काळान्तीळ निवडक निबंध ४ | Kaalaantil Nivadak Nibandh 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaalaantil Nivadak Nibandh 4 by शं. द. जावडेकर - Shan. D. Javadekarशिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Authors :

शं. द. जावडेकर - Shan. D. Javadekar

No Information available about शं. द. जावडेकर - Shan. D. Javadekar

Add Infomation AboutShan. D. Javadekar

शिवराम महादेव - Shivram Mahadev

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) चौथ्या भागांतील विषय “काळ? पत्राचें चौथें वर्षे म्हणजे १९०१ मधील वर्षंप्रातिपदेपासून १९०२ च्या फाल्गुन अखेरपर्यंतचें वर्ष होय. हा काळ म्हणजे महाराष्ट्रांतील राष्ट्रीय पक्षाच्या नेरादयाचाच काळ होय. प्लेग आणि दुष्काळ या दोन आपत्तींनी होरपळून निघालेलीं जनता ब्रिटिश सरकारच्या जुलमाने हवालदिल झालेली होती. लोकमान्य टिळक आपला खडतर कारावास भोगून नुकतेच बाहेर आलेले होते. आणि नामदार गोखले हिंदुस्थान सरकारच्या कायदेमंडळांत लॉर्ड कझन यांच्या करड्या अमलावर सनदशीर टीका करण्याची पूर्वेतयारी करीत होते. ब्रिटिशांच्या जुलमाचा प्रातिकार केला असतां केवढे उग्र शासन प्रातिकार करणाऱ्यांना मिळूं शकते याचें प्रत्यक्ष दशन चाफेकर प्रकरणाने पुण्यां- तील जनतेच्या निद्शनास आलें होतें. ब्रिटिश सत्तेपुढे मान लववून न चाल- णारे राजकारण मुळासकट उपटून टाकण्यास ब्रिटिश सत्ता समर्थ आहे याचा अनुभव टिळकांना तुसंगांत टाकून सरकारने जनतेला दिलेला होता. सव आशिया खंड पादाक्रान्त करण्याची महत्त्वाकांक्षा धरून लॉड कझन तिबेट, इराण, अफगाणिस्तान हकडे आपलीं राजकारणे रचीत होते. आशिया खंडांत युरोपच्या तोडीची कोणतीही सत्ता उद्य पावूं शकेल अशी कोणास आशाही वाटत नव्हती. दक्षिण आफ्रिकेतील बोअर लोकांनी केलेले ब्रिटिश साम्राज्या- विरुद्ध बंड न्रिटिशांनी तात्पुरते तरी दडपून टाकले होत. आशियाप्रमाणे युरोपांतहि ब्रिटिशांना कोणी समान प्रतिस्पर्धी नव्हता. आपली वेभवशाली कारकीदे संपवून व्हिक्टोरिया राणी नुकतीच स्रिस्तवासी झालेली होती. ऐहिक वेभव आणि अनियंत्रित सत्ता यांच्या शिखरावर विराजमान झालेल्या ब्रिटि- शांना स्वगस्थ देवांची उपमा देऊन त्यांच्या प्रसादाने मिळतील तेवढे हक्क प्रात करून घेण्यांत समाधान मानणें हेच व्यवहाये राजकारण असें मानिले जात होतें. ब्रिटिशांनी आपले साम्राज्य कमाविताना कोणकोणती कपट-कारस्थानें कलीं त्यांची नचा न करतां त्यांना ज्या अर्थी एवढे मोठे सामान्य वेभव प्राप्त झालें आहे त्या अर्थी त्यांची पुण्याईच थोर असली पाहिजे हा सिद्धान्त ऐतिहासिक सत्य म्हणून प्रातिपादिला जात असे, पूर्ण चिकित्सक बुद्धीने ब्रिटिशांच्या राजनीतीची विचक्षणा करणाऱ्यांना जशी राजद्‌ंडाची भीति होती, तशीच व्यवहारदक्ष मुत्सद्दी म्हर्णीवणाऱ्यांकडून अविवेकी गणिले जाण्याची भीति होती. याच
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now