काळांतीळ निवडक निबंध भाग - १० | Kaalaantiil Nivadak Nibandh Bhaaga 10

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaalaantiil Nivadak Nibandh Bhaaga 10 by शिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Author :

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(४७) ऱ्तळपत राहिलें पाहिजे. नागरिकाचे हक्क आणि वसाहतीचे स्वराज्य ही सर्व मृत्सद्देगिसीची भाषा राजदरबारी कारस्थानांना खुशाल उपयोगी असो; पण जनतेचा आत्मा स्वातंत्र्याच्या उद्घोषानें आणि तळमळीनेंच जागत होत असतो. त्या वेळीं काँग्रेस ग्हणजे नेमस्तांची काँग्रेस, सनदशीर पद्धतीनें चारदोन हक्क मिळवावे अश्यासाठीं घडपड धरण्याचे त्यांचें राजकारण असे, सरकारला सांगून सांगून ते काय सांगत १ तर-- “पूर्वी जं झबलें अम्हांस शिवले आतां न अंगास ये ॥* तेव्हां आतां वाढत्या अंगाचें दुसरें झबलें शिवून द्या. याच्याऐवजीं * रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें १? असा सदेश राष्ट्रापुढें ठेवला पाहिजे म्हणजे त्याची दिद्याभूल होणार नाहीं * आणि स्वातंत्र्याच्या तोल्ाचाच प्रयत्न त्याच्या हातून होईल अशी विचारसरणी शिवरामपत महाराष्ट्राला एकसारखे सुचवीत राहिले. या सूचनेप्रमाणे त्यांच्या हातून प्रत्यक्ष अशी कांहीं कृति घडली नाहीं अशी टीका आजकाल कांहीं लोक करतात, मनुष्यानें एखादें सत्कृत्य केलें तर त्यानें दातकृत्य केलें नाहीं ग्हणून तो कमी ठरतो अशी टीका केव्हांहि कोणावरहि करतां येईल, गाय घोडा नाहीं किंवा घोडा गाय नाहीं हाहि त्या त्या प्राण्यांचा दोष आहे असें म्हणतां येईल. यात्रेकरूंना त्यांच्या निजवामाचा रस्ता अचूकपणे दाख- विणार्‍्या रस्त्यावरील मार्गदर्चक पाटीलाहि म्हणतां येईल कीं, “तूं रस्ता दाखवितेस तर चालून कां दाखवीत नाहींस १? त्या त्या य॒गांतील त्या त्या लोकांकडे देवाने त्यांच्यापुरती कामगिरी सोपविलेली असते. उघड बंडाचा संदेश आणि इतिहासपूत गुप्तकटांचा मार्ग जरी शिवरामपंतांनीं राष्ट्रापुदढे ठेवला तरी तशा प्रकारच्या कामाला लागणारी पूर्वतयारी त्यांचेकडे नव्हती. पण पुढें जेव्हां गांधींनी उघड जाहीर केलें आणि नवीन प्रकार ऱ्वी साधना राष्ट्रापुढें मांडली तेव्हां शिवरामपतांचा स्वातंत्र्यासाठी तळमळत अस- लेला आत्मा खडबडून जागा झाला आणि त्यांनीं उघड बंडाच्या उघडया सामुदायिक मार्गांत हिरीरीने भाग घेतल्य. एवढेंच नव्हे तर गांधीयगांत त्यांनी जे लेख लिहिले त्यांतून वक्रोक्ति, व्यंग्य वगैरे सवं अलंकार काढून टाकून सरळ सरळ भाषा ते बोलं लागले. काळकतं परांजपे आणि स्वराज्यकते परांजपे व्यक्ति एकच, पण त्यांना आतां घालून पाडून बोलण्याचा कंटाळा आला. मर्दाची




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now