पत्री | Patri
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
193
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)€
असतो. हें भाष्य तर्कमार्गाने लिहिलेलें नसतें, भावनांच्या 'ओलाव्यानें
आद्रे झालेले आणि ह्दयाच्या रसांनीं रसाळ झालेलें असतें. सामान्य
जनांची दृष्टि दृद्यावरच इतकी हृढ झालेली असते, कीं दृश्याचे पोटीं
जी अनंत अहद्यें सामावलेली आहेत तीं त्यांना कोणीतरी दाखवावीं
लागतात. कवीचें कार्य हें असते कां आपल्याजवळची दिव्यदृष्टी देऊन
सांसारिकांना परम अर्थांचीं, ऐहिकांना परलोकाचीं दर्शने घडवून आणा-
वयाची; नित्याच्या अवलोकनानें आंधळे झालेल्या स्त्री-पुरुषांना साध्याहि
विषयांतील मोठा आशय दाखवावयाचा. आवह्यकाच्या कोंडींत सांपडलेल्या
देहवाद्याला अनंत आकाशप्रदेशांत आत्म्याचें स्वातंत्र्य लाभेल असे करावयाचें;
अपूर्णतेच्या बंधनांत सांपडल्यामुळें असत्य, कुरूप आणि पापमय भासणारी
साष्टे सत्य, सौंदर्य आणि साधुत्व यांनीं पूर्णपणें भरलेली आहे याचा पूर्ण
प्रत्यय आणून द्यावयाचा. महाकवि आपल्या उच सौदर्यदृष्टीनें या विश्वांतील
वस्तूंमध्यें अडकून पडलेल्या परमशुद्ध अर्थाला आपल्या मूळच्या पूर्ण स्वतंत्र
रूपांत पाहूं शकतो व त्या आदर्श अनुभवाचीं गोंड गाणीं गात गात तो
सैसारांत फिरत जातो. तो जेथें जाईल तेथ जीवनांत ताजञजपणा, साधेपणा,
शुद्धपणा पसरतो आणि जीवनाला उदात्तता आणल्याबद्दल जग त्याचें
कायमचे क्रहणी राहतें. या वाड्ययानें निर्माण केलेल्या सृष्टीत जीवनाला शुद्ध
करण्याचे सर्वच धर्म असतात. ती नियतीच्या कठोर नियमांनी निबद्ध
नसते. प्रत्यक्ष जीवनांतील सुखदुःख आणि आशानिराशा यांचा एकाच
आनंदरसांत विलय होऊन जातो; जड निसगाची कवचें उकलून आंतील
चैतन्य प्रतीत होतें आणि मानवी भावनांची संकुचित आवरणे फुटून त्यांतील
विश्वव्यापी रसाची उपलब्धि होते.
जीवनाच्या उच्च प्रदेशांतून उत्पन्न होऊन संसाराच्या मरुभूरमीत वाहणाऱ्या
या भावगंगा संसाराला आरामाचें स्वरूप आणतात. नाना फुलांनी आणि
फलांनी द्दी भूमि बहरून जाते. काब्याचा-वाड्ययाचा परिपाक आनंद हा आहे,
बोध किंवा उपयुक्तता नव्हे, असें म्हणतात त्याचा खरा अर्थ समजला
पांहिंजे, काव्यानें संसार मंडित होतो आणि पंडितहि होतो. काव्याचा आनंद
हा जीवनाचा आनंद असल्यामुळें हजारों उपदेशांपेक्षां जीवनाला शुद्धता
आणण्याचे सामर्थ्य त्यांत अधिक भरून राहिलेले असतें. काब्यांत ज्ञान
User Reviews
No Reviews | Add Yours...