मानस - मंदिर | Maanas Mandir
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
152
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)३ प्रकरण १ लँ
“ छे, छे ! “मी म्हटले “ अगदीं नजीक आहे. त्याचे नांव
मानसमंदिर ! ते तुमच्या, माझ्या, प्रत्येकाच्याजवळ आहे. आपण
त्याच्याकडे वळून बघत नाहीं म्हणून ! वळून पाहिल्यावर त्याची भव्यता
अन् त्याचं सौंदर्य पटायला वेळ लागणार नाहीं!”
खरंच असे आहे !
दिवसाकांठीं एक क्षणभर तरी आपल्यापेकीं किती जण असें
म्हणतात कीं, आतां व्यावह्यारेिक जगांतील धांवपळ अजिबात बंद
करून मी जरा आपल्या अंतःकरणांत डोकावून पहाणार, जरा एकांतांत
बसणार, माझ्या मनांत विकारांच्या व सुखदुःखांच्या ज्या घडामोडी होत
आहेत त्या लक्षपूर्वक पाहणार १ फारच थोडे. किंबहुना, आपण बहुतेक
सर्वजण अशा रीतीने रात्रंदिवस वागत असतों, कीं जणू आपल्याजवळ
“ मन “” नांवाची कांहीं अतस्थ वस्तू आहे याची आपल्याला
दादही नसते! आपण नोकरी करतों, शिक्षण घेतो, लिहिती अगर
वाचतो, राज्य जिंकतो, घालविती,गेलेलीं परत मिळविण्यासाठी धडपडतो,
खेळ खेळती अगर अचाट साहसाची कामे करतो, करमणूक करतों
अगर करून घेती, न्याय देती अगर मानतो, धर्म स्थापतों,
अगर मोडतो; आणि या साऱ्या धुमदइचक्रींत आपल्या अंतस्थ मनाची आप-
ल्याला शुद्धबुद्ध रहात नाहीं! कोणी आपल्याला विचारलें, काय रे, तुर
मन तूं कधी निरखून पाहिले आहेस कां? तर आपण झोपेतून दचकून
उठलेल्या माणसासारखा भांबावलेला चेहरा करून म्हणू ,
“ माझं मन६१... अं ...अं...कोणास ठाऊक !...”
आपल्या हातून घडणारा हा प्रमाद हास्यास्पद तर खराच; पण तो
घडावा हें साहजिक आहे. माणसाच्या अगदीं जवळ जी वस्तू असते
ती त्याला दिसत नाहीं. दूरचे डोंगर चटकन् दिसतात, येवढेच न
तर ते शोभिवंतही दिसतात हे जसं खरे, तसेंच जवळचे डोंगर दृष्टीत
भरत नाहींत हँही खर आहे. मासळीला स्वतःच चमकदार, चंदेरी पोट
कर्धी दिसत नाहीं. नागाला आपल्या फणींतला तजोमणी कधीं पहावयास
सांपडत नाहीं. कस्तुरीमृगाला आपल्या पोटांतली कस्तुरी अजून कोटे
User Reviews
No Reviews | Add Yours...