साने गुरुजी | Saane Gurujii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saane Gurujii by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द विदोष बंधन उरलें नव्हतें. लय़ाच्या बंधनांत पडण्याची त्यांना उत्सुकता नव्हती. यामुळें विद्याथ्यांच्या जीवनांत ते संपूर्णपणे मिसळून गेले. आपली सारी बुद्धि, सारी संपत्ति त्यांनीं मुक्त हस्तानें विद्याथ्यांच्या विका- सासाठीं वेंचलीं. विद्यार्थी हेंच त्यांचे कुटुंब बनले, आणि या विद्याथ्यांच्या द्वारांच त्यांनीं खानदेशच्या जनतेंत प्रवेश केला. १९३० च्या सत्याग्रह संग्रामामध्यें त्यांनीं आपल्या स्फूर्तिदायक वक्‍्तृत्वानें अखिल खानदेश जागत करून सोडला. याच सुमारास त्याची कवित्वशक्ति जागी झाली. देवप्रेमाच्या व देशप्रेमाच्या असंख्य गीताना तिने जन्म दिला. तुरुंग- वासांत अनेक प्रकारच्या आपत्ति भोगीत असताहि त्याच्या साहित्य- निर्मितीला खंड पडला नाहीं. १९३२-३४ च्या दुसऱ्या लब्यांतहि त्याचें लोकजागरतीचें आणि साहित्यनिमितीचें कार्य चालूच राहिलें. नंतरच्या सनदशीर राजकारणाच्या काळातहि त्यांचें लोकाभिमुखत्व मंद झालें नाहीं. उलट कॉग्रेस नांवाचें साताहिक पत्र काढून जनतेच्या विचाराला सुशिक्षित करण्याचें काम त्यानीं चालविले. या वेळीं काग्रेसमधील अधिकारी मंडळीशीं त्यांचे खटके उडूं लागले, जहाल गटांशीं आणि कम्युनिस्टांशीं त्यांचे सह- कार्य वाढूं लागलें. तथापि त्यांच्या जीवनांत कसल्याहि प्रकारचा स्वार्थ नसल्यामुळें त्याची कॉग्रेस-निष्ठा शुद्धच राहिली. या काळात महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतहि त्यांचा प्रवेश झाला आणि ४२ च्या आदोलनामध्ये त्यांनीं साऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी, कामकरी आणि शेतकरी याची मनें आकषून घेतलीं. त्यांच्या प्रभावाचा हा वाढता विकास पाहिला म्हणजे त्याची लोक- प्रियता केवळ आगंतुक आहे असे म्हणतां येणार नाहीं. आपल्या अविरत उद्योगाने आणि अखंड तपश्चर्येनें त्यांना जनमनांत स्थान प्राप्त झालें आहे. देशाभिमानाच्या भावनेनें तरुणांचीं मनें भारून टाकण्याच्या कामीं त्यांचा हातखंडा आहे. ध्येयवादाच्या, त्यागाच्या, सेवेच्या कल्पना त्यांच्या सान्नि- थ्यांत आलेल्या कोणाहि मनुष्याच्या हृदयांत सहज प्रादुर्भूत होतात. रक्ष आणि पंडित भासणाऱ्या द्ृदयांतहि भावनेचा ओलावा निर्माण करण्याचें त्यांचें सामर्थ्य मोठें अजब आहे. या त्यांच्या कामगिरीमुळें त्यानीं महाराष्ट्रांत एक नवें युग सुरू केलें आहे, असें म्हणावयास हरकत नाहीं.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now