समरांगण | Samaraangan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
80
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(६)
मंदा० : रोजरोज फिरायचे तरी कुटं १
शारदे : कां? फिरण्यासारखी ठिकाणं थोडी आंहेत कां इर्थ ?
मंदा० * एकाद्या पिसाटासारखं एकटं फिरण्याचा कंटाळा आलाव मला !
दारद : एकटं कां ? तुळा खप मैत्रिणी आहेत हें माहीत आहे मला.
मंदा० : मैत्रिणी आतां मोकळ्या नाहींत माझ्याचबरोबर फिरायला.
दारद २ [ हंसत) अस्सं ! मग वाचीत बसावं. शिकलेल्या माणसांना
वाचनाशिवाय विरंगुळा नाही दुसरा,
मंदा० : कांहीं वाचावं असं बाटतच नाहीं अलीकडे मला. काय
द्दोतंय कुणास ठाऊक !-पण पुस्तक घेतलं कीं फेकून द्यावसं वाटते. आत्तांच
पहाना, कामावरून आलें. असा त्रासला होता जीव; फीनो लावून पाह्यला;
बाचीत बसले; पण कशांतच मन रमेना. [ घड्याळांत सहाचे ठोके पडलेले ऐं
ग्रेतात ] अय्या ! सहा वाजले वाटते !
दारद : अजून कसा नाहीं आला प्रभाकर ? हली त्याचं आफिस उशीरां
मुटतं वाटतं ?
मंदा० : छेः त्याचं आफिस सुटतं पांचलाच.
शरद : मग यापूर्वीच तो घरीं यायला पाहिजे होता ! ऑफिस सुटल्या-
बरोबर प्रथम घरी यायची त्याची संवय आहे.
मंदा[०: ती त्याची संवय अलीकडे मोडली आंहे, ऑफीस सुटलं कीं,
परस्पर फिरायलाच जातो तो.
शरद : कां ! प्रभावहिनी आणि मधू इर्थ नाहींत म्हणून कीं काय !
मंदा०: इथंच आहेत ती दोघ.
द्ारद : मग इतका वेळ प्रभाकर बाहेर राहण कधींच शक्य नाहीं.
मंदा : प्रभावहिनीला घरीं यायला सहा साडेसहा होतात.
शरद २ म्हणज, जाते तरी कुठं ती !
मंदा[० ' नोकरी धरल्ये तिनं.
शरद : प्रभावहिनीनं नोकरी धरली आहे !
User Reviews
No Reviews | Add Yours...