वाट चाळ | Vaatachaal

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वाट चाळ  - Vaatachaal

More Information About Author :

No Information available about रा. मि. जोशी - Ra. Mi. Joshi

Add Infomation About. . Ra. Mi. Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० वाटचाल स्नानाचा खरा आनंद हृषीकेद्यसाठीं राखून ठेवायचा असें जे मीं ठरवले तें अगदीं योग्य होतें अशी माझी त्रिवेणी घाटावर आल्यावर खात्री झाली. इथेंहि घाट आहेत, पण हरिद्वारसारखे नाहींत. माणसाच्या हातांनीं गंगेला इथें जखडून टाकलें नाहीं. दर्थेहि यात्रेकरू येतात, पण हरिद्वारदतकी गर्दी करीत नाहींत. गगेचा खळाळत वाहणारा धनुराकार प्रवाह, त्यापलीकडले डोंगराचे चढउतार आणि त्याना आच्छादणारी हिरवीगार झाडी, भर उन्हाळ्यांतहि अंगावर हलकासा कांटा आणणारें गंगेचें स्वच्छ, शीतल, सुखकर, *गंधर्वामरसिद्धकिन्नरवधूत्तुंग- स्तनास्फालित ? जल पाहिल्यानंतर चित्त प्रसन्न, विकल्परहित होतें आणि नेहमी इथेंच राहायला मिळावें यापरती दुसरी इच्छा मनांत रहात नाहीं. दृषीकेशपयंत आल्यावर लछमन झूल्याला गेल्यावांचून कसें राहायचे ! म्हणून आम्ही स्नान उरकून, ओढून काढल्यासारखे पाण्याबाहेर आलों. काली कमलीवाल्याच्या मठांत गंगोत्रीच्या गंगेनें भरलेले गडू मिळतात ते घ्यायचे होते. गडूची किमत म्हणून कांहीं घेत नाहींत. पण संस्थेला धर्मादाय म्हणून आपण यथा-सामथ्ये कांहीं तरी द्यावें अशी अपेक्षा असते. मीं दोन रुपये दिले. एक गडू घेतला. नंतर आणखी एक मागून घेतला. 'चांडकहोठजींनीं धमादाय म्हणून पांच रुपये दिले होते, आणि गट एकच घेतला होता. मला दोन रुपयांत दोन गट मिळाले आणि आपल्याला पांच रुपयांत एकच ह्याची त्यांना फारच चुटपुट लागून राहिली. एकच गडू हवा आहे असें सांगितलेले असल्यामुळें दुसरा कसा मागावा तें त्यांना कळेना. त्यामुळें आम्ही लछमन झूल्याचा टांगा ठरवायला बाहेर पडलो तेव्हां त्यांचें चित्त बरेंच अस्वस्थ होतें. “य॒हांसे लछमन झुला कितना लंबा गिरता है जी१?' असें शेठजींनीं नाग- पुरी हिंदींत एकाला विचारलें. राष्ट्रभाषा हिंदीवर पुढें जे प्रादेशिक संस्कार होणार आहेत त्याची ह्या वेळीं मला थोडीशी कल्पना आली. आपल्या हिंदींत मराठी शिरले आहे ह्याचें शोठजींना भान नव्हतें. टांगा ठरवतांना त्यांनीं जो विजय मिळविला त्यामुळें त्यांचें चित्त धुंद होतें. टांगेवाला जातां-येतांचे पांच रुपये मागत होता. 'चांडकशेठजी 'चारांवरून साडेचारांवर येऊन तिथेच चिकटून बसले होते. अखेर त्यांनीं टांगेवाल्याला साडेचार रुपये कबूल करायला लावलें तेव्हां त्यांना खर समाधान वाटलें. भरत मंदिर, चंद्रभागेच्या पुलावरून पलीकडे गेल्यावर धन्वंतरी मंदिर,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now