महाभारत कर्णपर्व ८ | Mahaabhaarat Karanaparv 8

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महाभारत कर्णपर्व ८  - Mahaabhaarat Karanaparv 8

More Information About Author :

No Information available about दामोदर केशव ओक - Damodar Keshav Ok

Add Infomation AboutDamodar Keshav Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उपोद्धात. ७७ जा जा उत्साह, तेज, विद्या, दिक्षा, बळ, चय, शौय दोघांचें । तुल्यचि, ज्यापरि गगायमुनांच्या पावनत् ओघांचें. ॥ ( कर्णपवै, अध्याय ४६ गीति ४) एकादा ग्रंथासंबंधीं अशा कांहीं गोष्टी असतात कीं, तो ग्रंथ वाचावयास आरंभ करण्या- पूर्वी जर त्या वाचकांस माहीत असल्या, तर त्यांतील विषय किंवा कथासंदर्म त्यांस सम- जावयास अडचण पडत नाहीं. तोच न्याय प्रस्तुत पवासही लागू आहे. याकरितां ह्या पवाचा नायक जो वीराप्रणी कर्ण त्याचा जन्म, त्याचें बाळपण, पालन, पोषण व ॒ शिक्षण आणि व्यानें केलेले पराक्रम इत्यादि कार्णपर्वांतील कथाभागापूर्वीच्या कर्णविषयक गोष्टी व प्रस्तुत पर्वांशीं संबद्ध असलेले आणखी कांहीं मुंदद वाचकांस सादर करीत आहों. १. कणांच्या चरिच्राचा प्रवांधे. यदुकुलोत्पन्न शूर नामक राजाची कन्या पथा ही होय. तिला कुतिभोजराजानें दत्तक घेतल्यामुळें तिचें नांव कुंति असें पडलें, व प्रचारांत तेंच नांव विशेष रूढ झालें. ती कुमारी असतां दुर्वांसक्रषि एकदां कुंतिभोजराजाकडे आले होते. त्या वेळीं त्या कोपिष्ठ न्दषींची तिनें उत्तम प्रकारें सेवा केल्यामुळें ते प्रसन्न झाले व ट्यांनीं तिला खूर्य, यमधम, वायु, इद्र व अश्विनी कुमार ह्या देवतांचे मंत्र देऊन सांगितलें, कीं, “कारणपरखें तुला जेव्हां पुत्र असावे अशी इच्छा होईल, तेव्हां तूं यांपैकी ज्या कोणाचा जप करिशील तो देव प्रगट होऊन तुझं इच्छित तुला प्राप्त करून देईल.” एकदां हिच्या मनांत आलें की, आपण मंत्र- प्रभावाचा खरेखोटेपणा पाहावा, व व्याप्रमाणें तिनें खूयाचा मंत्र जपून त्याचें आवाहन केलें. तेव्हां मुष्यदेहधारी खर्य तिच्यापुढे येऊन उभा राहिला व आपलें आवाहन कां करण्यांत आहें यासंबंधीं विचारपूस करूं लागला. तेव्हां तिनें त्याचें आवाहन करण्याचा हवेठु त्यास सांगितला. नंतर खूयीच्या कृपेनें हिच्या पोटीं *सहजकवचमणिकुंडलधर रुन्विर” असा पुत्र जन्मास आला ( पंतकृत आदिपर्व, अध्याय १७ ). परंतु ती अविवाहित अस- त्यामुळें तिनें लज्बेसुळें त्याला एका पेटींत घाळून नदींत सोडून दिलें. ती पेटी त्या जलप्रवाहांतून वाहात जात असतां अधिरथ नामक सूतास सांपडली. ती उघडून पहातां तींत एक सुंदर बालक त्यास आढळला. तो निपुत्रिक असल्यामुळे त्या मुलास पाहून त्याला फार आनंद झाला, व त्याला घरीं आणून त्याचें पालनपोषण करण्यास त्यानें आपल्या राघा नामक पत्नीस सांगितलें, त्या सुलाला पाहून तिलाही फार आनंद झाला व तिनें पतीकडून त्याचें नालच्छेदन, जातकर्म इत्यादि संस्कार करविले व त्याचें नांव ब्सुषेण असें ठेविलें, (ह्याचें नांव कर्ण भसें कां पडलें तें पुढें सांगितलें काहे ). दयुषेण प्रीढ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now