अमीर खुस्त्रो | Amir Khustro

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
5 MB
                  Total Pages : 
82
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Authors :

भगवंत देशमुख - Bhagavant Deshmukh
No Information available about भगवंत देशमुख - Bhagavant Deshmukh

सय्यद गुळाम सम्नानी - Sayyad Gulam Samnani
No Information available about सय्यद गुळाम सम्नानी - Sayyad Gulam Samnani
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अमीर खुस्रो ] 1
“जेथे दोन बादशहा एक होतात तो देश किती देवशाली होय! ज्या काळात दोन
करार एकरूप होतात तो काल किती पवित्र होय! पुत्र वादशहा आहे आणि बापही
बादशहा आहे! या देशाचे केवढे हे वैभव की दोन बादशहा येथे एक झाले आहेत!
जगावर सत्ता गाजविण्यासाठी दोन शक्तिशाली बादशहा एक झाले आहेत! एक
काळाचा सहाय्य़कर्ता सुलतान महमूद असून, त्याचा अधिकार राज्याच्या चारी
दिशांना व्यापणारा आहे, तर दुसरा बादशहा सार्या जगाचे भूषण असणारा कैकुबाद
असून, त्याच्या अधिसत्तेखाली ईरान व तूरान एक झाले आहेत.''
नंतरच्या काळात, कैकुबादच्या इच्छेनुरप किरान उद् सआदैन* हे कथाकाव्य
(मसनवी) त्यांनी लिहिले तेव्हा त्यातही हा प्रसंग वर्णिला आहे. आपला आश्रयदाता
हातिम खान याच्या जवळ अयोध्या येथे खुस्लो राहिले व तेथून परतल्यावर सहा
महिन्यांच्या .आत हे कथाकाव्य पूर्ण झाले. खुस्रोच्या म्हणण्याप्रमाणे या धड्यात त्यांनी
13944 शेर रचले होते. यावेळी त्यांचे वय 36 वर्षाचे होते.
या मसनवीमध्येच खुस्रोची एक गझलही समाविष्ट आहे. दिल्लीच्या रूपवतींचे तीत
त्यांनी असे संस्मरण केले आहे :
“दिल्ली! आणि दिल्लीच्या त्या विविध प्रकारची वस्त्रे मस्तकापर्यंत धारण
करणाऱ्या तरुण ललना! ज्या वाटेने त्या जातात ती वाट हलत्या डोलत्या फुलांनी
बहरून जाते. त्या पुढे चालत असतात आणि डोळ्यातून रक्ताचे अश्रू ढाळणारे
त्यांचे प्रियकर त्यांचा पाठलाग करीत असतात. या हिंदू सुंदरींनी मुसलमानांना
सूर्योपासक करून टाकले आहे.''*
कैकुबादने अवघी तीन वर्षे राजसिंहासन उपभोगले. मात्र कुतुबुद्दीन ऐबकने ज्याचा
पाया घातला व शम्सुद्दीन अंल्तमशने त्याला बळकटी आणली त्या गुलाम वंशाच्या
राजसत्तेला ही तीन वर्षे विघातक ठरली. मलिक निजामुद्दीनच्या कारस्थानांची स्वतः
कैकुबादला कल्पना आली खरी. पण तोवर धनुष्यातून बाण निसटला होता. मलिक
निजामुद्दीनच्या तावडीतून आपली कशी तरी सुटका करून घेऊन कैकुबादने मलिक
जलालद्दीन खिलजी यास आरिजे मृमालिक (श्रेष्ठ अधिकारपद) हे पद सांभाळण्यासाठी
निमंत्रित केले. यावेळी कैकुबादची प्रकृती अगदी ढासळली होती व तो अंथरुणाला
खिळला होता. याच वेळी दोन गटांत चकमक उडून बरेच रक्त सांडले व जलाल्द्दीन
खिलजीला अनुकूल असणार्या गटांचा विजय झाला. जलाल्द्दीन खिलजी दिल्लीच्या
तख्तावर आरूढ झाला, याच अवधीत हतबल आणि दुर्बल झालेल्या कैकुबादचा कोणी
तरी वध केला. अशा तेने गुलाम वंशाची सत्ता संपुष्टात आली आणि सत्तेची सूत्रे
खिलजींच्या हाती आली.
* किटान-उल-सआदैन; पृ. २9
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...