अंतर | Antar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Antar by वा. वि. जोशी - VA. Vi. Joshi

More Information About Author :

No Information available about वा. वि. जोशी - VA. Vi. Joshi

Add Infomation About. . VA. Vi. Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खरतर श्शे उष्टी ताटें चाटावयाचीं, त्याच सवती रागाने उभ्या राहून, आपली विटंबना पहात आहेत, या जाणिवेने ती आंतून नेहमी व्याकूळ झालेली असे. अगदी एकान्तांत असतांनाहि तिला निवान्तपणा वाटत नसे. सवतींचीं चित्रे जिवंत होऊन आपल्या सवे व्यापारांकडे न्याहाळून पहात आहेत; इतकच नव्हे तर खुद्द बाजीरावांच्या मनांत घोळणारीं पूर्वीच्या दोन्ही संसारांचीं स्मृतिचित्रे तुलनेने आपणांला हिणकस ठरवीत आहेत, असें तिला वाटे. ख्त्रीपेक्षा पुरुष साधारणतः वयाने, शरिराने आणि शक्तीने अधिक सामथ्येवान्‌ असला पाहिजे खरा; पण ख्तरीच्या वयाच्या, शरिराच्या, शक्तीच्या मानाने तो किंचित्‌ जास्त सामधथ्येवान्‌ असावा, एवढाच त्याचा अर्थ ! दोघांच्या वयांत, शरिरांत आणि शक्तीत जमीनअस्मान अंतर असेल, तर तीं दोघे समान धमाच्या अधिकाराने एकत्र येणार कशीं १ विश्वासांनी, मनांनी आणि आकांक्षांनी समरस होणार तरी कशीं १ बरोबरीच्या सोनचाफ्याच्या झाडाचा आसरा घेऊन, त्याला विळखे मारीत उंच वाढण्याची स्पधा करणारी मधुमालतीची वेल प्रकाशपाण्याचा सारखा हिस्सा मिळवून झाडाबरोबर खतः चांगली पोसली जाते, ऊनपाऊसवाऱ्याच्या माऱ्यापासून खतःचा व झाडाचा बचाव करते आणि इतर वेळीं स्वत:सह झाडाला शोभा आणते;पण एखाद्या जुनाट कडु- छिंबाच्या वक्षावर चढवलेली चमेलीची वेळ त्याच्या अजस्र खांद्याफांद्यांनी पकडून घरलेली असली, तरी तिच्या विळख्याच्या आवाक्यांत तो वृक्ष कघीचे येत नसल्याने ती भीतीने अलगअलगच राहते, केविलवाणी दिसते, वृक्षाची आणि स्वत:ची शोभा घालविते, साबटांत वाढेनाशी होते आणि पाऊसवाऱ्याच्या मार्‍्यांनी एकदम निसटून पडते. वृक्षाच्या पोखरलेल्या फांद्या तुटूं छागल्या, तर त्यांना जागच्या जागीं घट्ट घरून ठेवण्याचे तिच्यांत साम्थ्यहि नसत. नवराबायकोची स्थितीहि याचप्रमाणे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now