आगरकर | Aagarakar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आगरकर  - Aagarakar

More Information About Author :

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
५ गोपाळ गणेश आगरकर जखडलेल्या सामान्य मनुष्याच्या बुद्धीला कल्पनाच करतां येत नाही. आगर- करांची जिवतपर्णी प्रेतयात्रा निघाली ती याच कारणामुळे. आगरकरांचे विभूतिमत्त्व त्यांच्या हयातीत बहुजन समाजाला जाणवले नाहीं त्याचेही कारण हच. र आगरकरांना अवघें एकुणचाळीस वर्षांचें आयुष्य लामलें, अलौकिक यक्तींना आयुष्य देतांन! विधाता कृपण होतो हा जुना अनुभव दुर्दवानें त्यांच्याही बाबर्तीत खरा ठरला. पण त्यांचा एकुणचाळीस वषांचा तोकडा जीवनपट कितीतरी करुणरम्य आणि धीरोदात्त घटनांनी नटला आहे १८९६ साल, कऱ्हाडजवळचें टेभ गांव. त्या गांवांतल्या गणेशपंत आगर- करांना एक मुलगा होतो. भोवताली गोकुळ नसते; सहारा असतो. पण बारशादिवर्शी सरस्वतीबाई आवडीने आपल्या मुलाचें गोपाळ असें नांव ठेवतात, चिमणा गोपाळ यथाकाल रांगूं लागतो, उभा राह लागतो, बोबडे बोल बोळ लागतो. मुळाच्या या बाळलीलांचें आईबाप कौतुक करतात, पण तो थोडासा मोठा होतांच त्यांच्या पोटांत गोळा उभा राहातो. आतां गोपाळाच्या शिक्षणाची कारी तरी व्यवस्था केळी पाहिजे. खेडेगांवांतल्या दरिद्री कुटुंबानें ती कुठें आणि कशी करायची ! छोटा गोपाळ तेथून कऱ्हाडला येतो. तिर्थ त्याचें आजोळ असते, आजोळी त्याची शिक्षणाची सोय होते. कऱ्हाडला या बालजीवाला आपल्या आईची आठवण होत नाहीं असें नाई, मधूनमधून स्वप्नांत तो टभूला जाऊन आहईंच्या गळ्याला मिठी मारतो. प्रसंगीं तिच्या कुर्शीत डोकें खुपसून अश्वही ढाळतो. पण जाग्रतींत त्याचें बालमन आपल्या निघारा- पासून क्षणभरसुद्धां विचलित होत नाहीं. दारिद्य आणि दमा यांच्याशिवाय आपल्याला देण्याजोग आपल्या आहेबापापार्शी कांहीं नाहीं हे जणु कांही त्याला कळून चुकलेलें असतें ! कऱ्हाडला गोपाळ जसा पोहण्यांत पटाईत होतो तसा तो लिहिण्यांतही तरबेज होतो. बारा वर्षे पुरीं व्हायच्या आंतच तो निर्बंध लिहू लागतो पण सा डद्वेवान्‌ आणि महत्त्वाकांक्षी मुलाच्या वाटेत दुदव पुन्हा दत्त




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now