मांडवावरीळ वेळी | Maandavaavaril Veli
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
186
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)वसंताचे रामायण
* हें बघ, तुला मी आज नव्यान जळात नाहीं है ध्यानांत असूं दे. तुझा हा कांहीं
तरी नवीन डाव दिसतो आहे मला त्रास देण्याचा. माझ्या कोणत्याही गोष्टींत तुला लक्ष
घालण्याचं कारण नाहीं. जर फाजीलपणा करशील तर याद राख, दिवाळीत क्रिकेटची बॅट
तर अशानं देणार नाहींच उलट......' ध्वनिकाव्याच्या साह्याने वाक्य पूणे करण्याची
जबाबदारी वसंतावर टाकून शरद निघून गेला.
वसंतानें खिन्नपणें भापल्याशींच मान हालवली. काय हॅ अलीकडचे राम झाले आहेत
पहा | घाकट्या भावांना लक्ष्मम होऊ देण्याचीसुद्धां यांची तयारी नाहीं. दंडकारण्य का
काय म्हणतात तें जाऊं दे, पण चतुशिंगीच्या रानांत तरी हा राम जाईल कीं नाहीं
कुणास ठाऊक ! आणि मग आपण लक्ष्मग कसे होणार १
दुसर्या दिवशी आपल्यापेक्षा एक वर्षे वयानें श्रेष्ट असलेल्या वामनाला त्याने आपला
अबोला गुंडाळून ठेवून हा प्रश्न विचारला.
तूंच सांग वामन, आतां मी लक्ष्मग तरी कसा होणार १ मोठ्या गंभीरपणे आपले
सुपासारख कान खाजवीत वसंत म्हणाला,
वामननें बराच वेळ विचार करून पाहिलें. परंतु त्यालासुद्धां ही अडचण कशी दूर
करावी ह एक अगम्य कोडेच होतं. “रामच जर रानांत जायला तयार होत नाहीं तर
काय करणार १ तुला सांगती, तो भीत असला पाहिजे रानांत जायला. ? वामनने पुच्छा-
त्मक सुरांत म्हटलें.
“ तो उंदरालाइड्धां भितो. ते मला माहीत आहे. पण प्रश्न हा कीं आपण काय
करावं १? वसंतानें शंकातुर स्वरांत म्हटलें.
यावर वामननें रामलक्ष्मणाची गोष्ट खोटी कशावरून नसेल असाही नवलपूर्ण मुद्दा उप-
स्थित केला.
* त्याचं काय सांगावं १ माझा भाऊ असलींच कसलीं तरी पुस्तकं वाचीत अस आणि
एके दिवशीं रात्रीं “चोर, चोर ? म्हणून ओरडत उठला. चोर नाहीं नी कांहीं नाहीं.
आमच्या बाबांचा रेनकोट खुंटीवर होता त्यालाच तो चोर समजून भ्याला, आईनं त्याला
बजावून सांगितलेलं मीं ऐकलं, असलीं कादंबऱ्यांची पुश्तकं वाचूं नयेत, त्यांत सगळं खोटे
असत असं आई म्हणाली--' वामनंनें माहिती पुरविण्याकरतां म्हटलें,
आळ तुले. काळा
User Reviews
No Reviews | Add Yours...