पुष्करिणी | Pushhkarini

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पुष्करिणी  - Pushhkarini

More Information About Author :

No Information available about शशिकांत - Shashikant

Add Infomation AboutShashikant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२ पुष्करिणी तेव्हां सारेजण निश्चित झाले, मग पित्रे “सकाळ ? चघळूं लागले, गायन- गुरुजी दाते येरझाऱ्या घालीत नवीन ऐकलेल्या रागदारींतली “अमर भूपाळी* रुणगुणूं लागले, भावे अंगांतला कोट काढून लोडाशीं आडवे झाले आणि साठे सिगरेट ओढीत तोंडांतून बाहेर पडणाऱ्या धूम्रवल्यांना दृष्टिक्षेपांनी कुरवाळीत गुदगुल्या करूं लागले.... कांहीं तरी तऱ्हेवाईकपणा हातून घडल्याखेरीज आनंदाला चांगली चव येत नाहीं. वेळ सकाळची होती, तरी मीं एक पान आणवून खाले आणि त्याचबरोबर चुना चोळलेल्या जद्याचाहि बार भरला, मग थोड्या वेळान तोंडांत सांचलेला मुखरस, कधीं नव्हे तो, आज मीं हळुहळू गिळून टाकला, तशी छातींत मस्तपैकी कळ निघू लागली आणि लागलीच उचक्‍्यांची उतरंड सुरू झाली. तत्काळ डोकीची टोपी खालीं ओढून मी जोरजोरांत हंगूं लागलों, तेव्हां उचक्या थांबल्या आणि मग थोडा वेळ पाठीच्या मणक्यांत दणदण घाव बसल्यागत होऊं लागलें. आतां एखादी सुरेखशी कथा वाचायला मिळाली तर काय बहार होईल, असा विचार माझ्या मनांत आला, पण हाताशी पुस्तक नव्हतें किंवा चटकन्‌ मिळण्यासारखंहि नव्हतें. म्हणून मग, जिची गोडी मला आजपयत अवीट बाटत आलेली आहे, त्या बाणाच्या कादंबरीचें कथानक मी क्रमा- क्रमाने मनाशीं घोळवू लागलों. मीं डोळे भिटून घेतले, माझ्या मनांतला चंद्रापीड इंद्रायुधावर स्वार होऊन किनरमिथुनाचा पाठलाग करीत केलास- पर्वताच्या पायथ्याशी वाट चुकला आणि परत फिरतां फिरतां अच्छोद सरोवराच्या कांठाशीं येऊन शिवाळयांतल्या महाश्वेतेचे गायन ऐकू लागला. तेवढ्यात आमच्या बैठकीच्या दाराशीं कांहीं तरी धावपळ झाल्यासारखी वाटली म्हणून मी डोळे उघडले. शबेकर आंत धांवत भाले आणि कांहीं न बोलतां नुसते इकडे तिकडे पाहून तसेच गेले. मीं पुन्हा डोळे मिटले. आतां महाश्वेतेने आपलें गाणें संपवले आणि चंद्रापीडानें तिच्याविषयी चोकशी करून तारुण्यांत स्वीकारलेल्या तिच्या त्या घोर तपश्चर्येंचं कारण विचारले, तशी ती ओक्छाबोक्शीं रडूं लागली... . _ पुन्हा दाराशी कांहीं तरी खजबज झाली' आणि दब्रेकर संथपणार्ने 'पाटीकटूून आंत आले, त्यांच्या पाठोपाठ अगदीं सावकाश तीन मुले आंत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now