आमचा जगाचा प्रवास | Amacha Jagacha Pravas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Amacha Jagacha Pravas by पार्वतीबाई चिटनवीस - Parvatibai Chitanvees

More Information About Author :

No Information available about पार्वतीबाई चिटनवीस - Parvatibai Chitanvees

Add Infomation AboutParvatibai Chitanvees

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कोलंबो पानतंबाकू, वाणीउदमी वगेरंचीं दुकाने होतीं. तेथील एका दुकानांत तीं हिरवींचार ताजी विड्याची पाने, ती पांढरी द्र, बारीक कातरळेली नवी राठी सुपारी वगेरे पाहून ती विकत घेण्याचा मळा मोठा मोह पडल्या, व द्याला आमच्या गाडीवाल्यानेहि भर घातली, कीं, “सिलोनी विड्याची पाने फारच रुचकर असतात. तीं दिसावयाला हिरवी दिसतात इतकेच, पण खाण्याला फार स्वादिष्ट असतात.''आह्यीं तीं एक आण्याची विकत घतळीं तीं बरींच आलीं. शिवाय द्यांबरोबर कात, चुना, सुपारी छवग वगरे मसालाहि खूब मिळाला. कोलबोमध्ध्ये नारळींचीं, सुपारींची केळींची वगेरे कांकणी झाडेहि रस्त्याच्या आजूबाजूंनी बरींच दिसली आमच्या हाटेलमर्ध्ये दुपारपासूनच नोटिस लागळी होती, कां, “ देवाना बोट उद्यां रात्रीं दह्म वाजतां कोळंबो बंदरांतून निघेल. ” हुसऱ्या दिवशीं सकाळी ब्रेकफास्टनंतर हॉटेलजवळील कांहीं दुकानें पाहिलीं, व पंखे, उशा वगैरे किरकोळ सामान खरेदी केलें. हॉटेलच्या आंतमध्थ्येच पुष्कळशी जवाहिरांचीं व कापड वगैरेंची दिली, आग्रा, बनारस इकडील ब्यपाऱ्यांचीं दुकानें होतीं. कोलंबोमर्ध्ये या मालाची बरीच विक्री होत असावी, असें वाटतें. कांहीं बारीकसारीक जवाहीर आह्मीं विकत घेतले, आणि तेथेंच पुढच्या हॉटेलमध्ये येणारा- जाणारांची गंमत पहात बसलो. आज सकाळीं ह्मणा, कीं, काळ सकाळीं ह्मणा, बऱ्याचशा बोटी कोलंबो बंदरांत आल्या असाव्या. कारण, सेल्स लोकांच्या व पॅसेंजर्स लोकांच्या झुंडीच्याझुंडी सोडावेटर, लेमोनेड, चहा वगैरे पिण्यासाठीं हॉटेलमध्ये येत होत्या. हें हॉटेल आपले कांहींसें रेस्टरासारखेच होतें. या मंडळीमर्थ्ये एक जपानी बाई होती. तिन एका जर्मन कीं इटालियन इसमाशीं लग्न केळे होते. या बाईंनें इंग्लिश पोषाख केला होता; परंतु तो जपानी चेहरा कुठें लपावयाचा नाहीं. या जोडप्याचा एक लहानसा गुटगुटीत गोजीरबाणा मुलगाहि बरोबर होता. ती जपानी बाई माझ्या- १९
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now