वाटचाळ | Vaatachaal

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वाटचाळ  - Vaatachaal

More Information About Author :

No Information available about रा. मि. जोशी - Ra. Mi. Joshi

Add Infomation About. . Ra. Mi. Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गाज वारि मनोहारि.. ५ विविध वणे, विविध प्रकार, विविध वेषभूषा, विविध भाषा ! पण त्या सगळ्याना एका श्रद्धेने हरिद्वारला आणलें होतं. हिमालयापासून निघून भिन्न भिन्न भूप्रदेशांतून वहात जाणारी गगा जशी एक, तज्ा काइमीरपासून कन्याकुमारीपय्यंत आणि दढाक्यापासून कराचीपर्यंत भिन्न भिन्न जनसमाजातून वाहणाऱ्या एका संस्कृतिनिष्ठेनें त्याना इथें आणलें होतें. गंगेत बुडी मारल्यानं पुण्य लाभत ह्या भावनेने *हर गंगे? म्हणत ते स्नाने करीत होत. स्त्रियाच्या ओल्या वस्त्रातून त्यांचीं अंगप्रत्यंग दिसत होतीं. स्पष्ट दिसत होतीं, अस्पष्ट दिसत होतीं. त्याचा त्यांना संकोच नव्हता. त्या केवळ गंगास्नानाच्या धुंदीत बेभान होत्या. आणि त्याना संकोच नव्हता म्हणूनच कांही अधाशी डोळे त्याच्याकडे पहात होते. पाप पत्करूनहि पहात राहावें असें काहींचं रूपसीष्ठव असतं हें कोण नाकारील ? पण तसा जो पाहील त्याचें पाप त्याच्या मनांत. स्वान करणारीला त्याचा दोप नाहीं. तिच्या पदरात गगास्त्ानाचे पुण्यच पडत. अशा एखाद्या रूपलतंत तुमची ष्ट गुरफटली असेल तरी ती तिथून काढून इतरत्र न्या. गंगेच्या प्रवाहात यात्रेकरूनीं फुलाचे द्रोण सोडले आहेत ते पाहा. पांढरीं, पिवळीं, लाल, गुलाबी अशा फुलानीं भरलेले लहान-मोठे द्रोण प्रवाहां- तून तरंगत जाताहेत, त्यांनीं पात्राची शोभा प्रसन्न झाली आहे. पलीकडल्या तीरावर कांहीं मंदिरे आहेत. भांवताली गंगेचं टगडाळ वाळवंट पसरलं आहे. आणखी पलीकडे वृक्षराजीची हिरत्री वेपभूपा केलेल्या हिमनगाच्या छाय्या कन्यका आहेत. आणि त्याच्या पाठीशीं गडद निर्ळे आकाश आहे. वरच्या टेकड्या चढत गेल्या आहेत. खालच्या बाजला ह्यण्न्त्संग जिला मो-यू-लो म्हणतो ती प्राचीन--कदाचित्‌ हरिद्वारपेक्षाहि प्राचीन--मायापुरी आहे. तिच्यापुढं गंगेच्या कालव्याचा आरंभ आहे. आणि याच्याहि पुढं, वुग्हांला दिसत नसेल, पण कनखल आहे. मुख्य घाटापुढें एक बेट आहे. त्यावर राजा बलदेवास ब्रिडलान बांधलेलं घंटाघर आहे, आणि ब्रह्मकुण्डाच्या वरच्या बाजूला कॅक्रीटचा ब्राघलेला एक हत्तीसारखा बेढब पूल आहे. प्राचीन रमणीय स्थानांच्या प्राचीनत्वाशीं आणि रमणीय्त्वाशीं विसददद्य असें बांधकाम उभारण्यांत आमचा हातखंडा आहे, त्याचीं हीं प्रत्येतरे आहेत. त्या दिवद्ींचं खान कुट तरी केलेच पाहिजे म्हणून मीं बेटावर जाऊन पलीकडल्या प्रवाहात खान केले आणि परतलो. खानाचा खरा आनंद मीं दृषीकेदसाठीं राखून ठेवला होता.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now