जागतिक इतिहासाचें ओझरतें दर्शन १, २ | Jaagatik Itihaasaachen Ojharaten Darshan Khand 1, 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jaagatik Itihaasaachen Ojharaten Darshan Khand 1, 2 by पं. जवाहरळाळ नेहरू - Pt. Jvaharlal Neharu

More Information About Author :

No Information available about पं. जवाहरळाळ नेहरू - Pt. Jvaharlal Neharu

Add Infomation About. Pt. Jvaharlal Neharu

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
४ जागतिक इतिहासाचें ओझरतें दशेन मुलेबाळे, आपल्या कुटुंबाची सुखदुःख या किंवा अशाच गोष्टींवर खिळलेले असतात. पण केव्हां तरी एक काळ असा येतो, कीं सगळा समाजच्या समाज एखाद्या श्रेष्ट कायाच्या निष्ठेने भारठा जातो आणि मग अगदीं सामान्य, साध्यासुध्या अशा न्लिया आणि पुरुष सुद्धां वीर बनतात आणि मग त्या समाजाचा इतिहास अंतःकरण खळबळून सोडणारा आणि क्रांतिकारक होतों. महान्‌ नेत्यांच्या ठिकाणीं असेच कांहीं असते, कीं त्यामुळे सवे समाजाला स्फूार्ते मिळते आणि त्यामधील सर्वीनाच महत्कार्ये करण्याची शक्ति येते. ज्या वर्षी तुझा जन्म झाला-१९१७-ते वर्ष इतिहासातील असंच एक संस्मरणीय वर्षे आहे. त्या वर्षी, गरीब, दलित, दीन, यांच्याविषयींच्या सहानुभूतीने आणि प्रेमाने ज्याचें अंतःकरण ओथंबलेले होते अश्या एका महान्‌ नेत्याने, इतिहासामध्ये कर्धींही विसरले जाणार नाहीं असे एक उदात्त प्रकरण आपल्या समाजाकरवीं लिहविलें. ज्या महिन्यांत तुझा जन्म झाला त्याच महिन्यांत त्याने - छेनिनने - ते मोठे क्रांतीचे कार्य सुरू केलें. आणि त्यामुळे आज राशिया व सायबेरिया यांचे सारेच रूप पालटून गेले आहे. तर आज इकडे आपल्या भारतवर्षात दुसरा एक असाच महान्‌ पुढारी काये करीत आहे. त्याच्याही अंतःकरणांत दुःखाने गांजलेल्यांबद्दल असेंच प्रेम ओथंबून राहिले आहे आणि त्यांना साहाय्य करण्यासाठी त्याच्या अंतःकरणाला सारखी तळमळ लागून राहिलेली आहे. आपल्या समाजाने पुन्हां पूणे स्वतंत्र व्हावें आणि भुकेने मरणाऱ्या आणि गरीच, दान, दलित अशा जनतेवरील दुःख व अन्याय यांचे दडपण नाहीसे व्हावें यासाठीं त्या आपल्या नेत्याने आपल्या समाजाला एक प्रचंड पराक्रम आगि उदात्त त्याग करण्याची स्फूर्ते दिली आहे. आज बापूजी भले तुरुंगांत असोत, परंतु त्यांच्या संदेशाची जादू भारतवषीतील कोट्यवधि लोकांची अंतःकरणे नकळत भारून टाकीत आहे; आणि स्त्रीपुरुषच काय, परंतु लहान लहान बालकें सुद्धां जगुं आपल्याभोंवर्तींचे दुबलतेचे कवच फोडून आपलीं लहान लहान खुराडीं साइून बाहेर येऊन भारत- वर्षांच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील शिपाई होत आहेत. आज हिंदुस्थानांत आपण असा इतिहाप्त घडवीत आहोंत; आपल्या डोळ्यांदेखत ह सार घडत आहे. या सवे भव्य इतिहास-नाटकांत आपल्यालाही थोडा भाग घ्यावयास सांपडत आहे, ६ आपले भाग्य आहे. या प्रचंड चळवळीमध्ये आपली भूमिका कोणती असावी, त्यांत आपण कोणता भाग घ्यावा, कोणतें काम आपल्या वांट्यास येईल ह मला नाहीं सांगतां येणार. पण, कोणते का काम येईना, एक गोष्ट आपण लक्षांत बाळगली पाहिजे ती ही, कीं जीमुळें आपल्या कार्याला कर्मापणा येईल किंवा आपल्या समाजाच्या कीतीला - सन्मानाला - अब्रूला धक्का लागेल अशी कोणतीही कृति आपल्या हातून होतां कामा नये. आपल्यालाही भारतवर्षांचे शिपाई व्हायचे आहे ना! तर मग भारतवर्षांची अब्रू आपल्या हातांत आहे आणि ही अन्नू आपण एक पात्र ठेव म्हणून संभाळली पाहिजे,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now