सीताराम एकनाथ | Siitaaraam Ekanaath
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
138
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about व्यंकटेश माडगूळकर - Vyankatesh Madagoolakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)११ शाळा
आबास म्हणाला, “ काटे नसतात त्या बाभळीला, दिनू. आणि लिंबार््यासारखी
उंच-उंच वाढते ती रामकाठी. शेरडांना खायला उत्तम ! ””
त्या जंगलांतून असल्या अनेक नवीन गोष्टी दिनूनें पाहिल्या. सुरेख पक्षी,
पांढरे उंदीर. हिरव्या पंखाचे झगझगीत सोनकिडे, ते धरून काड्यापेटींत
ठेवायचे आणि बाभळीचा कोवळा पाला त्यांना खाऊं घालायचा, म्हणजे ते अंडी
घालतात. नेपतीचीं तांबडींलाल फळं. कोळीश्राचीं विलक्षण कोटीं. मधाची
पोळीं. कितीतरी गोष्टी !
चालता-चालतां आबासच्या झोवळ्या पायांत एक कांटा भसकन विरला.
तेव्हां पाय वर धरून तो रडायला लागला. हामजानें त्याला खालीं बसवले.
देवबाभळीचा एक मोठा कांटा घेऊन त्यानें कांटा काढायचा प्रयत्न केला. पण
तो पार आंत गेला होता. मग त्यानें हईचें झुडूप शोधून काढलें. पान मोडून
त्याचा पांढरा चीक कांटा मोडला त्या ठिकाणीं लावला.
““ आबास, उद्या सकाळीं कांटा आपोआप बाहेर येईल, तं रडूं नकोस ! ”
सूय पश्चिमेकडे कलला. वारा सुटला. पिकाचा आणि काळ्या मातीचा सुगंध
दरवळला. कांटेवनांतील पांखरें गोंधळ करूं लागलीं.
हामजा म्हणाला, “ अंधार पडंल, आपण घरीं जाऊ. ”
गेलीं तशींच ओढयाच्या कांठाकांठाने मुलें परत आलीं. आबासच्या
खमिसांतलीं अंडीं केव्हांच फुटलीं होतीं. त्याचे पांढरे-पिवळे आणि चिकट डाग
पडले होते. ते त्यानें पाण्यांत घुतले. भूक लागली तेव्हां हामजाने डिंकाचा
एक-एक खडा दोघांनाही दिला, आपण खाला ! त्या चवदार डिंकानें त्यांचीं तोंडें
चिकट झालीं, दाढेला दाढ चिकटू लागली.
ते गांवापाशीं आले तेव्हां आभाळ डाळिंबाच्या फुलासारखं झालें होतें
रानांतून घरीं येणारीं शेळ्या-मेंढरें “बॅ-ब? करून ओरडत होतीं. त्यांच्या खुरांनीं
उघळलेली धूळ गांवावर तरंगत होती.
पुरून ठेवलेलीं पाटी-पुस्तकें काढून तिघेही आपापल्या घरीं गेले,
दिनूची आई समई पुशीत बसली होती. दिनूला बघतांच ती म्हणाली, “ किती
रे ड्लचीर १ आणि तोंड एवढं तांबडंलाल कशानं झालंय् १ उन्हांत हिंडलास का १”
दिनू कांहींच बोलला नाहीं. अजूनही तो कांटेवनांतल्या विलक्षण वातावरणांत
User Reviews
No Reviews | Add Yours...