ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर | Brahmedrasvaamii Dhaavadashiikar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Brahmedrasvaamii Dhaavadashiikar by बळवंत पारसनीस - Balvant Parasnees

More Information About Author :

No Information available about बळवंत पारसनीस - Balvant Parasnees

Add Infomation AboutBalvant Parasnees

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ करून, हा हृदयंगम; प्रेमळ व भक्तिरसपूर्ण इतिहास महाराष्ट्रवाचकांस सादर करावा, अशी इच्छा उत्पन्न झाली. हीं पत्रे उपलब्ध झाल्यानंतर) त्यांच्या अस्सल प्रती व स्वामींचा आणखीही पत्रव्यवहार कोठें उपलब्ध झाल्यास, हा मराठ्यांच्या इतिहासांतील अश्रुतपूर्व व मनोरंजक भाग समग्र रीतीनें व्यक्त होईल, म्हणून आणखीही शोध चालविला. तों सुंदेवेंकरून धावडशी सस्थानांतील द्‌प्तरांत थोडेबहुत कागद उपलब्ध झाले; व त्याच दप्तराचा बराच भाग पिंपरी येथे सुसाध्य झाला. त्याचप्रमाणे निर- निराळ्या कारणांनीं भिन्न भिन्न स्थळीं पसरलेल्या स्वामीच्या पत्रव्यवहाराचा शोध लागून, किल्येक विद्वान्‌ व रसिक मित्रांच्या कृपासाहाय्याने तो सर्व हस्तगत झाला. येणेप्रमाणें पांच सहा वषीच्या अवघींत धावडशी संस्थानासंबंधानें ए- कद्र हजार दीडहजार कागद आह्मास मिळाले. त्यांवरून स्वामींच्या चरित्राच खरे स्त्रूप व्यक्त होऊन, त्याच्या अपूर्वत्वानें मनास थक करून सोडिले. आजपर्यंत मराठ्यांच्या इतिहासासबधाचे जे कागदपत्र प्रसिद्ध झाले आहेत, त्यावरून मराठ्यांच्या इतिहासाचा उत्तर भाग बराच सिद्ध झाला आहे; परतु त्याच्या पूर्वभागाची अद्यापपर्यंत व्हावी तशी सिद्धता झालेली नाहीं. शिवाजी, सभाजी;) राजाराम व शाहू ह्या चार छत्रपतींच्या बखरीवरून मराठ्यांच्या इति- हासाच्या पूर्वांधींची ह्मणजे मराठी राज्याच्या सस्थापनेची व अभ्युद्याची सा- मान्य माहिती मिळते; परतु तिची अस्सल कागदपत्रांच्या साहाय्यानें अद्यापि छान झालेली नाहीं. ह्याकरितां इ० स॒० १७५० ह्या सालापूर्वीच्या कागदप- त्रांचा शोध जितका लागेल, तितकें फार इष्ट व आवश्यक आहे. कारण; इ०्स० १७५० पासून पुढें-ह्मणजे शाहूच्या मृत्यूनंतर; पेशवाईची भरभराट झाली; व मराठ्यांच्या इतिहासास निराळें स्वरूप प्राप्त झालें. त्यापूर्वीचा इतिहास ह्मणज छत्रपतींच्या कारकीरदींचा इतिहास अत्यंत महत्त्वाचा असून, मराठी राज्याची संस्थापना व उत्कर्ष कसा झाला; हें त्यारून उत्तम प्रकारे निदर्शनास येते. ब्रह्मेद्रस्वामींच्या पत्रव्यवहाराने इ० स॒० १७२८ पासून इ० स॒० १७४५ पर्यंतच्या अवधींतील मराठ्यांच्या खऱ्या इतिहासाचें बरेच स्पष्टीकरण होऊन, त्या कालांत घडलेल्या राजकारणांची व इतर चळवळींची नीट संगति डुळण्यासारखी आहे. झणून हा पत्रव्यवहार इतिहासदृष्टया अल्यंत महत्त्वाचा आहे असें ह्मटल्यावांचून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now