भारतमाता की जय | Bharatamata Ki Jay

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bharatamata Ki Jay by विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

Add Infomation AboutViththal Vaman Hadap

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र्ट महाराष्ट्र सारस्बतांतील अग्रस्थान-ग्रामाणिक मतभेद काय असतील ते वास्तव दृष्टीनें जोपासूनही मान्य करण्याइतकी तरी माणुसकी विद्यमान मराठी कादंबरीकारांत माझ्यापुरती तरी मला आहे, हें आमच्या वाचकवर्गाला दाखवून देण्याची संचि मला घ्यायची होती. या हेतून-नुसत्याच नव्हे तर अतिरेकी हेतून-प्रेरित होऊन मीं श्री. वि. स. खांडेकर यांना चार ओळींची कां होईना, पण प्रस्तावना लिहि- ण्याची विनंति केळी. त्यांच्या आजारीपणाकडेही मीं निष्ठ्रपणें पण सद्भावानें दुलक्ष केलें, आणि त्यांनींही आपल्या प्रकृतीला अन्याय करून देखील माझ्या विनंतीला मान दिला. प्रश्न ल्हान अथवा मोठ्या, अनुकूल अथवा प्रतिकूल प्रस्तावनेचा सुतराम्‌ नव्हता. प्रश्न मीं बळेच आपुलकीने त्यांच्याजवळ जाण्याचा व आम्ह जवळ जवळ येऊं लागण्याचा होता. इतिहास व ऐतिहासिक कादंबरी यांच्यांतील अंतर ध्यानीं घेऊन वाचक या कादंबऱ्या वाचतीलच. कथानकाच्या ओघांत आलेल्या खऱ्या ऐतिहासिक व्यक्तींच्या उल्लेखांखेरीज बाकीच्या व्यक्ती व त्या अनुपंगानें आलेले स्थल-काल-घटना निर्देश वास्तवतापूर्ण परंतु पूण काल्पनिक आहेत व त्यांचा कोणत्याहि विद्यमान अथवा दिवंगत व्यक्तीशीं कसलाही संबंध आणण्याचा लेखकाचा मुळींच हेतु नाहीं, हेंही वाऱचकांनीं कृपापूर्वक ध्यानीं ठेवावें. “कादंबरीमय आंग्लशाही 'च्या सर्व सहाही कादंत्रऱ्यांचें स्वरूप अगदीं एकसारखे नाहीं. पहिली व दुसरी कादंबऱ्यांचीं कथानकें कालानुक्रमे परंतु स्वतंत्र आहेत. पहिलींत उत्तर भारतांतील वातावरण आहे. दुसरीपासून पुढील कथानकांतील नियोजित कार्यक्षेत्र मुख्यतः मुंबई व महाराष्ट्र हें आहे. दुसऱ्या कादंबरींत मिटाच्या सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीय महाराष्ट्राचें संक्रमणकालीन जीवन स्थूलतः चित्रित केलें आहे. तिसरी, चौथी, पांचवी व सहावी या कादंबऱ्यांत कालानुक्रमार्न कथानकसूत्र तत्त्वतः एकच, भारतांतील क्रमप्राप्त तत्कालीन विद्याल जीवनगति चित्रित करणारे, कांहीसें दरंग्रजींतील * सागा?च्या घाटणीचें आहे. शेवटची सहावी कादंबरी त्या कथासूत्नांतीलच खरी; परंतु प्रथमपुरुषी अथवा आत्मचरित्रपर आहे. शेवटच्या चार कादंबर्‍या क्रमानें वाचल्यानें त्यांतील कथासंगति अधिक स्पष्ट व सुगम होते, प्खढेंच येथें मत्म वाचकांच्या नजरेला आणून द्यावेंसें वाटतें. वकीलवाडी, नाशिक, ॉ हडप ता. १५ ऑगस्ट १९५१ र विठ्ठल वामन हडप




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now