कांचनमेघ | Kaanchanamegh
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
202
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)माझं वाडःमयीन जीवन
मी माझी खरीखुरी पहिली कविता इ. स, १९११ सालच्या डिसेंबर
महिन्यांत म्हणज माझी मॅट्किची परीक्षा संपल्यावर लिहिली, व ती के.
हरिभाऊ आपटे यांनी आपल्या *करमणूक ? साप्ताहिकांत * दिल्ली दरबार *
खास अंकांत प्रसिद्ध केली. त्यामुळें मला काव्यलेखनास अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन
मिळालें. मट्रिकची परीक्षा संपल्यावर मी माझ्या आजोळी म्हणजे उत्तर
सातारा जिल्ह्यांतील *फत्यापूर * गांवीं सहज विश्रांतीसाठी गेलं होतों.
तेथील अंबेओळींतून मेल दीड मेल पूर्वेस गेलें, की लगेच कृष्णानदी लागते.
या नदीकांठांकडे मी नित्य फिरावयास जात असे. एके दिवशी सायंकाळी मी
असाच सहज फिरावयास गेला होता. या वेळीं नदीच्या परिसरांत रमणीय
शोभा पसरली द्दोती ! मावळत्या सूयांचे किरण पाण्याच्या खळखळाटावरून,
प्रशांत वाळवंटावरून, डगरींडगरीवरून व त्यांवरील झाडांवरून खेळत,
फिक्के होत चालले होते ! ती शोभा पाहण्यासाठी मी नदीकांठच्या खडका-
वरील एका उंच डिंब्यावर बसलो होतो. माझें मन त्या सोनेरी सोंदर्यात
व नदीच्या मंजुळ खळख्ळाटांत रमून गेले होते ! तोंच माझ्या भावना
एकाएकी महिरून आल्या ! माझ्या अंतःकरणांत आनंदाच्या ऊर्मी दाटून
आल्या ! मला काहीतरी लिहावे असं वाटल व मी तिथेच १ नदीतटाकचा
सायंकाळचा देखावा !? ही कविता लिटन काढली. हीच माझी पहिली
कविता ! तर्से पाहि तर ही कविता सामान्य होती; पण तिच्या मागचा
अनुभव व आनंद अपृर्वे होता ! तो एक नवीन अनुभव होता ! आणि या
कवितेला * दिछी दरबार? खास अंकांत त्या वेळचे श्रेद्ठ कवि चंद्रदोखर
यांच्या * दिंदवंदना ? या नितांतरम्य कवितेशेजारी प्रसिद्धी मिळाली,
त्यामुळें तर माझा आनंद शतगुणित झाला !
या आधीं मी कविता लिहण्याचे प्रयत्न केले नव्हते असे नाही.
User Reviews
No Reviews | Add Yours...