य आहे. ईश्वराला मानणें हें हिंदु धमचिं व्यावर्तक लक्षण आहे काय ? नाहीं. सांख्यवादी नि पूर्वमीमांसक ईश्वर मानीत नसूनहि ते हिंदु आहेत. विष्णुनामसहप्रांत एवढ्याचसाठी महर्षि कपिलाचार्य _ असें नांव येऊं शकलें. वेदांना प्रमाण मानणें हैं हिंदु धर्माचें लक्षण आहे काय? नाहीं. सांख्यवादी चार्वाकवादी लोकायतिक योगवादी जैन बौद्ध हें सर्व हिंदु असून . ते वेदांना मानीत नाहींत. वेदान्तीहि वैदिक यज्ञकांडाला मानीत नसल्यामुढें तेहि वस्तुत अवैदिकच होत. वर्णाश्रिम धर्म मानणें हें हिंदु धर्माचें लक्षण आहे काय ? नाहीं. जैन बौद्धच नव्हेत तर महानुभाव शीख ब्राह्मसमाजी इत्यादिहि वर्णाश्रिम धर्म मानीत नाहीत. तरी ते सर्व हिंदुच होत. अमुक एका गुरूला मानणें हैं हिंदु धम्षचिं लक्षण आहे काय? नाहीं. कोणी कोणालाह्दी गुरु मानावें नि भजावें. त्याला प्रतिबंध नाहीं. पीराला भजणारे हिंदु आहेत. महंमदाला व ख़िस्ताला गुरु मानणारेहि हिंदु असूं. शकतात. दयानंद रामकृष्णादि अवतारांना मानीत नाहीत तरी ते हिंदुच आणि दयानंदांनाच मानणारे आर्यसमाजीहि हिंदुच. गोभक्ति हैं हिंदु धर्माचें लक्षण आहे काय? नाहीं. गाईला एक पशु कदाचित्‌ भक्ष्यहि मानणारे सावरकर हि हिंदुच होत. यज्ञ याग ब्रत उपवास तीर्थयात्रा दान इत्यादि अमुक एक आचार करें हें हिंदु धर्माचें लक्षण आहे काय ? नाहीं. कोणताही विशिष्ट विधि करणें वा न करऐें हें हिंदु धर्माचें लक्षण नाहीं. यज्ञ दान तप आणि स्वाध्याय न करणारे हिंदु आदहेत विशिष्ट चिह्न यज्ञोपवीत शिखा भस्म गंध इत्यादि वा लंगोठी पंचा धोतर साडी वगैरे पोषाख हिंदु धर्माचें लक्षण आहे काय? नाहीं.. कोणतेंहि चिंह्ल वा पोषाख धारण करणें वा न करें हिंदु धर्माचें लक्षण नाहीं. वि वाय ९७६ दोन _ अठरा बिनशेंडीचा बिन ज़ानव्याचा भस्म वा गंध न लावणारा हवा तो पोषाख केलेला हिंदु असूं शकतो. भारत देशाचा अभिमान बाठगणें वा भारतांतच वास्तव्य करें हें हिंदु धर्माचें लक्षण आहे काय? नाहीं. स्वदेशो भुवनत्रयम्‌ म्हणणारे शंकराचार्य हिंदुच होते आणि अनेक लोक परदेशांत जन्मलेले आणि मेलेले हिंदुच होते आणि आहेत. तात्पर्य को गत्याहि व्याख्येंत हिंदु धर्म बसवतां येत नाहीं. व्यवहारत जो कोणी आपल्याला हिंदु म्हणेल तो हिंदु अशी व्याख्या होऊं शकेल आणि तत्त्वत जो कोणी सत्यग्राही नि अनाग्रही वृत्ति बाठगून अग्राम्य नि अननार्य जीवनांत उत्तरोत्तर निरन्तर आरोहण करण्याचा सोत्साह पराक्रम करील तोच हिंदु म्हटला पाहिजे आर्य म्हटला पाहिजे. आणि अशा आर्यत्वाची जगाला दीक्षा देण्याची पात्रता हि त्याच्याच ठाई संभवते. कृण्वन्तो विश्व आर्यम्‌ विश्वाला आर्यत्वाची दीक्षा देत.असे आत्मे जगांत॑ सदेह वा विदेह संचरत असतात. आशा दीक्षागुरूंच्या चिंतनाचा एक नमूना म्हणजे हें नामसहम्र होय. २ महाभारत आणि नामसहग्र आर्याचा धर्म तत्त्वशान संस्कृति किंबहुना संपूर्ण लौकिक व पारलौकिक जीवन यांचें मूठ वेद होत. म्हणून त्यांचें महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांचा अस्वीकार आणि अनादर करणाय्या भल्याभल्यांना त्यांचा विचारांश मान्य करूनहि भारतीय आर्यानीं फेकून दिलें आहे. जैन आणशि बौद्ध संप्रदायांच्या प्रवर्तकांचें त्यांच्या वाडमयाचें आणि अनुयायी वर्गाचें भारतांतून. जवछपास उच्चाटन होण्याचें मुख्य कारण हेंच होय. अतुलित महिमा वेद की तुलसी कियो विचार। जो निन्‍्दत निन्दित भये बिदित बुद्ध अवतार।। आशा या वेदांचा विस्तार म्हणजे महाभारत होय. म्हणून त्याला पंचम वेद असें गौरवपूर्ण अपर नामाभिधान लाभलें आहे. महत्त्वाद भारवत्त्वाच्च महाभारतमुच्यते । महाभारताचें हें महत्त्व आणि हा भार लक्षणीय होय. अशा या महाभारताच्या अनुशासनपर्वात हैं सहप्र आलेलें आहे. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरानें प्रकाशित केलेल्या महाभारताच्या चिकित्सित आवृत्तीं त अनुशासन पर्वाचा १३५ वा अध्याय म्हणजे विष्णुसहम्रनामस्तोत्रच होय. प्रास्ताविक आणि उपसंहारात्मक भाग अनुक्रमें श्लोक १ ते १३.आणि श्लोक भ्




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now