मराठ्यांची बखर ६ | Maraathayaanchii Bakhar 6

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathayaanchii Bakhar 6  by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(३) 9. त्यानंतर त्याचे राज्यांत कितीएक जागीं बंडें उत्पन्न झालीं; तीं अशीं कीं, तो बादशाह एक बंड' मोडी तों त्याला दुसरे बंडाचे वतमान कळे, असे होऊं लागले. शेवटीं अफगाण लोक व उत्तरेकडचे लोक, हा धनी योग्य नव्हे असे जाणून रा ज्यांत आपणच सत्ता करूं लागले; यास्तव बादशाहाने फोज उत्तरेकडे दूर योजिली. त्या संधीत जो पूर्वी मुसलमानांनीं जिंकिलेला तेलंगणच्या वरंगूळ नगराचा राजा, तो मुलखांतून फोज घेऊन आला, आणि मुसलमान लोकांशीं मोठ्या युक्तीनें युद्ध करूं लागला. ते वेळेस बादशाह संपूर्ण दक्षिणेच्या बंदोबस्तास मोठी फोज धरूं ला- गला. इतक्यांत असें मोठे बंड उत्पन्न झालें कीं, नमेदेचे दक्षिणेस जितकीं सझुसल- मान लोकांचीं वेगळीं वेगळीं संस्थाने झालीं तितक्‍्यांचे कारण तं बंड. त्या बंडाचे मूळ असं आहे कीं, पूर्वी गुजराथी लोकांनीं कांहीं बंड केलें, ते बादशाहाने मोडिलें; तेव्हां ते लोक बादशाहाचे भयाने पळाले, ते दोलताबादकरांची पाठ निघाले. या- स्तब बादशाहाने दोलताबादकरांस पदच्युत केले, आणि सेवकांस आज्ञा केली वीं, गुजराथी लोकांस ह्मणावे, तुह्मी! निभयपणें हुजूर येऊन भेटावें.' तें सेवकांनीं सां गितल्यावरून गुजराथी लोक विश्वासाने बादशाहाचे भेटीस जाऊं लागले. ते समयीं बादशाह फोजेसहित गुजराथेंत होता ह्मणून ते तिकडे गेले. ते गुजराथेजवळ गेले तों, त्यांस असें वाटले कीं, बादशाह आह्मांस बोलावून नेऊन कांहीं घात करील. याकरितां जे त्यांना नेणारे बादशाहाचे लोक त्यांचे बरोबर होते, त्यांस तेथेंच मारून बंडाचा झेंडा लावून माघारे दौलताबांदेस चालिले. तेव्हां वाटेनें जातां जातां, जे संस्थानी लोक बादशाहापासून त्रास पावले होते, ते त्यांस मिळूं लागले. तें सेन्य असे जमले कीं, तें दौलताबादेजवळ जातांच त्या किल्ल्यांतल्या लोकांनीं ह्या सैन्यापुढे बादशाहाचें कांहीं चालणार नाहीं, असं जाणून दोलताबादेच्या मुख्य कारभाऱ्यास केद केले, आणि किला बंडवाल्यांस दिला. नंतर त्या बंडाचे लोकांस असें वाटले वीं, ह्या एवढ्या मोठ्या सेन्यास धनी एक असावा; परंतु तं सेन्य एकाएकीं जम- लेलं, ्मणून त्यांत कोणी राज्य करावयास योग्य आहे किंवा नाहीं, हें कोणास कां- हींच समजेना; यास्तव एक इस्माएल नामे एकहजार स्वारांचा सरदार होता, त्याला बादशाह करून त्याचे नांव नासिरुद्दीन ठेविलें, आणि तो दौलताबादचा तक्ताधिपति केला. हें वतमान महंमदशाह बादशाहास कळतांच, तो फोजेसुद्धां गुजरार्थतून आला. तो दौलताबादेस येतो तों ते बंडवाले युद्धास सिद्ध होते, ह्मणून त्यांचें व या बादशाहाचे तत्काळ युद्ध झाले. त्या प्रसंगीं दोघांतून एकाचाही जय झाला नाहीं, परंतु महंमदशाहाचें सेन्य ज्या जागीं लढाई झाली त्याच जाग्यावर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now