नकलाकार भोंडे | Nakalaakaar Bhonde

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नकलाकार भोंडे  - Nakalaakaar Bhonde

More Information About Authors :

भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

Add Infomation AboutBha. Vi. Varerkar

वामनराव परांजपे - Vamanrav Paranjape

No Information available about वामनराव परांजपे - Vamanrav Paranjape

Add Infomation AboutVamanrav Paranjape

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(२) येत नाहीं. सर्वच भूमिका साऱ्याच नटांकरवीं उत्तम स्वसूपांत प्रदर्दित केल्या गेल्या, असेंच समजलें जातें. तिर्थे अभिनयाच्या अचूकपणाची कसोटी नसते. कारण लेखकाने निर्माण केलेली मूळ भूमिका लिखित असल्यामुळे तिचा आविप्कार अमुक एका विशिष्ट स्वरूपांत झाला पाहिजे, असें म्हणतां येत नाहीं. त्या भूमिकेचा तो आविष्कार टेखकाच्या मूळ कल्पनेला विसंगत नसला, प्रेक्षकांच्या दृष्टीने हृद्य असला, मानसशास्त्राच्या रृष्टीर्ने अप्रस्तुत नसला, म्हणजे तो आविप्कार योग्य झाला, अर्स॑ समजले जात. एवढ्या कसोटीला तो उतरला म्हणजे तो आविष्कार कितपत यथातथ्य आहे, याची कसोटी कुणी लावीत नाहीं. अभिनयाचं स्वरूप अमयाद असतं, हें वरील हॅम्लेटच्या उदाहरणावरून सहज कळून येण्यासारखे आहे. भावाविप्काराला मुद्राभिनय, अंगविक्षेप, देहाच्या विशिष्ट अवयवांची विदिष्ट प्रकारें केलेली हालचाल, उच्चारधमं, आवाजाची फेक आणि शब्दामागील असलेला भावनेचा अधिक्षेप यथातथ्य स्वरूपांत झाला, प्रेक्षकाच्या सद्ददयी बुद्धिमत्तेला पटण्याइतक्या यथा- तथ्य स्वरूपांत झाला म्हणजे-तो अभिनय सफल झाला, असें समजण्यांत येते. नाट्याभिनयाची कसोटी एवढ्याच मर्यादेंतून लागत असते. नाटकांतील अभिनय कथासूत्राच्या अनुरोधाने जे पात्रांचे स्वभावविशेष लेखकानं योजले असतील त्यांना अनुसरून असतो. त्याला एक व्यापक स्वरूप असत. नाटकांतील अनेक भूमिकांतील एका भूमिकेच्या आविष्काराचें स्वरूप अन्य भूमिकेशीं जी त्या विशिष्ट भूमिकेचा संबंध असतो त्याला असु- सरून वेगवगळ्या स्वरूपांत प्रतीत हांत असत. त्याला अपवाद एकच : जनांतिक अथात्‌ स्वगत भाषण. नाटकांच्या तंत्रांत जुन्या स्वगत भाषणाला महत्त्व असे. अंतःकरणाच्या खालच्या थरांत दडलेले विकार वाचेच्या द्वारें व्यक्त करून दाखविण्यांत या स्वगतांची कसोटी असे. इतर पात्रांशी संबंध येत असल्या* मुळे नटाच्या अभिनयकोशल्याला जी एक मर्यादा पडते, ती स्वगतांच्या अभिनयांत दुरावलेली असल्यामुळें अभिनयदृष्ट्या नटाचें व्यक्तित्व त्यांत पूर्णत्वाने प्रतीत होतं. या विशिष्ट परिस्थितीमुळें “स्वगतात्मक अभिनयाला नाटकांत विशिष्ट स्थान असे. आणि म्हणूनच त्या अभिनयाला प्रेक्षकांच्या दृष्टीनें महत्त्व येत होते.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now