गोपुरांच्या प्रदेशांत | Gopuraanchyaa Pradeshaant

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : गोपुरांच्या प्रदेशांत  - Gopuraanchyaa Pradeshaant

More Information About Author :

No Information available about गंगाधर गाडगीळ - Gangadhar Gadagil

Add Infomation AboutGangadhar Gadagil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सुंबईला निरोप प बसला आणि मग माणसांचा एक लॉटाच आंत शिरला. अल्पावधींत सामा- नाचे ढिगारे रचले गेले. माणसें दाटीवाटीने बाकांवर बसलीं. सामानावर बसलीं. अवघडून मध्येंच उभीं राहिलीं. दाराशीं गर्दी करून राहिलीं. स्वस्थपणें चहा घेण्याचें आमचें स्वप्न विरले. मी त्या गर्दीतून कसाबसा झोकांड्या खात ग्राहेर पडलों. दोन चहाचे कप आंत दिले, मग स्वतः नहा प्यायले आणि गाडींत पुन्हा बुडणाऱ्या माणसासारखे हातवारे करीत शिरलो. गाडीनें पुणें सोडलें. संध्याकाळहि झाली. आणि कां कोण जाणे, मी प्रवास करीत आहे हं एकदम मला खरं वाटर लागलें. आपल्या दिनक्रमाच्या वेळा- पत्रकांतून आपण बाहेर उडी घेतली आहे हें पटले. अंगांतून एक उम्मादाची, वेफिकिरीची शिरशिरी धावली. आणि पुढें सगळा प्रवास ह्याच धुंदीत केला. असें कां झालें? कदाचित्‌ गाहींतल्या गर्दीमुळे आणि खेचाखंचीमुळें असेल, आणि दुसरें असें कीं सुंबई-पुणें हा टापू आपला वाटतो. त्या नेहमीं घडणाऱ्या प्रवासाचे नावीन्य वाटत नाहीं आणि मनावस्वीं बंधनंहि गळून पडत नाहींत, पण पुरणे सुटले म्हणजे वाटतें, “आतां कोण आपल्याला पहातो! आतां स्वच्छंडपणं वागायला हरकत नाहीं. ”? पुण्याच्या आसपास प्रसन्न हिरवळ आहे. भाजीपाल्याची लागवड आहे. पाणी मधून मधून झळझुळतें. पण पुढें सपाट काळा माळ अस्ताव्यस्तपणें पसरलेला आहे. तेथें सह्याद्रींतले चटउडतार नाहींत आणि तेथली ह्रिवी झाडी पण नाहीं. नाहीं म्हणायला एक टंगण्या टेकड्यांची रांग गाडीबरोबर दूरवर निरोप द्यायला येते. सूय मावळला आणि उजाड माळावर उजाड संचिप्रकाश भरकटू लागल. रंगांची विविधता लोपली होती. छायाप्रकाशांचा खेळ संपल्या होता. आणि अस्फुटता सर्वत्र भरून राहिली होती. टेकड्यांच्या रांगेपलीकडे एक टपोरी चांदणी उगवली होती आणि बरोबर त्या चांदणीच्या खालीं टेकडीच्या माथ्या- वर एक शुभ्र सुबक देवालय एकाकीपणें उभं होतें. हा विजनवासी देव कोण, असा महा प्रश्न पडला. एका सहप्रवाशानें सांगितलें कीं, तें शंकराचें देवालय आहे. कुठच्या असुराचें निदळण करून तो शीथ्रकोपी केलासनाथ तेथें एकांतांत विसांवळा होता, कोण जाणे ! एव्हाना पुण्यास डब्यांत चढलेलीं परकीं माणसें आपलीं झालीं होतीं समजुतीनें सारे एकमेकांची सोय पहात होते. त्या माणसांनीं भरलेल्या डब्यांत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now