ऋग्वेद दर्शन | Kragved Darshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image :  ऋग्वेद दर्शन  - Kragved Darshan

More Information About Author :

No Information available about रामचंद्र गोविंद कोलंगडे - Ramchandra Govind Kolngade

Add Infomation AboutRamchandra Govind Kolngade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(८, ज्या वेदांत अनुस्यूत आहेत, ते वेद अ पौरुषेय समजले जावे, यांत नवल तें काय ! असे हे अपौरुषेय वेद मुखोद्रत करून त्यांचे रक्षण करणें हें आद्य कर्तव्य ठरत असल्यामुळें त्यांच्या अर्थाकडे दुर्लक्ष होणें अपरिहार्य होतें. सामान्य अनुभवच आहे कीं अर्थ माहीत असलेल्या शछोकांपेक्षां अजातार्थ शोक जशाचा तसा ( काना-मात्रेचा फरक न करतां) आपण मुखोद्टत करतों. शिवाय आदराच्या भावनेची परमावधि झाली कीं, ज्याप्रमाणें भक्त देवळांतील आदरणीय मूर्तीकडे पाहतांना त्या मूर्तीच्या रूपचिकित्से- कडे डोळेझांक करतो, त्याप्रमाणें शब्दब्रह्माच्या ध्वनीत दंग झाल्यावर अर्थचिकित्सेची उठाठेव वेदविषयक आदराला पोषक समजली जाणें शक्‍यच नव्हतें ! कारणें कांहींहि असोत, यास्काचार्यांनीं निरुक्तांत ध्वनित केल्या- प्रमाणें ब्राह्मणकालापासूनच वक्रहग्बेदाची अर्थपरंपरा खंडित झाली, हें नि:संदाय, पुढें अनेक शतकांनंतर सायणाचार्याचें संस्मरणीय भाष्य तयार झालें नसतें, तर भाषा शासख्त्रादि अनेक तुलनात्मक शास्त्रांची व अनेक शोधांची मदत मिळूनहि आधुनिक वेदिक संशोधकांना सायणानायांच्या खांद्यावर उभे राहून त्यांच्यापेक्षां वेदार्थ प्रदेशांत जास्त दूरवर नजर टाकण्याची जी सोय झाली ती झाली नसती |! हें स्व वाचकांपुढे मांडण्याचे कारण असें कीं, सश्रद्ध भारतीय आज हजारी वर्षे श्वति-स्मृति-पुराणांवर प्रवचनें श्रवण करीत आहेत, पण त्यांपैकीं बहुतेकांना वेदांत सांगितलें आहे तरी काय व हली प्रचालित असलेल्या देवतांहून भिन्न अशा तत्कालीन देवतांची स्तुति करतांना ्रग्वेदांत तत्कालीन समाजस्थिति कशी प्रतिबिंबित आहे, यानें ज्ञान नसतें याचें वाचकांना आश्चर्य वाटूं नये ! अशा परिस्थितींत शान- विकासाच्या व पृथग्जनप्रबोधाच्या या युगांत क्रग्वेदांत काय विषय आले आहेत, त्याचें महत्त्व काय हें क्रग्वेदाचे बहिरंग व अंतरंग परीक्षण करून सामान्य वाचकांना समजेल, अशा सुंदर व सुबोध भाषेत त्रहग्बेद-दर्शन या ग्रंथांत विशद केल्याबद्दल श्री. कोलंगडे यांचे हादिंक अभिनंदन केळे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now