महाभारत ४ | Mahaabhaarat 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahaabhaarat 4  by दामोदर केशव ओक - Damodar Keshav Ok

More Information About Author :

No Information available about दामोदर केशव ओक - Damodar Keshav Ok

Add Infomation AboutDamodar Keshav Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
घ्ऱु त्यांच्याकडे वाचकांनी लक्ष दिल्यास त्यांत कांहीं सरर्‍्‌स पाठ आढळतील, म्हणून त्यांच्याकडे त्यांनीं दुळक्ष करूं नये, अशी त्यांस सूचना आहे. ७. ती. के. वामन दाजी ओक यांनीं श्रीमंत सरसेनासाहेब सुभे भोसले सरकार, नागपुर, यांच्या हस्तलिखित ग्रंथभांडारांतील मूळ प्रतीवरून उतरवून घेतलेली मेराळकृत विराटपर्वांची प्रत आमच्या संग्रहीं होती. तिचा उपयोग आम्हीं कसा करून घेतला आहे, हें पुस्तकाच्या शेवटीं जोडलेल्या परिशिष्टां- वरून वाचकांच्या लक्षांत येईल. मुक्तेश्वर व मेराळ यांचा परस्परांशी वस्तुतः कांहीं संबंध होता, असें दिसत नाहीं. तथापि युक्तेश्वराच्या काब्ययुणांवर भैराळ किती लुब्ध झाला होता व त्याच्या मनांत म्ुक्तेश्वराविषयीं केवढा पूज्यभाव वसत होता, हें दिसून येतें. (पुस्तकाच्या शेवटीं दिलेल्या परिशिष्टांतील पहिल्या परिशिष्टाचा ५७ वा परिच्छेद पाहावा). भेराळाच्या विराटपर्वासारखे कित्येक ग्रंथ वाचकांच्या व प्रकाशकांच्या अभावामुळे आतांपयेत नष्ट झाले असतील. पण ह्या गोष्टीस आतां उपाय नाहीं. तथापि जे ग्रंथ सुदैवाने अद्याप अनज्ञात- वासांत असतील ह्यांचे प्रकाशन करणें हें देवालयाच्या जीणाद्वारापेक्षां ज्यास्त पुण्यदायक, दीर्तिप्रद व महत्वाचें आहे, असें आमचें मत आहे. मुक्तेश्वराच्या विराटपर्वांच्या प्रकाशनाच्या संघीचा फायदा घेऊन भेराळाच्या कृतीचा थोडासा मासला वाचकांस दाखवितां आला व ती० कै० वा, दा, औक यांच्या संप्रहांतील एका अप्रसिद्ध ग्रंथाचा अंशतः उपयोग करून घेण्याचा सुयोग आम्हांस लाघला, ही आमच्यावर ईश्वराची मोठी कृपा होय. ८. पुढें पुस्तकाच्या शेवटीं परिशिष्ट १ यांत ओवीबद्ध विराटपर्व रचणारे मेराळकवि यांच्या संबंधानें कांहीं माहिती दिली आहे. ती छापून झाल्यानंतर आम्हांस पंढरपुरास जाण्याचा व श्रीपांडुरंगाचें दशन घेण्याचा अचानक योग आला. तेथें मोरोपंतांचें ( वस्तुतः त्यांचे चिरंजीव रामकृष्णपंत यांचें) वसति- स्थान, बाबा पाध्ये यांचा वाडा व ह्यांची समाधी, विठोबादादा चातुमासे यांचा मठ व ह्यांत त्यांची-ह्यांस दादामहाराज अर्स॑ म्हणण्याचा प्रघात आहे-व ह्यांचे चिरंजीव भेराळबोवा यांची समाधी इत्यादि महत्वाच्या व पवित्र स्थळांचें दशन घेतां आलें.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now