गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा | Gaandhiijiinchyaa Sahavaasaant Ek Aathavadaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gaandhiijiinchyaa Sahavaasaant Ek Aathavadaa by ळुई फिशर - Lui Phisharसत्यबोध बाळकृष्ण हुदळीकर - Satyabodh Baalkrishn Hudalikar

More Information About Authors :

ळुई फिशर - Lui Phishar

No Information available about ळुई फिशर - Lui Phishar

Add Infomation AboutLui Phishar

सत्यबोध बाळकृष्ण हुदळीकर - Satyabodh Baalkrishn Hudalikar

No Information available about सत्यबोध बाळकृष्ण हुदळीकर - Satyabodh Baalkrishn Hudalikar

Add Infomation AboutSatyabodh Baalkrishn Hudalikar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गांधीजींच्या सहवासांत पक आठवडा त्यांचें वय पंचाण्णव वर्षाचें होतें. ते ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले हिंदी सभासद होते. सकलातवाला-आणखी एक्र पार्शी-कम्युनिस्ट-हे तिसरे व अखेरचे ब्रिटिश पाले- मॅटचे हिंदी सभासद होत. खुर्झंदबेन फार बुद्धिवान असून खूप चलाख आहेत. हिंदुस्थानांत राष्ट्रीयत्व वादावर फाजील भर दिला जातो असा मीं त्यांच्याशीं वाद केला. स्वतंत्र हिंदुस्थान फॅसिस्ट बनेल अशी मला भीति वाटते असेंही मी त्यांना सम- जावून सांगितलें. भाणि दुर्देवाने तसें झालें तर ब्रिटिश अमलाखालीं आहे त्यापेक्षांही कमी स्वातंत्र्य हिंदुस्थानला लाभेल असें माझें म्हणणें आहे, असें मी त्यांना बजावलें. हा माझा तके त्यांना अगदीं कुचकामाचा वाटला. आधीं ब्रिटिशांची हिंदुस्थानांतून हकालपट्टी करायची नि मग आम्हीं हिंदी लोकच आमचे सारे प्रश्न सोडवूं शकूं. “ आम्हांला आतां मोकळीक हवी आहे.” असें खुर्शेदबेन सांगूं लागल्या. “ एखादी घरमालकीण असावी नि तिच्या घरीं खूप दिवस राहणाऱ्या पाहुण्यांचा सुळसुळाट झालेला असावा. ही पिडा केव्हां एकदां निघून जाईल असं तिला वाटूं लागतं. आणि हे आगांतुक पाहुणे ज्याक्षणीं पुढीलदारानें निघून जातील त्या क्षणापेक्षां इतर कोणत्या क्षणाची वाट पहात असेल बरं ती बिचारी !” गांधी आभाश्रमांतील कित्येक आश्रमवासीयांची व माझी ओळख करून देण्यासाठीं खु्शैद- बेन मला घेऊन गेल्या. ते सारेजण गांधीजींचे कायवाह असून काँग्रेसचे प्रचारकार्य करणारे ग्रहस्थ आहेत, किवा गांधीजींच्या पायाशीं बसून त्यांचा सहवास घडावा म्हणून कांहीं दिवसांसाठीं ते येथें येऊन राहिलेले पाहुणे आहेत. हे आश्रमवासी स्त्रीपुरुष साऱ्या हिंदुस्थानांतून आलेले आहेत. ते कधीं कधीं हिदुस्थानांतील अगदीं भिन्नभिन्न भाषा बोलतात. म्हणून त्यांचा परस्पर वादविवाद किंवा बोलणें चालणें हें इंग्रजी- मधूनच चालत असतें. येथील मुलें फारच देखणी आहेत. मी महादेव देसायांच्या झोंपडीपाशीं थांबलों, त्यांच्या डोक्यावर टक्कल पडलेलें असून पोट अंमळ खुटलेलें आहे. त्यांनीं फक्त एक घोतरच परिधान केलेलें होतें. ते खालीं जमिनीवर अंथर- लेल्या चटईवर बसून ओबडधोबड चरख्यावर सूत कातीत होते. त्यांची बायको पलीकडे खोलींत होती. त्यांच्या साडीलाही खूप चुणी पडलेल्या असून त्याही आंत सूत कांतीत होत्या. देसाई रोज पांच्चे याड सूत कांततात. चरखा हें एक अगदीं साधें यंत्र आहे. तें दरेक शेतकऱ्याला बनवितां किंवा स्वस्तांत खरीदतां येणें शक्‍य चै




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now