नरसी मेहता | Narasi Mehata

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नरसी मेहता  - Narasi Mehata

More Information About Authors :

आशा खोत - Asha Khot

No Information available about आशा खोत - Asha Khot

Add Infomation AboutAsha Khot

के. का. शास्त्री - K. Ka. Shastri

No Information available about के. का. शास्त्री - K. Ka. Shastri

Add Infomation About. . K. Ka. Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जीवन चापित्र 0 वडिलांचे श्राद्ध सांगोपांग पार पाडले. रात्री नरसिंह भजन करीतच घरी आले तेव्हा त्याना सर्व हकीगत समजली. हा प्रसंग नरसिहानी काव्यमय केला आहे. असे सिद्ध करणारे एकही पद अजूनपर्यंत ज्ञात नाही. हे काव्य प्रेमानंदानी नरसिंहाच्या खाती रुजू केले, हेच शक्‍य वाटते. नरसिंहाच्या जीवनातल्या घटना म्हणजे ,लग्नानंतर भावजयीच्या कटू बोचण्यामुळे केलेला गृहत्याग, आणि तपश्चर्या तळाजागावी पुनरागमन, शांतिमय जीवनासाठी, जुनागड मधील नागर लोकांत निवास , तेथील जीवनातले त्यांनी काव्यमय केलेले प्रसंग - अपवाद फक्त मांगरीलमधील झारीचा प्रसंग आणि शेवटची घटना,राजवीरा मांडलीक नी घेतलेली हाराची कसोटी या होत.हे वर्षविस.१५१२(इ.स.१४५५) हे होय.यानंतर नरसिंहाचे जीवन कसे आणि कुठे गेले हे जाणून घ्यायला आपल्यापाशी कोणतेही विश्र्वसनीय साधन नाही. नंतरच्या काळात सुखसंप्राम आणि 'गोविंदगमन' नावाच्या रचना नरसिंहाच्या नावावर खपवल्या गेल्या. त्यापैकी गोविंदगमन काव्यांत, अंगमां वळीया अने पणौयो ( अंगावर सुरकुत्या आणि पांढरे केस) अशी स्थिती झाली, तेव्हाचे हे काव्य आहे, असा निर्देश आहे. म्हणजेच वृद्धावस्थेत नरसिंहानी हे काव्य लिहिले आहे हे सुचवले आहे. भगवंताचे गुणगान करायला नरसिंहाचा निश्चय होता. म्हणून त्या स्थितीत (कुणी दुसर्‍याच माणसाने ) हे भखियुं (भक्तीगान) लिहिले असावे. कारण नरसिंहाच्या कालांतर नाहीच पण इतर कुठेही न दिसलेले हे भक्तिगीतांचे रूप हे या काव्य रचनेत आहे. अर्थात्‌ हे काव्य नरसिंहाचे असेल असा विश्‍वास वाटत नाही. नरसिंहाच्या पुष्कळशा काव्य रचना आहेत, त्यावरून ते दीर्घकाल जगले असे मानतां येईल. प्रश्न असा आहे क्रीं त्यांचा वृद्धापकाळ कुठे गेला असावा. इ.स.१४७० च्या, डिसेंबर ४ तारखेला (वि.स.१५२७ ) महंमद बेगडांच्या सेन्याने जुनागडचा किल्ला सर केला. एका मतानुसारमांडलीक मारला गेला,अन्य मतानुसारपकडला गेला)प्रचलित मतानुसार,बेगडाची प्रतिज्ञा (मांडलीक' ला जीवंत पकडायची) खोटी ठरू नये म्हणून, एका भलत्या माणसालाच 'मांडलौक' म्हणून अहमदाबादच्या सुलतानासमोर हजर केला. त्याला मुसलमान करण्यांत आले. मृत्यूनंतर त्याची कबर, अहमदाबादमधील माणेक चौकाजवळ हलवायांच्या आळीत बांधण्यात आली. जुनागडचें 'चुडासमा' चे राज्य महमंद बेगडाच्या सत्तेखाली आले, तोपर्यंत नरसिंह बहुतांशी जीवित असावेत. मांगरोल (सोरठ) च्या समुद्रकिनार्‍्यांवरील जुन्या स्मशानाला नरसिंहांचे स्मशान म्हटले जाते. त्यामुळे असं दिसते, कीं मांडलीक च्या वाढत्या उपद्रवामुळे नरसिंह पर्वतदासाकडे मांगरोलला (सोरठ) आले असावेत. नहसिहांचे विशाल साहित्या पाहून खात्री वाटते त्यांनी जुनागडपासून आरंभ केला आणि थेट मांगरोळ (सोरठ) * पर्यंत शक्य झाले तोंवर वेळोवेळी अनेक काव्यरचना केल्या. पर्वतदास उच्च कोटीचे भक्त होते. नरसिंहाच्या सहवास आणि सत्संगाची परिणिती म्हणून कीं काय पर्वतदासांची पदे उपलब्ध आहेत. काका पुतण्यांमधे ३० वर्षांचे अंतर होते. नरसिंहाच्या मृत्यूपर्यंत पर्वतदास




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now