आस्तिक | Aastik

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aastik by साने गुरुजी - Sane Guruji

More Information About Author :

No Information available about साने गुरुजी - Sane Guruji

Add Infomation AboutSane Guruji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आस्तिक १० “त्या पूर्वीच्या युद्धाच्या तुम्ही गोष्टी सांगूं लागलां म्हणजे आम्हांला वाईट वाटतें. एखादे वेळेस मला चेवहि येतो. वीर व्हावें असें मला वाटतें. वत्सलेच्या आजोबांची ती तलवार तुम्ही मला द्याल? वत्सलेच्या वडिलांचे तें धनुष्य मला द्याल ? वणव्यांत ना ते सांपडून मेले १” कातिकानें पुन्हां आठवण करून दिली. “ होय, कातिक. माझा तो गुणांचा बाळ, तो एकुलता एक माझा मुलगा, वणव्यांतून नागांची मुलें वांचवतां वांचवतां जळून मेला. नागांच्या एका लहानशा वसाहतीला कांहीं आर्यांनी आग लावली. वत्सलेचा पिता, तो माझा बाळ रानांत शिकारीला गेला होता. तो परत येत होता. त्यानें आक्रोश एकला. त्या ज्वाला पाहिल्या. तो धांवत गेला. त्यानें आगींत उडी घेतली* एका मातेचीं मुलें घरांत होतीं. तीं मुलें आंतून ओरडत होतीं. माता बाहेरून किकाळ्या फोडीत होती. आपलीं मुलें आपल्या डोळयांसमोर आगींत जळून जाणार ह्या विचारानें ती मूच्छित झाली. परंतु माझा बाळ शिरला त्या आगींत. अंगावरच्या वस्त्रांत तिचीं दोन मुलें गंडाळून तो बाहेर आला. आपल्या बाहूत त्यानें ती घेतलीं. त्या मातेजवळ तीं दोन मुलें त्यानें ठवलीं. रत्नाकर घरीं आला, परंतु आगींत भाजून आला होता. उपचार केला; परंतु तो मरण पावला. मी पुत्रहीन झालें. परंतु दुसर्‍या मातेच्या जीवनांत त्यानें आनंद ओतला. तो खरा मातृपूजक जो दुसऱ्या मातांचीहि पूजा करतो, तो खरा धमंपूजक जो दुसऱ्या धर्माबद्दलहि आदर दक्षंवितो. वत्सलेचा पिता नाग्यंची निदा करीत नसे. नागपूजेच्या वेळीं तोहि त्यांच्या उत्सव-समारंभास' जाई. आर्यजातीय लोक त्याचा तिरस्कार करीत, त्याला नांवें ठेवीत. परंतु तो शांत राही. गुणी होता माझां बाळ.” सुश्रृतेच्या डोळ्यांतून पाणी आलें. “ तुम्ही वत्सलेच्या आईला कां जाऊं दिलें? जशा तुम्ही राहिल्यात तशा त्या राहिल्या असत्या. आई नाहीं म्हणून वत्सला एकदां आमच्याकडे रडली होती.” कातिक म्हणाला. “ माझे पति कुरुक्षेत्रावर पडले. ते लढाईला गेले तेव्हां माझ्या पोटांत बाळ वाढत होता. जातांना ते म्हणाले, मी मेलों तर सती जाऊं नकोस. बाळ होईल, त्याला वाढव. त्याच्या सेवेंत माझीच सेवा करशील. कुळाचा तंतु तोडूं नस. परंपरा चालली पाहिजे. अश्षानेंच पितुक्र्ण फिटतें.' मीं म्हटलें, असें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now