बंकिमचंद्र चतर्जी | Bankimchandra Chatarjii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बंकिमचंद्र चतर्जी - Bankimchandra Chatarjii

More Information About Authors :

श्री. दा. जोशी - Sri. Da. Joshi

No Information available about श्री. दा. जोशी - Sri. Da. Joshi

Add Infomation AboutSri. Da. Joshi

सुबोधचंद्र सेनगुप्त - Subodhchandra Sengupt

No Information available about सुबोधचंद्र सेनगुप्त - Subodhchandra Sengupt

Add Infomation AboutSubodhchandra Sengupt

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रास्ताविक : ३५ त्यांनीं दशेन घडविले. त्यांचा हा प्रयत्न सरवंथा यशस्वी झाला नाहीं. रवींद्रनाथ ठाकुरांनीं नेमके निर्देशिल्याप्रमाणें त्यांचा कृष्ण हा इहलोकींचा एक मर्त्य मानव असण्याऐवजी मनृष्यदेहधारी नीतिसूत्न आहे, मानव्यातीत प्रतीक आहे. पण येथ भापणांसे कृष्णखरूपाच्या कलात्मक चित्रणापेक्षां कृष्णतत्त्वाशीं अधिक कतंव्य आहे' महाभारत या महाकाव्यांतील आणि तदनंतर प्रचलित असणाऱ्या कृष्णकथेतील तीन पदर वेगळाले करण्याचा बंकिमचंद्रांचा प्रयत्न आहे. महाभारतांतच हे तीनही स्तर अस्तित्वांत आहेत. पहिल्या स्तरांत कृष्ण हा माणसासारखाच वागत असून दैवत म्हणून त्याचा नामनिर्देशहि नाहीं. त्यानंतर भागवतग्रंथांतील कथेत परमेश्वराचा अवतार म्हणून तो पुढें येतो व उच्च आध्यात्मिक विचाराचा पुतळा म्हणूनहि त्याचा कमीअधिक उपयोग केला जातो. यापुढील कालखंडांत कृष्ण हा वैष्णवांच्या मांदी- याळीचा महाविष्णु बनतो, प्रेमाचें प्रतीक ठरतो आणि गोपांगनांच्या शुंगारमधूर रसकथा त्याच्या नांवाशीं निगडीत होतात. महाभारत कथंचा जो मूळ स्तर बंकिम- चंद्रांनीं मनाशी स्थिर केला आहे तेथेंच ते रमतात. पूर्ण पुरुषाचा आदर्श त्यांना तेथें गंवसतो. या कृष्णानें मानवी संस्कृतीस यावत्शक्य अशा सरव शारीरिक, बौद्धिक, नैतिक आणि सौंदयंबोधक शक्तींचा विकास स्वत:च्या व्यक्तिमत्त्वांत साधला आहे. आणि अशा या संपन्न, संपूर्ण पुरुषोत्तमाची कतंबगारी महाभारताच्या विविध पर्वात दृष्टोत्पत्तीस येते. युयुत्सु कौरव-पांडवांच्या मुख्य कथेचा तर तोच मूलाधार आहे. कुरुक्षेत्रावर घडलेल्या भूतांतकारी भारतीय युद्धांत कृष्णाचें ध्येय आणि धोरण काय होतें ? बंकिमचंद्रांच्या मतें तत्कालीन भारत परस्परांशी सतत झगडत असणाऱ्या छोट्या छोट्या राज्यांनीं शतश: विदीणं झालेला होता. त्यामुळें समस्त देश कुणा सावभौम सम््राटाच्या एकाधिपत्याखालीं आल्याखेरीज शांतता आणि सुबत्ता नांदणें शक्य नव्हतें. आणि हें अप्रत्यक्ष घ्येय साध्य करावयाचें तर सारे चिल्लर राजे निप- टून काढणें आवश्यक ठरतें. बराच काळ चाललेल्या लठ्ठालठ्ठीच्या मुळाशीं हें कारण होतें. अखेर त्यांत या सामंतचक्राचा नायनाट झालाच. आतां या प्रतिपादनांतील एतिहासिक तथ्य पारखं जातां निव्वळ कल्पनाविलास हातीं लागण्याची शक्यता आहे. पण बंकिमचंद्रांच्या इतिंहासलेखनापेक्षां त्यांच्या त्त्वांचतनाची दखल आपणांस घ्यावयाची आहे. इतर अनेक प्रसंगांप्रमाणेंच येथेंहि बंकिमचंद्र आपला कतंव्याचा सिद्धान्त प्रतिपादन करतात. कुरुक्षेत्राच्या रणमंचावर चाललेल्या संहारनाटकाचा कृष्ण हा प्रेक्षक आहे; हा खेळ थांबावा म्हणून त्यानें फारसा प्रयत्न केला नाहीं, किंबहुना तो घडून यावा यासाठींच कांहीं अंशीं त्यानें कोशिश केली असावी. का ? बंकिमचंद्रांच्या मतें कतंव्य कांहीं आकाशांतून अवतरत नसतें; परिस्थितीच्या मुशींत तें आकारत असतें. आजकालच्या पंडितांच्या शब्दांत सांगावयाचें तर सामाजिक - आर्थिक घटकांचा दाब त्याच्या मुळाशीं असतो. कृष्ण या व्यक्तीला - देवतास नव्हे -त्यावेळचा भारत परिस्थितीच्या कचाटघांत कृचंबून किकतंव्यमूढ झालेला आढळला.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now