कुळकथा | Kulakatha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kulakatha by आनंदीबाई जयवंत - Aanandibai Jayvant

More Information About Author :

No Information available about आनंदीबाई जयवंत - Aanandibai Jayvant

Add Infomation AboutAanandibai Jayvant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कुलकथ. “मि कन स्माति पहिली. माझा जन्म. जा नामाकित थोर पुरुषांची जी जीवनचरित्रे लिहिलीं जातात; तशापैकीं मी कांहीं मोठा पुरुष नाही; तरी पण माझ्या आयुष्यांत जीं स्थित्येतरें झालीं, त्याची साधारण हकिकत एकत्र ग्रथित केली असतां त्यापासून एकाद्यास जरी त्याचा उपयोग झाला तरी मला जे कांहीं कष्ट पडले त्याचे सार्थक झालें असें मला वाटेल, असा मनांत विचार येऊन कांही वर्षांपूर्वी ज्या ज्या लहानपणच्या गोष्टी आठवल्या त्याची टांचणें मीं करून ठेविलीं होती. त्यावरून माझ्या क्षद्र जीवनाचें चरित्र मीं लिहावयास घेतले. पटे आपल्यासारख्या यट्किचित्‌ माणसाचे चरित्र लिहिणें म्हणजे आपल्या मूर्खपणाचे प्रद- शे-. जगासमोर करणे होय ,असे मनात येऊन मीं लिहावयास घेतलेले चरित्र तसेंच अधवट टाकून दिले, पण मध्यंतरी माझ्या एका प्रेमळ मित्राच्या हातीं माझ्या टिपणाचे एक पान आले व माझे चरित्र लिहिण्याविषयी त्याने फारच आग्रह केला. त्याचे मन मला मोडता येइना; कारण त्याचा व माञ तसाच जिब्हाळ्याचा संबध होता. माझ्या दुसऱया मित्रानी पण मला फार भीड घातली, तेव्हां मीं हें माझें चरित्र लिहिण्यास सुरुवात केली. साझा जन्म जेब्हां झाला त्यावेळची तारीख वगैरे मला कांहीच माहीत नाहीं. सन १८९१ च्या माघ महिन्यांत मी एका सोमवारी, अमवास्येच्या व प्रतिषदेच्या संधीत, रात्र सरता सरता सूर्योदय होण्यापूर्वी जन्मलो ! ज्या वेळीं या मृत्युलोकी मी प्रथम डोळे उघडले,त्याच वेळीं माझ्या मातेनें आपले डोळे मिटले | मी जन्मलो ती वेळ बहुधा कुबेळ अगर ब्यतिपात, शनीची वक्रदाशे, नक्षत्राचा क्षय यापकी कांहीं तरी खात्रीनें असलेच पाहिजे, निदान मूळ नक्षत्र तरी असेलच ! माझ्या मातेने पुत्रमुख पहाण्यापूर्वीच आपले डोळे कायमचें झांकले ! घरांत नूतन बालक जन्मले म्हणजे सवास आनंद वाटतो .विशेषतः तो सुलगा असला तर विचारावयास नको ! पण माझ्या जन्मामुळे कोणालाच आनंद तर वाटला नाहीच परंतु उलट दुःखच झालें!माझ्यासारख्या दुदैवी मुलाचें कोड कौतुक कोण करणार१कसली पाचवी व कसले षष्टीपूजन ! बाराब्या दिवशीं वाजंत्र्याच्या गजरांत बारसे वगैरे कांहींच झाले नाही. कित्येक दिवस पर्यंत माझे नांवाहि ठेविलें नव्हतें. बाब्या, बाबू, बाळ यापक ज्याचे तोंडीं जे येईल त्या नांवानें मला संबोधलें जात असें. माझे वडील




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now