मराठी संस्कृति | Marahaatii Sanskriti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Marahaatii Sanskriti  by शं. बा. जोशी - Shan. Ba. Joshi

More Information About Author :

No Information available about शं. बा. जोशी - Shan. Ba. Joshi

Add Infomation AboutShan. Ba. Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पीठिका रहाटी संस्कृतीचा सागोपाग व आमूलाग्र अभ्यास आजहि पुरा झालेला नाहीं. पुष्कळ विद्वानानीं परिश्रमपूर्वक संशोधन केले असलें तरी बरेचसे प्रश्न अजूतहि अनिर्णीत आहेत. या प्रबंधात त्यापैकीं काही प्रश्नाची चचा केलेली आहे; तीहि निर्णयात्मक बुद्धीने नव्ह. अनिर्णीत समस्याविषयी अधिक संशोधन व्हावे या हेतूने काही विचार ग्रथित केले आहेत एवढेच. प्रबेधाच्या नावात “मराठी ” या संज्ञेऐवजञी “मऱ्हाटी ? अशी संज्ञा साक्षेपाने वापरली आहे. याचे कारण असें आहे कीं यातील समस्याची चर्चा बहुशः “मऱ्हाटी चे “मराठी? अमे रूप होण्यापूर्वीच्या काळाच्या म्हणजेच, हळेब्रीडु देवगिरी यादवाच्या काळाच्या सदर्भांने केलेली आहे. मुसल- मानी संघर्षांपासून आजतागायतच्या प्रश्नाचा अंतर्भाव “मराठी 'मध्ये होतो. अर्थात्‌ ह केवळ विवेचनाच्या सोयीसाठी. समस्या मऱ्हाटी संस्कृतीच्या अभ्यासात अनेक प्रश्नाचा उलगडा आज झालेला नाहीं. या देशाचे नाव, येथील शेकडो ग्रामनामै, येथील भिन्न भिन्न जन व त्याचे वाशिक संबध, त्याच्या भाषेची जडण घडण, त्याचीं दैवते व चालीरीती असे नानाविध प्रश्न आहेत. पण वास्तविक हीं सवे एकाच समस्येची उपांगे आहेत. ही समस्या मऱ्हाटी संस्कृतीपुरतीच मर्यादित नसून तिची व्याप्ति भारतीय संस्कृतीच्या अतिप्राचीन थरापर्यंत पोंचणारी आहे. ही समस्या 'द्राविड प्रभाव” म्हणून विद्वानात ओळखली जाते. भारतीय संस्कृति-संगम म्हणजे आर्य व द्रविड यांच्यातील देवाणघेवाण ह सवेमान्य आहे. पण हे द्रविड म्हणजे कोण व वेदकालीं यांना काय नांव होतें, यांचा व आयीचा संबंध कशा प्रकारचा होता यासंबंधीं निश्चित विवेचन छचितच केलेले आढळतं. या प्रब्रेचांत या दृष्टीने स्थूल विचार केलेला असून काहीं संभाव्य उत्तरे सूचित केलेल आहेत.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now