श्रीएकनाथ महाराज यांचें चरित्र | Shriekanath Mahaaraaj Yaachen Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीएकनाथ महाराज यांचें चरित्र  - Shriekanath Mahaaraaj Yaachen Charitra

More Information About Author :

No Information available about बाळकृष्ण सहस्त्रबुद्धे - Baalkrishn Sahastrabuddhe

Add Infomation AboutBaalkrishn Sahastrabuddhe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(८) आवाल्वृद्धांस एकनाथ माहीत होता. सर्वजण आपआपल्या प्रकारें शोध करूं लागले. कोणीं गोदावरींत कोळी घातले. कोणीं सर्व वाळवंट पालथे घातलें, कित्येकांनीं गांवांतील विहिरींत पानवुड्ये उतरविले. याप्रमाणें चोहोकडे शोध चालविला. परंतु सर्व व्यर्थ, कांहींच पत्ता लागेना. एकनाथास दूरदूरच्या एकांत देवालयांत बसण्याची हौस असे, ह्मणून गांवांतील व बाहेरील जुनाट देवालये, भयप्रद दरी, गुहा, व भुयारें हीं सर्व धुंडिलीं; नाथाच्या खेद्यांस व सहाध्यायांस विचा- रिले, गांवोगांव शोधार्थ जामूद रवाना केले; परंतु एकनाथाची को- णीच कांहीं वातमी सांगेना. ज्या पुराणिकाला आपला जाण्याचा बेत एकनाथांनं कळविला होता, व ज्याच्याकडून नाथाच्या जाण्याची थोडी बहुत माहिती मिळण्याचा संभव होता, तो पुराणीकही याच वेळेस काकतालीय न्यायाने पैठणांत अह्श्य झाला. हा पुराणीक पैठणामध्यें नेहमीं रहात असून, ज्या दिवशीं प्रातःकालीं एकनाथ निघून गला, त्याच दिवसाच्या पूर्वरात्रीं अकल्पित बेत ठरून कांहीं निकडीच्या काम[- करितां तो परगांवीं निघून गेला. याप्रमाणें नाथाचें कुरालव्रत्त कळून बिचाऱ्या चक्रपाणीची काळजी दूर होण्यास कांहींच साधन नव्हतें. एकनाथाची कांहींच वाती कळत नाहीं, हॅ पाहून चक्रपाणीची कंवर खचली. त्याच्या इद्ध पत्नीने मोठ्यानें हंबरडा फोडून घाडकन्‌ अंग टाकून दिलें ! चक्रपाणीसही मूर्छा येऊन तो जमिनीवर निचेष्ट पडल[! सर्व घरांत एकच कल्होळ होऊन मोठा आकांत माजला ! त्या ृद्धांचा दारुण शोक पाहून जमलेला जनसमूह दुःखांत चूर होऊन गेला. नाथाच्या जाण्याविषयीं कोणाचाच कांहीं तके चालेना. इतका आज्ञाधारक, छुशील, व शांत खभावाचा सुलगा रागावून कोटें पळून जाईल, किंवा एखादी अविचाराची गोष्ट करील, अशी कल्पनाच करवेना. १ कित्येक ठिकाणीं असेंही लिहिलें आहे क्षी, हा पुराणीक लढाईमध्ये त्याच वेरी अकल्पित गेला हाता. (छापील प्रत भक्तलीलामूत अ. १५ ओ, ३१-४१.)




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now