कविता संग्रह | Kavitaa Sangrah

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : कविता संग्रह  - Kavitaa Sangrah

More Information About Author :

No Information available about वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

Add Infomation AboutVaman Daji Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(३) (३) केरीकर विठ्ठल-या भागांत ज्या तिसऱ्या विठ्ठलाची कविता आली आहे, तो विठ्ठल नरासिह होय. हा गोमांतकांतील केरी नामक गांवचा राहणारा म्हणून याला केरीकर विठ्ठल असें नांव दिलें आहे. या भागांतील (१) वा[मनचरित, (२) श्ुकरंभा- संवाद, (३) कबीरकथा, आणि (४) परदे ३1१२१३1२१1२७-२९)३८-४०1७४-७६॥ ८१1८३-९३॥९७-१००॥१०३-१०८)११०-१२४)१२७-१३३ इतकी कविता विट्टल नरसिंह याची होय. या कवीविषयीं माहिती आमचे सन्मान्य मित्र रा० रा० भगवंत बालकृष्ण पे रायकर यांनीं कृपा करून पाठविली. तिचा सारांश असाः-हा कॉ्यप- गोव्रोत्पन्न गोंडसारखत ब्राह्मण गोमंतकांतील केरीगांवीं राहाणारा होता. याचें पुरे नांव विठ्ठल नरसिंह नाईक सांखोळकर' असें होतें, यानें आपल्या पदांत आपलें कुलदैवत मंगीश याचा वारंवार उल्लेख केला आहे. मंगीशाचें देवालय अंत्रूज महालांत बेलंग नांवाच्या गांवीं आहे. हा विट्ठल नरसिंह जाडा विद्वान असून यानें काशीच्या पंडितांपासून मानपत्र मिळविलें होतें. त्यांत त्यास बहुमानादाखल आसनास दोन पाट ठेवावे असें होतें, म्हणून त्यास 'दुपादी विठ्ठल? असें म्हणण्याचा परिपाठ होता. हा इतका विद्वान्‌ होता तरी त्यास उपरतिज्ञानाचा गंधही नव्हता असें दिसते आणि हा कवि विदोेषसा प्रसिद्धीस न येण्याचें कारण हेच असावें असें वाटतें. याच्या विद्वत्तेवरून त्यास “बिठ्ठलाचार्य” असेंही म्हणत असत. एकदां एके ठिकाणीं मोजीबंधनप्रयोग चालला, होता. त्या ठिकाणीं हे विठ्ठलाचाये पोंचळे. पण तेर्थे यांचा बहुमान झाला नाहीं म्हणून त्यांस फार वाईट वाटलें. त्या वेळीं “आच्छादन दूरीकृत्य* या प्रयोगास चुकताच आरंभ झाला होता; तेव्हां यांनीं क्तिग्मंडळीस प्रश्न केला कीं, 'या आपल्या दूरीकरणाची मयीदा कोठपर्यंत समजावयाची १ मंडपाचे तटापर्यंत, की गांवचे सीमेपर्यंत, कीं कोठपर्यंत, तें सांगावें १ नत्विग्मंडळींस कांहीं सांगतां येईना तेव्हां ह्यांनीं याची माफी मागून बहुमान दिला व प्रयोगास सुरवात झाली. हा कवि वेदशाक्रनकलानिपुण होता व्याप्रमाणें गायन- कलाभिज्ञ असावा असें त्याच्या पदांवरून दिसतें. ह्या कवीचा निश्चित काळ कळत नाहीं. तरी पण हा कवि बांदेंप्रामस्थ सोहिरोबा आ[बिये यांचे वेळीं म्हणले सुमारें १५०-१७५ वर्षांपूवी होऊन गेला असावा असें वाटतें. (४) या भागांत 'द्रौपदीवखहरण' [पून १७६-२००] स्हणून एक काव्य आहे तें बीडकर विठ्ठलाचें म्हणून आह्यी प्रसिद्ध केलें. पण त्याचें जनकत्व संशयग्रस्त दिसतें. ह्या काव्याच्या अखेरीस कवीचें नांव नाहीं आणि वर्णनपद्धति आणि रचनाशेली यांचें साटद्य या भागांतील इतर कोणत्याही काव्याशीं, नाहीं यावरून हें काव्य पूर्वोक्त विठ्ठलांपेकी कोणाचेंच नव्हे, असें तूते म्हटलें पाहिजे. या भागांतील काव्यांच्या कल्याविषयीं ज्यास माहिती कोणी कळविल्यास तिचा आम्हीं मोठ्या आदरानें स्वीकार करून 'काव्यसंप्रहा'च्या वाचकांस उपयोग दोईल अश्षी व्यवस्था करूं. 'काव्यसंग्रह'कार.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now