महाभारत १ | Mahaabhaarat 1

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Mahaabhaarat 1 by दामोदर केशव ओक - Damodar Keshav Ok

More Information About Author :

No Information available about दामोदर केशव ओक - Damodar Keshav Ok

Add Infomation AboutDamodar Keshav Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ररे नाहीं. तथापि गुणी जनांची पारख करण्याचें कौशल्य त्यांच्या अंगीं भरपूर असल्यामुळें त्यांनीं रा० मोडक यांची अचूक निवड केली आणि शेटजींचा शब्द खालीं पट्ं न देतां त्यांनीं ग्रंथसंशोधनाचें, अर्थनिणयक व अवांतर माहितीच्या टीपा देण्याचें आणि कवींची चरित्रं वगेरे लिहिण्याचें काम पतकरिलें. यामुळें शेटजींनीं उपरिनिर्दिष्ट मासिक पुस्तक १८९० च्या जानेवारीपासून सुरू केलें. परंतु रा० मोडक यांच्या अकालशृत्यूमुळें त्यांच्या दातून त्याचे फक्त तीनच अंक निघाले ! रल्नागिरीस असतां जनादंनपंतांस ज्योतिषशास्त्राची गोडी लागली व ह्या शास्त्रांत बरीच पारंगतता मिळविल्यावर यांनीं “आस्कराचाये व तत्कृत ज्योतिष? आणि 'वेदांग ज्योतिषाचे मराठी भाषांतर हीं दोन पुरके प्रसिद्ध केलीं. या विषयांत यांची इतकी गति झाली कीं, सायन पंचांग व निरयन पंचांग यांच्या संबंधानें यांनीं प्रसिद्ध स्फुटवक्ता अभियोगी* यांच्या साह्याने एक मोठा वाद उपस्थित करून निरयन पद्धतीनें केलेले हछ्लींच्या पंचांगांतील गणित चुकलेले आहे व त्यांत फेरफार करणें आवशयक आहे, असें सिद्ध करून दाखविलें. यांचा खभाव निष्कपटी व निरभिमानी असे. यांच्यासारखे मेहनती, उद्योगी, सदाचारी व सरळ स्वभावाचे पुरुष फारच विरळा. ह्यांस निरुपयोगी वेळ दवडणें आवडत नसे. शाळेंतील काम आटपून घरीं आले म्हणजे हे स्वस्थ न बसतां आपल्या आवडीच्या विषयांवर लेख लिहीत बसत. हे लेख म्हणजे '“विविधज्ञानविस्तार” मासिक पुस्तकांतून प्रसिद्ध झालेलें भास्कराचायेकृत “लीलावती”चें मराठी भाषांतर, “कविचरित्र' व अनेक प्रसंगीं प्रसिद्ध झालेले ज्योतिषदास्त्रासंबंधीं लेख हे होत. “बालबोध” व 'खष्टिज्ञान' मासिक पुस्तकांतील ज्योतिष- संबंधीं लेख यांच्याच साहाय्यानें लिहिले गेले आहेत. “निबंधमाला? व 'निबंधचंद्रिका' या मासिक पुस्तकांत “ज० बा० भमो*” या सहीनें यांचीं नानाविषयविवेचक कित्येक प्रे प्रसिद्ध झालीं आहेत. “अरुणोदय”, 'ंदुप्रकाश” वगैरे वृत्तपत्रांतूनही यांचे बरेच लेख प्रसिद्ध झाले आहेत. हेमंतोत्सव व वसंतोत्सव ह्या व्याख्यानमालिकेतही यांनीं व्याख्याने दिलीं आहेत. “जगाचा इतिहास” या नांवाचा एक भाषांतररूप ग्रंथही यांनीं तयार केला आहे. बांबेग्याझेटियरच्या आधारें “ठाणें जिल्ह्याचा इतिहास? यांनीं लिहिला आहे, व तो छापून प्रसिद्ध झाला आहे. लोकांमध्यें शाक्रीय ज्ञानाची अभिरुची उत्पन्न होण्याकरितां “लघुशाखत्र- ग्रंथमाला” या नांवाची एक पुस्तकमालिका लिहावी या हेतूनें यांनीं जे. नॉर्मन लॉकियर- कृत ज्योतिषशास्त्र व पिंगलसुनिकृत छंदःशास्त्र या दोन ग्रंथांची मराठी भाषांतरें केलीं आहेत. या सर्व ग्रंथांवरून व लेखांवरून यांचें मराठी कविता व ज्योतिषशास्त्र यांविषयींचें ज्ञान किती अगाध होतें, हें स्पष्ट होतें. असे हे दीरघोद्योगी विद्वान्‌ ग्हस्थ ता० १९ मार्च १८९० रोजीं विषमज्वरानें एकाएकीं मृत्यु पावले.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now