भूळ | Bhool
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
161
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)८ भूल!
येईना. त्यांतून घरांतला काळोख आणि बाहेर म्यळधार पावसाची झोड.
मी अंथरुणांत तळमळत पडलों होतों.
इतक्यांत बाहेरच्या दारावर जोरांत थाप ऐक आली. मी दचकलो,
अंथरुणांत उठून बसलो. थाप पुन्हां ऐक आली. आजंवानं नव्हे तर धमकी
देतांना मारतात तज्ली ती थाप होती. “ कोण आहे ? ' विचारण्याचा
किंवा उठून दार उघडण्याचा धीर मला होईना.
त्या दिवसांत रात्रीं अपरात्रीं दार उघडणं धोक्याचं होतं. हिंदुमसल-
नांचे दंगे एकदम वावटळीसारखे केव्हां आणि कुठे उठतील सांगतां येत
नव्हतं. ज्वालामृत्लीच्या स्फोटापूर्वी जमीन हादरावी, गडगडावी तशीच पुढें
होणाऱ्या फाळणीची दुदिचन्हं दंग्याच्या स्वरूपांत दिसं लागलीं होतीं. केव्हां
घातपात होईल नेम नव्हता. मला दार उपडण्याचं धाडस होईना.
पण दारावर अधिकच थापा बस् लागल्या तेव्हां मी उठलों आणि दिवा
लावला. दाराशीं जाऊन मी विचारलं *' कोण आहे ? ”
“ रघताथ चित्रे इथेच राहतात काय ?* बाहेरच्या माणसानं विचारलं.
त्याचा आवाज माझ्या ओळखीचा नव्हता, पण तो एकून माझी भौति पुष्कळ
कमी झाली. कुणी आपल्यांतलाच असावा अशा विचारानं मी दार उघडलं.
पाहतों तों फाटके मळके कपडे घातलेला एक म्हातारा पाठीवर पडशी
घेऊन उभा होता. पावसाचे ओघळ त्याच्या चेहऱ्यावरून वहात होते आणि
ती पडशी आणि कपडे भिजून काला झाले होते. मी (या * म्हणायची वाट न
पाहतां तो ओलाचिब म्हातारा घरांत शिरला. नव्हे, त्याच्या रूपानं
पापाच्या दरींत मला लोटणारी भूलच माझ्या घरांत शिरली! .. . .
User Reviews
No Reviews | Add Yours...