स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ | Swami Vivekaand Samagr Granth

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ  - Swami Vivekaand Samagr Granth

More Information About Author :

No Information available about श्री एकनाथ - Sri Eknath

Add Infomation AboutSri Eknath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खंड. वेदांतमताचें सामान्य निरीक्षण. ९ होतो. तो नष्ट होतो, हेंही खरें. याकरितां मायेचें स्वरूप ऑनिर्वचनीय आहे, असा अद्वैतमताचा सिद्धांत आहे. याकरितां माया हीच या विश्वभासाचें कारण आहे. ब्रह्म सत्‌ असल्यामुळें प्रत्येक वस्तूचें तें अधिष्टान आहे. त्या वस्तूंतील “असणेंपणा* ब्रह्मामुळें आहे. तसेंच 'ही वस्तु अमुक' असें नाम-रूप मायेमुळें त्या असणेंपणाच्या ठिकाणीं भासतें. नाम-रूपामुळें त्या वस्तूस विशि- श्व व निराळेपणा प्राप्त होतो. अशा रीतीनें एकाच सत्‌ वस्तूवर मायेमुळे अनेक नाम-खूपांचा आरोप होऊन ही चराचर सृष्टि भासमान झाली आहे. प्रत्येक जीवात्मा वेगळा आहे या कल्पनेस अद्वैत सिद्धांतांत थारा नाहीं ही गोष्ट आतां आपल्या लक्ष्यांत आलीच असेल. प्रत्येक जीवात्मा वेगळा दिसतो याचें कारण माया आहे असें अद्वैतमताचें ह्मणणें आहे. जर सारें अस्तित्व केवळ एकरूपच आहे तर *मी,' 'तो,' “तूं,” या द्वैत कल्पनांस थारा कोठें राहिला १ आपण सवव वस्तुतः एकरूपच आहों. द्वैत कल्पनांचा उदय झाला कीं “मी? “तो' “तूं? यांचा उदय होतो आणि यांच्या उद्याबरोबरच दुर्गुणैक- मूर्ति सैतानाचाद्दी जन्म होतो. जगांत जें जें कांहीं “वाईट” या विशेषणानें ओळखलें जातें त्या त्या प्रत्येकाचें मूळ द्वेतभावांतच आहे असें तुह्यांला नि:- संशय आढळून येईल. “मी असुक' असा क्षुद्र द्वैतभाव स्वतःबद्दल माझ्या मनांत उत्पन्न झाला कीं त्याच क्षणीं बाह्य सष्टीशीं माझी ताटातूट होते- बाह्य सष्टीपासून मी अलग होतों. असें झालें ह्मणजे भीतिह्दी लगेच माझ्या हृदयांत प्रवेश करते. जेथ भीतीनें प्रवेद्य केला तेथें दुःखह्दी यावें हें रास्तच भाहे. हा, तो, तूं, मी इत्यादि भावना क्षुद्र आणि आकुंचित आहेत. ज्या भाव- नंत असल्या प्रकारचीं द्रेदें उरली नाहींत तीच भावना अत्यंत विश्ाल-सर्व- व्यापक-असून परमात्म्याचे रूपहि तेंच आहे. आकुंचित भावना दुःखार्चे माहेरघर असून सर्वव्यापी भावना हें सुखाचं वसतिस्थान आहे. विश्वांतील वस्तूंत जीं नाना रूपे आणि नाना नामें प्रतीत होतात हीं सर्व क्षणभंगुर असून मनुष्यप्राण्याचें खरं स्वरूप त्यांमुळें आच्छादित झाल्यासारखे दिसतें. तथापि या आच्छादनाचें स्वरूप चिरस्थायी नाहीं ह्दें लक्ष्यांत ठेवलें पाहिजे. या आच्छादनामुळें मदुष्यप्राण्याचें खरं स्वरूप वस्तुतः मुळींच बदलत नसून तें बदलल्यासारखा भास होतो. अत्यंत क्षुद्र जंतूपासून अत्यंत बुद्धि-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now